गुरुवार, २३ मे, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
पुष्प सतरावे 
वसंत सत्य
         वेदिक धर्मग्रंथ व गीता सत्य प्रकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांनी साधनेमध्ये उच्च अवस्था प्राप्त केली आहे केवळ त्यांनाच त्याचा बोध होतो. सत्याचे पूर्ण प्रकटीकरण करण्यासाठी, आता सत्य साई अवतार आला आहे. ह्या अवतारकाळात, उच्च अवस्था प्राप्त न केलेले लोकं,सामान्य जन, आपल्यासारखे मंद बुद्धी आणि एवढेच नव्हे तर पाषाणहृदयी लोकांनाही सत्याचा बोध होऊ शकेल. करुणामयी भगवान अत्यंत सोप्या व सुलभ रितीने सत्याची उकल करून सामान्य माणसाला परमेश्वराचा बोध करून देत आहेत. अवतार केवळ आपल्याला त्याच्याबरोबर स्वर्गात घेऊन जाण्यासाठी येथे आला आहे हे लक्षात घ्या. तो दयाधन आहे. यापूर्वी कोणत्याही युगात असा अवतार झाला नाही. तो आपल्याला सत्याचा मार्ग दाखवून, आपल्याला सत्य बनवण्यासाठी येथे आला आहे. 
         स्वामी म्हणाले, " सामान्य माणसाला सत्याचा बोध होण्यासाठी तुझे लेखन व तुझी पुस्तके सहाय्यकारी ठरतात. तुझे जीवन आणि अनुभव सामान्यांना सुलभ रितीने वेद आणि उपनिषदांचे ज्ञान उलगडून दाखवतात.  हे वसंत सत्य आहे 
         जेव्हा अवतार भूतलावर येतात तेव्हा त्यांना त्यांच्या दिव्यत्वाचे ज्ञान असते. तू अवतार आहेस तथापि तुला ते ज्ञान नाही, तू एक जीव म्हणून जन्माला आलीस, साधनेद्वारे तू उच्चअवस्था प्राप्त केलीस. प्रत्येक जीवास तुझी अवस्था प्राप्त करणे शक्य आहे हे तू दर्शवते आहेस. अवताराचा महिमा जाणणे अवघड आहे. तू ज्या पद्धतीने जीवन जगते आहेस त्या जीवनप्रणालीचा सामान्य माणूसही अवलंब करू शकतो. अनुसरण करू शकतो. 
      स्वामींनी त्यांच्या वयाच्या १४ व्या वर्षी ते कोण आहेत, हे घोषित केले. त्यांनी अनेक चमत्कार केले. क्षणोक्षणी,  ते  परमपुरुष असल्याचे त्यांनी प्रकट केले. 
   मी स्वतःला छोट्या गावातील एक सामान्य स्त्री समजते. माझे ध्येय साध्य करण्यासाठी मी कठोर तप केले. सामान्य जीवाचा शिव कसा बनतो हे मी माझ्या जीवनाद्वारे दर्शवत आहे. 
        मी माझे मन, इंद्रिये, अहंकार व बुद्धी ह्यांच्यावर ताबा मिळवून विजय मिळवला व सर्व स्वामींना समर्पित केले. १७ एप्रिल २००२ रोजी स्वामींनी सर्व स्वीकारून, माझा त्यांच्याशी योग झाल्याचे घोषित केले. त्यानंतर मी अधिक साधना केली व स्वतःला रिक्त केले. स्वामींनी ह्या रिक्त पात्राला त्यांच्या सत्याने भरून टाकले आणि त्याला वसंत सत्य असे संबोधित केले. छोट्या गावातील एक सामान्य स्त्री वसंता, वसंत सत्य कशी बनली हे माझे जीवन दर्शवते. 
         सकाळचे दर्शनासाठी स्वामी आले नाहीत. मी खूप रडले. 
३० जून २००४ 
स्वामी - रडू नकोस. प्रत्येक अवतारात मी तुझाच आहे. मी तुझ्या प्रेमाचा गुलाम आहे. ह्याचा पुरावा म्हणून मी हे लिहून ठेवेन. 
वसंता - स्वामी, असे नका म्हणू . 
स्वामी - तू जगद्जननी आहेस. तू तुझ्या मुलांची सुटका करण्यासाठी छोट्या गावातील एक सामान्य स्त्री बनून आलीस. वेदिक धर्मग्रंथांनी दाखवलेला मार्ग समजण्यास कठीण आहे. तुझे जीवन, परमेश्वराप्रत पोहोचण्याचा सोपा मार्ग दर्शवते. तुझ्या ध्येयाची परिपूर्ती करण्यासाठी मी येथे आलो आहे. 

संदर्भ - श्री वसंत साईंच्या May २७ to May २७. ह्या पुस्तकातून.  
जय साईराम   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा