ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" केवळ परमरेश्वराची इच्छा धरा. तोच एकमात्र सत्य आहे. "
भाग - सातवा
प्रेम सूत्र
सायं ध्यान
वसंता - स्वामी, 'शिव सूत्र' पुस्तकातील 'प्रेम सप्ताह' हे शेवटचे प्रकरण मी लिहून पूर्ण केले.
स्वामी - तू हे सर्व कसे काय लिहिलेस ? यातून परमोच्च ज्ञानावस्था प्रकट होते.
वसंता - स्वामी, मी नाही लिहिले. माझ्या अंतरात असणाऱ्या तुम्हीच ते लिहिले आहे. स्वामी, कृपा करुन माझे पत्र घ्या.
स्वामी - एकीकडे तू म्हणतेस, की मी तुझ्या अंतर्यामी आहे आणि नंतर मी तुझे पत्र घ्यावे म्हणून करुण रूदनही करतेस. तू ह्या उच्च अवस्थेतून स्वतःला खालच्या पातळीवर उतरू देतेस.
वसंता - स्वामी, ही प्रेमाची गहनता आहे. गहनातील गहन प्रेम. ज्ञानाला उंची असते तर प्रेमाला खोली. प्रेमासाठी दोघांची गरज असते, म्हणून ते गहन असते. एवढेच काय, तर तुम्हालाही या प्रेमाची सखोलता माहीत नाहीय. जो प्रेम व्यक्त करतो त्यालाच प्रेमाची खोली कळू शकते. ज्ञानाची शिखरे कोणीही पादाक्रांत करू शकेल किंवा दाखवू शकेल, तथापि प्रेमाची गहानता कुणालाही मोजता येणार नाही, दाखवता येणार नाही किंवा कोणी समजूही शकणार नाही.
स्वामी - मी जिंकू शकत नाही. मी पुन्हा एकदा हारलो.
वसंता - नाही स्वामी, मी सदैव तुमच्या चरणांची धूळच आहे.
स्वामी - तुझ्या प्रेमाची गहानता कोणीही जाणू शकणार नाही.
ध्यान समाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा