गुरुवार, ३० मे, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

          " एका मागोमाग एक ज्ञानाची कवाडे खुली झाली की आपल्याला सत्याच्या सुवर्ण तेजाचे दर्शन होते. "

भाग -सातवा 

प्रेम सूत्र

            स्वामी कदाचित या  प्रेमाच्या महासागरात पोहतील, खोलवर जातील, सुरकांडीही मारतील परंतु ते या प्रेमाचं गहिरेपण कधीही जाणू शकणार नाहीत. ते ' परमेश्वर ' आहेत. ते ' अस्तित्व ' अवस्थेत आहेत.  राम आणि कृष्ण यांच्या काळात अवतारांनी प्रेमाची छोटीशी झलक आनंदाने अनुभवली. 
            रामाने अशा कोमल भावनांना फारसे स्थान दिले नाही. फक्त मिथिलेतील मार्गावरून जात असता त्याने सीतेला पाहिले तेव्हा प्रेम भावनेने त्याच्या हृदयाची तार छेडली. त्यानंतर रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर ' सीता, सीता ' असा टाहो फोडत राम सीतेच्या शोधार्थ गेले. त्यावेळी त्यांनी आपले प्रेम व्यक्त करून अश्रू ढाळले. रामाने सामान्य माणसाप्रमाणे क्वचितच आपल्या खऱ्या भावना व्यक्त केल्या. केवळ सीतेच्या विरह प्रसंगी त्यांचे भाव प्रकट झाले. 
            कृष्णाने राधेचे प्रेम अनुभवले. स्वामींनीही माझे प्रेम अनुभवले आहे. परंतु पूर्णत्वाने नाही. 
            श्री राम आणि श्री कृष्ण दोघांनी प्रेमाची ओझरती निकटता अनुभवली आहे. तथापि स्वामींनी व मी ही जवळीक अनुभवली नाहीय. आमचे प्रेम पूर्णत्वास पोहोचले नाही. ते अपूर्ण आहे. अधुरे आहे. 
             हनुमानाने त्याच्या रोमारोमात रामनाम गुंजत असल्याचे उघड केले. रामनाम त्याचे अविभाज्य अंग कसे काय बनले ? त्याच्या भक्तीची सखोलता दर्शवण्यासाठी हे घडले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा