ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपल्या अतृप्त इच्छा आकांक्षा व आसक्ती पुढील जन्मात आपल्या बरोबर येतात."
प्रकरण सहा
सतीत्व
मी म्हणाले, " मी सामान्य स्त्री बनेन."
त्यावर त्यांनी विचारले," जर मी राक्षस बनलो तर तू काय करशील ?"
मी उत्तरले," मी राक्षसीण बनेन."
पुन्हा स्वामींनी विचारले, " जर मी मोर असेन तर ?"
मी म्हणाले," मी लांडोर बनेन."
सूक्ष्म जीवजंतूंपासून ते ब्रम्हापर्यंत जे कोणते रूप ते धारण करतील, त्या रूपातील नारीचे रूप धारण करून मी त्यांची सहचारिणी बनेन. माझा प्रिय परमेश्वर जे रूप धारण करेल त्या रूपाच्या नारीचे रूप मी धारण करेन. हा माझ्या पातिव्रत्याच्या कळस आहे. स्वामी पुढे म्हणाले, " जिथे जिथे परमेश्वर आहे तिथे तिथे तू आहेस." जर स्वामी ब्रम्हदेव असतील तर मी सरस्वती आहे, ते शिव असतील तर मी शक्ती आहे. ते विष्णू असतील तर मी लक्ष्मी आहे. देव, मनुष्य, पशुपक्षी, जीवजंतू, संपूर्ण निर्मितीमधील कोणत्याही रूपातील ते नर झाले तर मी नारी होते. माझे समर्थ पातिव्रत्य आणि दुर्दम्य इच्छा यातूनच नवनिर्मिती होईल. सर्व नर सत्य असतील व सर्व नारी प्रेम असतील.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा