रविवार, ३० जून, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

      " केवळ परमेश्वराला स्पर्श केल्याने आपल्याला चिरंतन शांतीचा लाभ होतो. "

सूत्र दुसरे

अनुभूती

          ज्ञान मात्र एका  व्यक्तीद्वारे प्रकट होऊ शकते. इथे अनुभूतीची गरज नाही. त्यामुळे दोघं लागत नाहीत पण प्रेमाच्या अभिव्यक्तीला दोघं हवीत कारण; त्यामुळेच अनुभव मिळतो व त्यातून तृप्ती होते, प्रेम पूर्णत्वास जाते. भक्ती ज्ञानामध्ये परिपक्व होते. पक्व प्रेम वेडेपिसे बनवते. माझे लिखाण केवळ अध्यात्मावर आधारित आहे; त्याचे मानवी प्रेमाशी तुलना करू नका, ह्या प्रेमाला सांसारिक अर्थ लावू नका. 
           स्वामी म्हणतात, की केवळ अनुभवातूनच प्रेम जाणता येते. परमेश्वर अनुभवत नाही. तथापि मी असे लिहिले आहे की राम आणि कृष्ण दोघांनी थोडाफार अनुभव घेतला, तो त्यांच्या अवतारकालापुरताच मर्यादित होता. पुढील अवतारात चालू राहिला नाही. मात्र मानवाच्या मनावरील खोल ठसे युगानुयुगे प्रत्येक जन्मात त्याच्या बरोबर येत राहतात. परमेश्वराचे तसे नाही. प्रत्येक अवतार हा विशिष्ट कालखंडापुरता वावरतो. त्यावेळेचे अनुभव, विरहवेदना, अश्रू हे सर्व त्या अवतारकार्याचाच एक भाग असतो. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, २७ जून, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

      " प्रारंभी जग एक माया आहे अशा दृष्टीने पहा त्यानंतर अंतर्मुख होऊन परमेश्वराला अंतर्यामी पाहा व त्यानंतर संपूर्ण विश्वामध्ये परमेश्वराला पाहा. "  

सूत्र दुसरे 

अनुभूती

           स्वामी म्हणाले की त्यांनी माझ्या प्रेमाची सदेह अनुभूती न घेतल्यामुळे प्रेमाच्या गहिरेपणाविषयी ते सांगू शकत नाहीत. त्याचप्रमाणे मला स्वामींच्या स्थूल देहाबरोबर कोणतीही अनुभूती नाही म्हणून माझी तगमग होते आहे. जेव्हा एखादी व्यक्ती प्रत्यक्ष पाहते, बोलते, स्पर्श करते तेव्हा प्रेमभावना देहामध्ये पसरते. पाचही इंद्रिये पाहणे, बोलणे , स्पर्श करणे व ऐकणे या क्रियांद्वारे व्यक्तिगत प्रेमभावाचा अनुभव घेत असतात. मला असा कोणताही अनुभव नसल्याने माझे प्रेम अधुरे आहे. 
            ज्ञान म्हणजे आत्म साक्षात्कार, प्रथम साधक ईश्वराला स्वतःमध्ये पाहतो. मग तो परमेश्वराची अनुभूती घेतो. परमेश्वराशी त्याचा योग होतो. तत्पश्चात त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. तथापि आपण जेव्हा प्रेमाबद्दल बोलतो तेव्हा तेथे दोघं लागतात, कारण प्रेम म्हणजे देवघेव. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम     

रविवार, २३ जून, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प अठरावे 

            स्वामींनी ३५ दिवस माझ्या पत्रांना स्पर्श केला नाही. त्यांनी एकही पत्र न स्वीकारता केवळ दुरून आशीर्वाद दिले. मी नानाविध मार्गांनी, वेगवेगळ्या दूतांद्वारे प्रयत्न केला पण व्यर्थ ! स्वामी म्हणाले, "मी आपल्या विवाह दिनी पत्र घेईन." म्हटल्याप्रमाणे स्वामींनी २७ मे च्या संध्याकाळी माझी पत्रे व पुस्तकांचे अध्याय घेतले. ते ३५ दिवस माझ्यासाठी किती दुःखदायक होते हे शब्दातून वर्णन करणे अश्यक आहे. त्याचा माझ्या तब्येतीवरही परिणाम झाला. स्वामींनी स्वतः माझी पत्रे मागून घेतली हे कळल्यावर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मला कोडाईकॅनल मध्ये स्वामींचे दर्शन घेऊ दिले नाही व त्यानंतर स्वामींनी माझ्या पत्रांचा केलेला अस्वीकार ह्यामुळे माझा जीवप्रवाह माझ्या देहाला सोडून जात असल्यासारखे मला वाटत होते परंतु स्वामींनी पत्रे स्वीकारल्यानंतर जीवप्रवाह पुन्हा देहात परतल्यासारखे मला वाटले. मला स्वामींनी लवकरात लवकर बोलवावे यासाठी सर्वजण कळकळीने प्रार्थना करत होते. स्वामी म्हणाले हे सुद्धा अवतारिक कार्यासाठी हे कोडे अनाकलनीय आहे. प्रत्येक अवतारात अवताराचे कार्य असेच असते. त्रेतायुगात रामाने धोब्याचे शब्द ऐकून सीतेला वनात पाठविले. तिने अग्नि परीक्षा देऊन तिचे पावित्र्य सिद्ध केले तरीही त्याने तिला वनात का पाठवले ? कृष्ण राधेला सोडून मथुरेला का गेला ? राधेचे निःसीम प्रेम असूनही कृष्णाने असे का केले? आता आपण माझ्या बाबतीत जे झाले ते पाहू. स्वामी आणि माझ्यामधील नाते जगासमोर प्रकट करण्यासाठी मी ५० हुन अधिक पुस्तके लिहिली वाचकांना माझ्या शब्दांमधील सत्यता जाणवते व त्यांच्या मनात प्रश्न उभे राहतात स्वामी अम्मांना का अश्रू ढाळायला लावतात ? सर्वांना दर्शन, स्पर्शन, संभाषणाचा लाभ देतात मग अम्मांना का नाही ? पुट्टपर्ती व कोडाईकॅनल इथे अम्मांचा झालेला अपमान स्वामींनी शांतपणे का पाहिला ? स्वामी म्हणतात, " हा परमेश्वर आणि त्याच्या अर्धांगिनीच्या अवतार कार्याचाच एक भाग आहे." अध्यात्म रामायणात सीतामाईने हनुमानाला एक महान सत्य उघड केले.", मी प्रपंच शक्ती आहे मीच सर्व कार्य करते. मी ह्या सृष्टीची निर्माती, पालनकर्ती व संहारकर्ती आहे. मी मूलप्रकृती आहे. मी स्वामींहून अधिक वरचढ आहे. 
            मीच सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत. अज्ञानी लोकांना वाटते की तो सर्वांचा कर्ताकरविता आहे. परंतु ते तसे नाही मीच सर्व करत आहे. जेव्हा परमेश्वर अवतार घेतो तेव्हा तो स्वतःला दोघात विभागतो नर आणि नारी. नर तत्व अवताराची भूमिका निभावतो व नारी तत्व त्याच्या शक्तीची भूमिका करते. अवतार कार्यासाठी शक्तीची आवश्यकता असते. परमेश्वर अस्तित्व अवस्थेत व साक्षी अवस्थेत असतो व शक्ती बनण्याच्या अवस्थेत येते. परमेश्वराची शक्ती त्याला अवतार घेण्यासाठी प्रवृत्त करते. परमेश्वराने संकल्प केला की शक्ती सर्व योजना आखते, अवतारासाठी नाट्यलेखन करते. परमेश्वर अभिनेते निर्मण करतो पण सदिग्दर्शन केवळ शक्ती करते. शक्तीच सर्वकाही करते परंतु दोष मात्र अवताराकडे जातो. शक्तीने भूमिका निर्माण केल्यामुळे तिला विश्वाकडून सांत्वन मिळते. अवतार साक्षी भावात करत असल्याने दोष त्याच्याकडे जातो. स्वामींनी राम, कृष्ण व सत्यसाई अवतारांद्वारे हे दर्शवले आहे. वास्तविक परमेश्वर व त्याची अर्धांगिनी दोन्ही एकच आहेत. हे सत्य विश्वाला उघड करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. परमेश्वराची शक्ती दयारूपिणी आहे. जेव्हा जगामध्ये धर्माचा ऱ्हास होतो व सर्वजण दुःख भोगतात तेव्हा दयारूपिणी शक्ती परमेश्वरास अवतार घेण्यास प्रवृत्त करते. अगोदरच्या अवतारांच्या कार्याचे स्वरूप लहान होते. आताचे कार्य प्रचंड मोठे आहे. स्वामींची परमशक्ती प्रकृति म्हणून कार्य करत आहे. स्वामी आणि मी नवनिर्मिती करणार आहोत. प्रकृति सर्वांमध्ये बदल घडवून नवनिर्मिती कशी करते हे मी माझ्या भावांद्वारे दर्शवत आहे.    

 वसंतसाई 

जय साईराम 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " आसक्ती विरहीत प्रेम दिव्य असून ते परमेश्वराचेच रूप आहे. "

सूत्र दुसरे 

अनुभूती 

            मी का लिहिते ? माझ्या प्रेमाच्या वेगामुळे हे घडते. पृथ्वीला गंगेचा वेगवान ओघ सहन करणे शक्य नसल्यामुळे भगवान शंकरांनी तिला प्रथम आपल्या माथ्यावर धारण केले. त्याचप्रमाणे पृथ्वी माझ्या प्रेमाचा आवेग सहन करू शकत नसल्यामुळे पृथ्वीची स्थिती उलटीपालटी झाली आहे. कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन होत आहे. ह्या वेड्या प्रेमाने प्रत्येक गोष्टीला वसंता बनवून सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करण्याचा संकल्प केला आहे. माझी तळमळ, माझे दुःख मला असे लिहिण्यास भाग पाडते आणि तरीही स्वामी माझ्यासाठी काहीही करणार नाहीत. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २० जून, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" शुद्ध भावांमुळे आपल्याला सत्याची दृष्टी प्राप्त होते."
सूत्र दुसरे 

अनुभूती 

२५ जून २००८ ध्यान 
वसंता - स्वामी, कृपा करून मला क्षमा करा. तुम्हाला माझ्या प्रेमाची खोली समजणार नाही असे मी लिहिले. मला माफ करा. केवढा हा अहंकार ! 
स्वामी - नाही, नाही. हा अहंकार नाही. तू अगदी हताश होऊन तुझी तळमळ व्यक्त केलीस, की ते ऐकून तरी मी तुझ्यासाठी काहीतरी करावे. हे खरं आहे की मला या स्थूल शरीराद्वारे प्रत्यक्ष अनुभव नाही आहे. तुझ्या जवळकीचा अनुभव नसल्यामुळे मला तुझ्या प्रेमाचं गहिरेपण कळू शकत नाही. तू रडू नकोस. आपण त्याची अनुभूती घेतल्यानंतर मला समजेल. 
वसंता - स्वामी, मला माझ्या प्रेमांचा आवेग असह्य होऊन मी हे सर्व लिहीत आहे. 
स्वामी - रडू नकोस. लवकरच सर्व काही ठीक होईल. 
ध्यान समाप्ती 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम   

रविवार, १६ जून, २०१९

ॐ श्री साईवसंतसाई साय नमः 

सुविचार 

      "  परमेश्वराप्रत पोहोचण्याच्या प्रवासामध्ये (मनातील) भाव अत्यंत महत्वाचे आहे."

भाग- सातवा 

प्रेम सूत्र 

           प्रेमामध्ये 'मी' नाही. प्रेम स्वतःला समर्पित करते ते सर्वकाही रिक्त करते. प्रेमाच्या उगमस्थानाचा नाश झाल्यानंतरच प्रेम थांबते. माझ्यामधून उगम पावणारे हे प्रेम माझा नाश करूनच संपेल. ज्या परमेश्वरापासून मी उद्भवले, त्याच्याशी योग झाल्यानंतरच  या प्रेमाची अखेर होईल. 
            हे राधेच्या जीवनातही घडले. ती कृष्णप्रेमामध्ये, त्याच्या विचारांमध्येच जीवन जगली. तिने त्याच्यासाठी देह त्याग केला . ' समर रोझेस ऑन अ ब्लू माउंटन ' या पुस्तकात स्वामींनी याचे स्पष्टीकरण दिले आहे. यातील २४९ व्या पानावर राधेने आपले दुःख व्यक्त केले आहे. 
           ती म्हणते, 
           " गावामध्ये मला खूप त्रास होतो आहे.  तिथे एकही अशी जागा नाही जिथे मी आसरा घेऊ शकेन ! म्हणून मी आले आहे आणि केवळ तुझ्याकरता ही प्राणशक्ती रोखून धरली आहे. माझ्या जीवनाचे अस्तित्व केवळ तुझ्यासाठी आहे. तू मला किमान स्वप्नात तरी दर्शन दे. तुझ्या दर्शनाविना माझे मन क्षणभरही शांत राहू शकत नाही. " 
           माझीही अवस्था अशीच आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १३ जून, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " या जगामध्ये आपण केवळ धडे घेण्यासाठी जन्म घेतला आहे."

भाग - सातवा 

प्रेम सूत्र 

            माझी ही तृष्णा कधीही शांत होणार नाही.  कोण हे प्रेम जाणू शकेल ? सत्ययुग आणि वैश्विक मुक्ती म्हणजेच माझ्या प्रेमाची अभिव्यक्ती आहे. तरीही अजून पुष्कळ शिल्लक आहे. स्वामीसुद्धा या प्रेमाची खोली जाणू नाही. 
            प्रेमाचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ब्रम्हाच्या स्पष्टीकरणाचा प्रयत्न करण्यासारखेच आहे. प्रेमाला ना आदी ना अंत. हे प्रेम आले कोठून ? हे कोणी बनवले ? ह्या प्रेमाचा उद्भव केवळ परमेश्वरासाठी झाला आहे. हे कोणत्या प्रकारचे प्रेम आहे ? ह्या प्रेमाला कोणतेही कारण नाही, अपेक्षा नाही. ह्या प्रेमाची जातकुळी कोणती ? हे दिवसाचे २४ तास सतत परमेश्वराच्या विचारात आहे. जगातील इतर कोणीही असे प्रेम व्यक्त केले आहे का ? 
            आपण वेद आणि उपनिषदांमधून उच्च ज्ञानाचे दाखले देऊ शकतो. तथापि या प्रेमाची खोली दर्शविण्यासाठी आपण कशाचा दाखला देणार ? आपण ज्ञानाची उच्च शिखरे दर्शवू शकतो. या प्रेमाची खोली कोणीही मोजू शकत नसल्यामुळे असं म्हटलं जात की हे प्रेम खूप सखोल आहे, गहिर आहे. ज्ञान बुद्धीच्या आधारे समजून घेता येतं, तसे प्रेमाच्या बाबतीत नाही. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, ९ जून, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " कमलपत्रावरून घरंगळणाऱ्या  दवबिंदूप्रमाणे आपण कोणत्याही गोष्टीचा स्पर्श  होऊ न देता अनासक्त जीवन जगायला हवे.  

भाग - सातवा 

प्रेम सूत्र 

            या क्षणापर्यंत स्वामींनी मला कोणताही प्रत्यक्ष प्रतिसाद दिलेला नाही. तरीही हे प्रेम अविचल आहे आणि स्वामींना कधीही न सोडण्याचा त्याचा निर्धार आहे. हा कोणता स्वभाव आहे ? सहाणेवर घासल्या जाणार्‍या चंदनाच्या खोडाप्रमाणे देहाला झिजवणार्‍या, जीवप्रवाह विरघळवून भावोद्रेक करणार्‍या या प्रेमाची जातकुळी कोणती आहे? किती उपाध्या, पदव्या समोर आल्या त्याही या प्रेमाने दूर सारल्या. प्रेमसाई भाग -३ या पुस्तकातील ' तीन पत्रे '  या प्रकरणामध्ये स्वामींनी मला या प्रेमाविषयी लिहायला सांगितले. त्यात स्वामींनी म्हटले आहे की हे प्रेम संपूर्ण व्यापून टाकणार्‍या त्रिविक्रम अवतारासारखे  आहे. जर माझ्या देहामध्ये स्वामी भरून राहिले आहेत, तर संपूर्ण वसंतमयम झालेल्या विश्वामध्ये सुद्धा ते भरून राहतील . वाळूच्या कणाकणामध्ये, पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये, पंचतत्वांमध्ये माझे प्रेम भरून उरले आहे. सत्य युगामध्ये मी हे सिद्धा करेन. अजूनही ते अनिर्बंध प्रेम अनावर अश्रू प्रवाहाद्वारे वाहत आहे. ते सदा अतृप्तच राहील. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

गुरुवार, ६ जून, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" कर्मफळांचा  त्याग केल्यानंतरच परमेश्वर प्राप्ती होते. "

भाग -सातवा 

प्रेम सूत्र 

           त्यावेळी मला असे वाटले की माझे प्रेम अतिसामान्य आहे . मला काही कळत नव्हते. आता कुठे मला माझ्या प्रेमाचं गहिरेपण समजत आहे. आता हे प्रेम जास्त जास्त गदगदत आहे. या प्रेमाचा उगम कोठे आहे ? याचा स्वभाव कसा आहे ? हे प्रेम अपमान, अनादर याकडे अजिबात लक्ष देत नाही. या देहाला अनेक व्याधींनी त्रास दिला तरीही हे प्रेम अबाधित राहिले आहे. माझे मन, देह आणि हृदय या प्रेमाने वेडेपिसे झाले आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, २ जून, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

        " जोपर्यंत मनुष्याच्या ठायी अज्ञान, इच्छा व वासना असतात तोपर्यंत त्याचा परमात्म्याशी योग्य होऊ शकत नाही." 

भाग - सातवा 

प्रेम सूत्र 

            पहिले पुस्तक लिहीत असताना मी एक अंतर्दृश्य पाहिले त्यामध्ये स्वामींनी माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये त्यांचे अस्तित्व असल्याचे दाखवले. याचा अर्थ काय ? स्वामी माझ्यामध्ये पूर्णपणे भरलेत, हे बाहेर कसे दर्शवणार ? म्हणून स्वामींनी माझे प्रेम ह्या दृश्यातून दाखवून दिले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम