ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प अठरावे
स्वामींनी ३५ दिवस माझ्या पत्रांना स्पर्श केला नाही. त्यांनी एकही पत्र न स्वीकारता केवळ दुरून आशीर्वाद दिले. मी नानाविध मार्गांनी, वेगवेगळ्या दूतांद्वारे प्रयत्न केला पण व्यर्थ ! स्वामी म्हणाले, "मी आपल्या विवाह दिनी पत्र घेईन." म्हटल्याप्रमाणे स्वामींनी २७ मे च्या संध्याकाळी माझी पत्रे व पुस्तकांचे अध्याय घेतले. ते ३५ दिवस माझ्यासाठी किती दुःखदायक होते हे शब्दातून वर्णन करणे अश्यक आहे. त्याचा माझ्या तब्येतीवरही परिणाम झाला. स्वामींनी स्वतः माझी पत्रे मागून घेतली हे कळल्यावर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मला कोडाईकॅनल मध्ये स्वामींचे दर्शन घेऊ दिले नाही व त्यानंतर स्वामींनी माझ्या पत्रांचा केलेला अस्वीकार ह्यामुळे माझा जीवप्रवाह माझ्या देहाला सोडून जात असल्यासारखे मला वाटत होते परंतु स्वामींनी पत्रे स्वीकारल्यानंतर जीवप्रवाह पुन्हा देहात परतल्यासारखे मला वाटले. मला स्वामींनी लवकरात लवकर बोलवावे यासाठी सर्वजण कळकळीने प्रार्थना करत होते. स्वामी म्हणाले हे सुद्धा अवतारिक कार्यासाठी हे कोडे अनाकलनीय आहे. प्रत्येक अवतारात अवताराचे कार्य असेच असते. त्रेतायुगात रामाने धोब्याचे शब्द ऐकून सीतेला वनात पाठविले. तिने अग्नि परीक्षा देऊन तिचे पावित्र्य सिद्ध केले तरीही त्याने तिला वनात का पाठवले ? कृष्ण राधेला सोडून मथुरेला का गेला ? राधेचे निःसीम प्रेम असूनही कृष्णाने असे का केले? आता आपण माझ्या बाबतीत जे झाले ते पाहू. स्वामी आणि माझ्यामधील नाते जगासमोर प्रकट करण्यासाठी मी ५० हुन अधिक पुस्तके लिहिली वाचकांना माझ्या शब्दांमधील सत्यता जाणवते व त्यांच्या मनात प्रश्न उभे राहतात स्वामी अम्मांना का अश्रू ढाळायला लावतात ? सर्वांना दर्शन, स्पर्शन, संभाषणाचा लाभ देतात मग अम्मांना का नाही ? पुट्टपर्ती व कोडाईकॅनल इथे अम्मांचा झालेला अपमान स्वामींनी शांतपणे का पाहिला ? स्वामी म्हणतात, " हा परमेश्वर आणि त्याच्या अर्धांगिनीच्या अवतार कार्याचाच एक भाग आहे." अध्यात्म रामायणात सीतामाईने हनुमानाला एक महान सत्य उघड केले.", मी प्रपंच शक्ती आहे मीच सर्व कार्य करते. मी ह्या सृष्टीची निर्माती, पालनकर्ती व संहारकर्ती आहे. मी मूलप्रकृती आहे. मी स्वामींहून अधिक वरचढ आहे.
मीच सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत. अज्ञानी लोकांना वाटते की तो सर्वांचा कर्ताकरविता आहे. परंतु ते तसे नाही मीच सर्व करत आहे. जेव्हा परमेश्वर अवतार घेतो तेव्हा तो स्वतःला दोघात विभागतो नर आणि नारी. नर तत्व अवताराची भूमिका निभावतो व नारी तत्व त्याच्या शक्तीची भूमिका करते. अवतार कार्यासाठी शक्तीची आवश्यकता असते. परमेश्वर अस्तित्व अवस्थेत व साक्षी अवस्थेत असतो व शक्ती बनण्याच्या अवस्थेत येते. परमेश्वराची शक्ती त्याला अवतार घेण्यासाठी प्रवृत्त करते. परमेश्वराने संकल्प केला की शक्ती सर्व योजना आखते, अवतारासाठी नाट्यलेखन करते. परमेश्वर अभिनेते निर्मण करतो पण सदिग्दर्शन केवळ शक्ती करते. शक्तीच सर्वकाही करते परंतु दोष मात्र अवताराकडे जातो. शक्तीने भूमिका निर्माण केल्यामुळे तिला विश्वाकडून सांत्वन मिळते. अवतार साक्षी भावात करत असल्याने दोष त्याच्याकडे जातो. स्वामींनी राम, कृष्ण व सत्यसाई अवतारांद्वारे हे दर्शवले आहे. वास्तविक परमेश्वर व त्याची अर्धांगिनी दोन्ही एकच आहेत. हे सत्य विश्वाला उघड करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. परमेश्वराची शक्ती दयारूपिणी आहे. जेव्हा जगामध्ये धर्माचा ऱ्हास होतो व सर्वजण दुःख भोगतात तेव्हा दयारूपिणी शक्ती परमेश्वरास अवतार घेण्यास प्रवृत्त करते. अगोदरच्या अवतारांच्या कार्याचे स्वरूप लहान होते. आताचे कार्य प्रचंड मोठे आहे. स्वामींची परमशक्ती प्रकृति म्हणून कार्य करत आहे. स्वामी आणि मी नवनिर्मिती करणार आहोत. प्रकृति सर्वांमध्ये बदल घडवून नवनिर्मिती कशी करते हे मी माझ्या भावांद्वारे दर्शवत आहे.
वसंतसाई
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा