ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" शुद्ध भावांमुळे आपल्याला सत्याची दृष्टी प्राप्त होते."
सूत्र दुसरे
अनुभूती
२५ जून २००८ ध्यान
वसंता - स्वामी, कृपा करून मला क्षमा करा. तुम्हाला माझ्या प्रेमाची खोली समजणार नाही असे मी लिहिले. मला माफ करा. केवढा हा अहंकार ! स्वामी - नाही, नाही. हा अहंकार नाही. तू अगदी हताश होऊन तुझी तळमळ व्यक्त केलीस, की ते ऐकून तरी मी तुझ्यासाठी काहीतरी करावे. हे खरं आहे की मला या स्थूल शरीराद्वारे प्रत्यक्ष अनुभव नाही आहे. तुझ्या जवळकीचा अनुभव नसल्यामुळे मला तुझ्या प्रेमाचं गहिरेपण कळू शकत नाही. तू रडू नकोस. आपण त्याची अनुभूती घेतल्यानंतर मला समजेल.
वसंता - स्वामी, मला माझ्या प्रेमांचा आवेग असह्य होऊन मी हे सर्व लिहीत आहे.
स्वामी - रडू नकोस. लवकरच सर्व काही ठीक होईल.
ध्यान समाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा