ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" कमलपत्रावरून घरंगळणाऱ्या दवबिंदूप्रमाणे आपण कोणत्याही गोष्टीचा स्पर्श होऊ न देता अनासक्त जीवन जगायला हवे.
भाग - सातवा
प्रेम सूत्र
या क्षणापर्यंत स्वामींनी मला कोणताही प्रत्यक्ष प्रतिसाद दिलेला नाही. तरीही हे प्रेम अविचल आहे आणि स्वामींना कधीही न सोडण्याचा त्याचा निर्धार आहे. हा कोणता स्वभाव आहे ? सहाणेवर घासल्या जाणार्या चंदनाच्या खोडाप्रमाणे देहाला झिजवणार्या, जीवप्रवाह विरघळवून भावोद्रेक करणार्या या प्रेमाची जातकुळी कोणती आहे? किती उपाध्या, पदव्या समोर आल्या त्याही या प्रेमाने दूर सारल्या. प्रेमसाई भाग -३ या पुस्तकातील ' तीन पत्रे ' या प्रकरणामध्ये स्वामींनी मला या प्रेमाविषयी लिहायला सांगितले. त्यात स्वामींनी म्हटले आहे की हे प्रेम संपूर्ण व्यापून टाकणार्या त्रिविक्रम अवतारासारखे आहे. जर माझ्या देहामध्ये स्वामी भरून राहिले आहेत, तर संपूर्ण वसंतमयम झालेल्या विश्वामध्ये सुद्धा ते भरून राहतील . वाळूच्या कणाकणामध्ये, पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये, पंचतत्वांमध्ये माझे प्रेम भरून उरले आहे. सत्य युगामध्ये मी हे सिद्धा करेन. अजूनही ते अनिर्बंध प्रेम अनावर अश्रू प्रवाहाद्वारे वाहत आहे. ते सदा अतृप्तच राहील.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा