गुरुवार, १३ जून, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " या जगामध्ये आपण केवळ धडे घेण्यासाठी जन्म घेतला आहे."

भाग - सातवा 

प्रेम सूत्र 

            माझी ही तृष्णा कधीही शांत होणार नाही.  कोण हे प्रेम जाणू शकेल ? सत्ययुग आणि वैश्विक मुक्ती म्हणजेच माझ्या प्रेमाची अभिव्यक्ती आहे. तरीही अजून पुष्कळ शिल्लक आहे. स्वामीसुद्धा या प्रेमाची खोली जाणू नाही. 
            प्रेमाचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ब्रम्हाच्या स्पष्टीकरणाचा प्रयत्न करण्यासारखेच आहे. प्रेमाला ना आदी ना अंत. हे प्रेम आले कोठून ? हे कोणी बनवले ? ह्या प्रेमाचा उद्भव केवळ परमेश्वरासाठी झाला आहे. हे कोणत्या प्रकारचे प्रेम आहे ? ह्या प्रेमाला कोणतेही कारण नाही, अपेक्षा नाही. ह्या प्रेमाची जातकुळी कोणती ? हे दिवसाचे २४ तास सतत परमेश्वराच्या विचारात आहे. जगातील इतर कोणीही असे प्रेम व्यक्त केले आहे का ? 
            आपण वेद आणि उपनिषदांमधून उच्च ज्ञानाचे दाखले देऊ शकतो. तथापि या प्रेमाची खोली दर्शविण्यासाठी आपण कशाचा दाखला देणार ? आपण ज्ञानाची उच्च शिखरे दर्शवू शकतो. या प्रेमाची खोली कोणीही मोजू शकत नसल्यामुळे असं म्हटलं जात की हे प्रेम खूप सखोल आहे, गहिर आहे. ज्ञान बुद्धीच्या आधारे समजून घेता येतं, तसे प्रेमाच्या बाबतीत नाही. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा