रविवार, २८ जून, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " नैसर्गिक साधनसंपत्तीविषयी मनुष्याला असणाऱ्या लालसेपोटी निसर्गाचा समतोल बिघडला आहे. "

भाग - नववा

आत्मगीते  

अंतः शत्रूंच्या कारवायांनी मन माझे अशांत 
ही अदृश्य माया, मायेचा संभ्रम 
रुदन करिते मी नवजात शिशुसम,
ज्यासी ठेविले कंटकशय्येवर 
हे हृदय तुझे की पाषाण ?
दया कर मजवर, दया कर. 

          पाच इंद्रिये हेच आपले अंतःशत्रू आहेत . मी त्यांच्याशी लढा देत आहे . परंतु सुटकेचा मार्ग दिसत नाही . अदृश्य मायेने निर्माण केलेल्या संभ्रमामुळे मी अश्रू ढाळते आहे . कंटकशय्येवर  झोपवलेल्या नवजात शिशुसारखे मी करुण रुदन करत आहे . माझी अवस्था त्या बालकासारखीच आहे . मी परमेश्वराची करुणा भाकते आहे. 

धर्मशास्त्र सांगते,' ईशचरण हाचि एक आश्रय ' 
असत्य आहे हे प्रतिपादन 
करेन मी हे सिद्ध सप्रमाण 
हे कोकिळे,
साहाय्य न करी मज तो ध्येय प्राप्त करण्या 
केवळ बोलचि त्याचे मधुर 
पुसता ' वेद आहेत का असत्य ?'
प्रतिसाद ना देई तो, राखुनी मौन. 

           सर्व पवित्र धर्मग्रंथ सांगतात की, परमेश्वराचे चरण हाच एकमेव आश्रय आहे. मी म्हणते की हे असत्य आहे. माझ्या अवस्थेवरून हे मी सिद्ध करू शकते. मी कोकिळेला बोलावते आणि म्हणते, " तो फक्त मधुर बोलतो परंतु मला सहाय्य करत नाही. " मी जर त्याला विचारले की, वेदवाक्य असत्य आहे का ? तर तो माझ्या हाकांना उत्तर न देता मौन राखतो. कोकिळेसारखे दूत पाठवून मी अनेक गीते लिहिली आहेत.   

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २५ जून, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

      " मनुष्याने विवेकबुद्धीचे अनुसरण केल्यास पंचतत्वांमध्ये समन्वय राहील." 

भाग - नववा

आत्मगीते

शब्द आणि कृती यातील अंतर - अनेक मौलांचे 
हृदय आणि पाषाण यातील अंतर - मोहरीएवढे 
क्षुल्लक लाभासाठी करिती जन शुचितेचा त्याग 
निराश्रिताचे दुःख भोगते मी या मानवी जीवनात.

           लोकांचे उच्चार आणि कृती यांमध्ये एकसूत्रता नसते. ते पाषाणहृदयी असतात, क्षुल्लक लाभासाठी शुचितेचा त्याग करतात. माझ्या मुक्तीसाठी मी परमेश्वराचा धावा करते आहे. या क्रूर जगतात मला शांतीचा लवलेशही दिसत नाही. 

*

तिरुकण्णापुरामचा ईश्वर 

वयाच्या पाचव्या वर्षात मी करिती पदार्पण 
स्थापिलेस मम हृदयी तू तव दिव्य चरण 
बालपणी दिलेस अन् तारुण्यात झाकलेस 
रूप तव धगधगते मम हृदयी निखाऱ्यासम 
अंतसमयी तरी देशील का मज ताव चरणांचे दर्शन ? 

          माझा जन्म ईशचिंतनात का झाला ? मी तारुण्यात अन्य व्यतींशी विवाह का केला ? भगवंताचे रूप माझ्या हृदयात निखाऱ्यासारखे धगधगते आहे. काळ सरतो आहे. माझे रुदन चालूच आहे. ' किमान माझ्या अंतसमयी तरी मला त्यांच्या चरणांचे दर्शन होणार नाही का ?'
*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

मंगळवार, २३ जून, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प -३० 

कर्माची अदृश्य मुळे 

           आता, सर्वजण कर्माच्या ओझ्याचा अनुभव घेत आहेत. मी सर्वांसाठी मुक्ती मागितली, " मी परमेश्वरापासून वियुक्त झाले आहे. मला त्यांच्याशी संयुक्त व्हायचे आहे " याच एकमेव विचारामुळे नवनिर्मितीचा आराखडा उत्पन्न झाला. माझ्या एका देहानी परमेश्वराचा अनुभव घेण्यात मी समाधानी नाही. मला वाटते की संपूर्ण जगाने माझ्यासारखे व्हावे आणि परमेश्वरावर प्रेमाचा वर्षाव करावा. या आराखड्यात नवीन जग निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. हा आराखडा माझ्या इच्छेनुसार माझ्यासारखी नवनिर्मिती करेल. ही वसंतमयम निर्मिती असेल. तिथे सर्वजण परमेश्वराशी विवाह करतील आणि परमेश्वरासोबत राहतील. 
             ही स्वामींच्या आणि माझ्यापासून जन्माला आलेली वंशावळ एक हजार वर्ष चालू राहील. या वंशावळीत सर्व पुरुष ' सत्य ' आणि सर्व स्त्रिया ' प्रेम ' असतील. सर्व मुले ' ज्ञान ' असतील. हे कलियुगातील एक सत्ययुग असेल. एक हजार वर्षांच्या शेवटी सर्वांना पुन्हा आपआपली कर्म भोगायला लागतील. ते सत्ययुगात अनेक जन्म घेतील. परंतु त्यांना या काळात त्यांची कर्म भोगावी लागणार नाहीत. १००० वर्षाच्या सत्ययुगानंतर जेव्हा पुन्हा कली येईल, तेव्हा उर्वरित कर्म त्यांची वाट पहात असतील. 
            तुम्ही कदाचित म्हणाल, " अरेच्या ! सत्ययुग हे एवढच असेल ? तुम्ही तर म्हणालात की सर्वांना मुक्ती मिळेल. आता तुम्ही म्हणता, कर्म तशीच राहतील. हे काय गौडबंगाल आहे ?"
          स्वामींनी ध्यानात कर्माच्या कायद्याच सत्य सांगितल्यावर माझ्याही मनात अगदी हाच विचार आला. आजपर्यंत जगापुढे उघड न केलेली सूक्ष्मातील सूक्ष्म सत्ये उघड करण्यासाठीच हा अवतार धरतीवर अवताराला आहे. 
           स्वामींचे आणि माझे भाव सृष्टीत सर्वांमध्ये प्रवेश करतात आणि अवकाशातील प्रदूषण दूर करतात. आमचे भाव अवकाश व्यापून पंचमहाभूते शुद्ध करतात. १००० वर्षे सर्वजण याचा अनुभव घेतील व आनंद उपभोगतील. १००० वर्षांच्या सत्ययुगाच्या शेवटी माणूस पुन्हा जन्म घेईल आणि कलियुगातील त्याची उरलेली कर्म भोगायला लागेल. जर असे असेल तर मग जन्ममृत्युच्या चक्रातून सुटका मिळवण्यासाठी उपाय तरी काय ?
           स्वामींनी त्याच्या पदवीदान दिनाच्या प्रवचनात सांगितले की २८ वर्षांनंतर संपूर्ण जग एक होईल. हेच सत्ययुग असेल, याचा अर्थ असा की सर्वांना त्यांचे पूर्णपणे परिवर्तन होण्यासाठी २८ वर्षांचा कालावधी दिला आहे. प्रयेक मिनिटाला आपण आपल्या विचारांवर लक्ष ठेवून ते परमेश्वराकडे वळवले पाहिजेत. 
           हा कर्माचा हिशोब सत्ययुगात वाढणारही नाही अथवा कमीही होणार नाही. संपूर्ण युग हे निरामय आनंदाची स्थिती असेल. सत्ययुगात घेतलेल्या अनेक जन्मात रामाची निरनिराळी नावे व रूपे असतील. परंतु त्याच्या कर्माचा काटा सत्ययुगाच्या शेवटी त्याची वाट पहात असेल. हजार वर्षांनी येणारे कलियुग त्याच्या कर्मानुसार येणाऱ्या जन्ममृत्युचे कारण असेल; आणि ते कलियुग सध्याच्या कलियुगाहून कितीतरी पटीने भयावह असेल; सर्वात वाईट कली.
           मग आपण २८ वर्षे काय करावे ? आपण आपली स्तिथी समजून घेऊन स्वतःचे संपूर्णपणे परिवर्तन करावे. फक्त हाच एक उपाय आहे. 

संदर्भ - वसंतसाईंच्या ' सत्ययुग आणि कर्मकायदा ' ह्या पुस्तकातून. 

जय साईराम  

सोमवार, २२ जून, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " परमेश्वराची निर्मिती परस्परावलंबी आहे. निर्मितीत समतोल राखण्यासाठी आपण वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीची परतफेड केली पाहिजे. " 

भाग - नववा 

आत्मगीते 

तिरुमलीरुंचोलीचा भगवान 

हे सहस्त्रनाम भूषिता  
वर देसी अमरत्वाचा 
केले सहस्त्र भाग या देहाचे 
एकेक भाग करेल जयघोष तवनामाचा 
नारायण, नारायण अहोरात्र नामस्मरण 
सनातन नाम तुझे, माझा नित्य आधार 
अणूरेणूस व्यापून राहिलास तू 
माझे शाश्वत नाते. 

          मी परमेश्वराशी आंतरिक नात्याने बद्ध आहे. माझ्या देहातील प्रत्येक अणूरेणूमधून त्याच्याच नामाचा ध्वनी निनादतो. जरी माझ्या देहाचे सहस्त्र तुकडे केले. तरी प्रत्येक तुकड्यामधून नारायण - नामाचा ध्वनी उमटेल. 

*

उर्वरित  प्रकरण पुढील भागात .....

 जय साईराम 

गुरुवार, १८ जून, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" प्रेम हवेला शुद्ध बनवून, पृथ्वीला मंगल बनवते. "

भाग - नववा 

आत्मगीते 

तारुण्य जळते रखरखीत वाळवंटातील शुष्क पर्णासम 
वार्धक्याची चाहूल जणू क्लेश, यातनांची भेट 
प्रत्येक श्वास, नियतीचे नर्तन 
मानवी जीवनाचे हेच असे बीज.

           तारुण्याचे रंग फिके पडतात व ते संपते. वृद्धत्व म्हणजे जीवनभराच्या दुःखाची भेट. प्रत्येक श्वास म्हणजे नियतीचे नर्तन आहे. मला असे मानवी जीवन नको. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १४ जून, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः  

 सुविचार 

        " शुद्ध भाव मानवाला माधव बनवतात. अशुद्ध भाव मानवाला पशु बनवतात. "

भाग- नववा 

आत्मगीते 

तिरुपती 

तू म्हणसी आहे आपले नाते अतूट 
परि रक्षण का न करिसी माझे ?
अनभिज्ञ मी मानवी जीवनास 
त्या कारणे प्रमाद घडती अधिक हातातून 
हे तिरुपतीशा,
पोहोचेन का मी ताव चरणाप्रत 
हृदय तुझे की पाषाण ?
स्वीकार सत्वर समर्पण, हे फूल कोमजण्याआधी 

            आपले दोघांचे अतूट नाते आहे, असे सांगून सुद्धा प्रभू, माझे रक्षण का करत नाही, असा प्रश्न मी विचारते आहे. मला हे भौतिक जीवन नको आहे. मला त्यांच्याकडे परत जायचे आहे. मानवी जीवनास मी नवखी असल्यामुळे माझ्या हातून अधिक चुका होतात. हे तिरुपतीश्वरा मी तुझ्या चरणांशी येईन का ? तुझं हृदय माझ्यासाठी द्रवणार नाही का ? हे फुल कोमजण्याआधी स्वीकार. मला विशुद्ध परिपूर्ण समर्पण व्हायचं आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, ११ जून, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" ईश्वराभिमुख केलेले तुमचे भाव तुम्हाला परमेश्वर बनवतात. "

भाग - नववा

आत्मगीते 

हे रंगा, अंतर्बाह्य भरून राहिलास तू 
तव प्राप्तीची तळमळ, करी जीवन माझे दुःसह 
हे दीनरक्षका, सदाचरणा 
नसे मज कामना अमरत्वाची 
आस केवळ तव सान्निध्याची 
विसरलास का मज तू ? 
तूच सांग हे आहे का उचित ?

            अनेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या कवितेत मी म्हटले आहे. मला परमेश्वराचे सामीप्य हवे आहे. मला अमरत्वही नको. ते स्वतः या देहामध्ये भरून राहिले असल्यामुळे मला या जगात त्यांच्यापासून दूर राहून जगणे अशक्य आहे. मला केवळ परमेश्वराच्या सामीप्याची तळमळ लागून राहिली आहे. या तळमळीमुळेच माझा देह परमेश्वरमध्ये विलीन होईल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, ७ जून, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" ईश्वर प्रेम आहे, ह्या प्रेमाची अभिव्यक्ती हा मानवधर्म आहे. "

भाग - नववा

आत्मगीते 

हे वासुदेवा, ज्ञान नाही त्यासी राजनीतीचे 
जाणितो केवळ तो रासलीला 
अनुसरण न करी तो आपुल्या संस्कृतीचे 
चित्तचोर तो, चोरीले माझे हृदय त्याने 
त्याच्या दासाची ही दशा 
मान्य होईल का जगा ?
ना सत्य इथे ना प्रेम 
मुक्त कधी करणार मला तो, मुक्त कधी करणार? 

          या कवितेमध्ये मी वसुदेवाकडे त्याच्या पुत्राची तक्रार करते आहे. त्याला राजनीती शिकवली नाही. त्याला फक्त गोपगोपींबरोबरची रासलीला माहीत आहे. मी असेही सांगितले की, जिने आपले हृदय परमेश्वराला अर्पण करून गमावले आहे अशा दासीचा जग स्वीकार करणार नाही. मला हे असत्याचे व निष्प्रेम जीवन नको होते. 
           या कवितेच्या धर्तीवर मी श्री रंगनाथावर १०० कविता लिहिल्या. त्यांतल्या बहुतांशी कविता यशोदा, नंद आणि वसुदेव यांना उद्देशून लिहिल्या आहेत. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, ४ जून, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

         " जर आपले भाव शुद्ध असतील तर आपण शक्ती आणि उत्साह दोन्हीचा आनंद घेऊ शकतो."

भाग - नववा

आत्मगीते

मंदिरातील देव - देवतांची गीते 

श्रीरंगम 

अग यशोदे ,त्याला मी राधा वाटते का गोदा ?
तो मनोदशा माझी न जाणी, त्यास्तव ही चूक करीतसे 
त्याचे अखंड चिंतन, विदीर्ण अंतःकरण 
तू तर जाणतेस ना या माझ्या मनोवेदना 
मग समज दे जरा त्यास त्याची गैरवागणूक बदलण्या.
  
           मी यशोदेला सांगते आहे की, तिचा पुत्र माझी अवस्था जाणत नाही. माझ्यासारख्या साध्याभोळ्या स्त्रीला तो त्रास देतो. त्याला वाटते त्याप्रमाणे मी ना राधा आहे ना आंडाळ. 

*
उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम