गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " मन नेहमीच नाकारात्मकतेवर केंद्रित असते. त्याला सकारात्मक बनवा आणि म्हणा, " मी सर्वांवर प्रेम करतो.""
१४
आपत्संन्यास 

          कासव हे ज्यांनी संन्यास घेतला आहे त्याचे प्रतिनिधित्व करते. जीवन धोक्यात आल्यावर एखादा स्वतःचे जीवन परमेश्वरास अर्पण करून संन्यासी होतो. तो भौतिक जीवनाचा त्याग करतो. भगवद् गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की कासवांच्या पायाप्रमाणे इंद्रिये आत वळवायला हवीत. भौतिक सुखे क्षणाक्षणाला जीवन धोक्यात घालत असतात. तरीही माणूस त्यातून सुटण्याचा मार्ग न शोधता पुनः पुनः जन्म घेत राहतो. 
           पूर्वी मी राजाराम स्वामीजींची गोष्ट सांगितली होती. त्यांनी संन्यास घेण्याची प्रतिज्ञा केल्यावर त्यांचे प्राण वाचवले होते. जेव्हा एखादी व्यक्ती भौतिक सुखाचा त्याग करून त्याच जीवन परमेश्वरास अर्पण करते तेव्हा तो एकाप्रकारे नवीन जन्मच असतो. स्वामीजी जगासाठी मेले आणि त्यांचा पुनर्जन्म झाला. ते परमेश्वराचे दूत झाले. 
आपत्संन्यासामुळे जीवनात स्थित्यंतर येते. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " भौतिक वस्तूंमधून मिळणारी शांती ही खरी शांती नव्हे, याचे जेव्हा मनुष्याला ज्ञान होते आणि तो शांतीचा मूलस्त्रोत्र शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या आध्यात्मिक यात्रेचा प्रारंभ होतो." 
१४
आपत्संन्यास 

          आदिशंकर तीन वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले. त्यांचे आईवर अतोनात प्रेम होते. त्यांना संन्यास घ्यायचा होता, म्हणून त्यांनी आईची परवानगी मागितली. एक दिवस ते नदीवर स्नान करत असताना मगरीने त्यांचा पाय पकडला. त्यांनी सुटण्याची खूप धडपड केली पण व्यर्थ ! आपल्या मुलाचे प्राण धोक्यात आहेत, हे पाहून त्यांची आई ओरडू लागली. शंकर आपल्या आईला म्हणाले, " आई, जर तू मला संन्यास घेण्यासाठी परवानगी दिली, तर मगर मला सोडून देईल. मी संन्यास घेतला तर हा धोका टळेल आणि मी या देहात राहू शकेन. " शंकराच्या आईने परवानगी दिल्याबरोबर मगरीने त्यांना मुक्त केले. शंकर अत्यानंदाने ओरडले, " मी संन्यास घेतला, मी संन्यास घेतला. "
           मगरीने त्यांना तिच्या पकडीतून मुक्त केले. हा आहे आपत्संन्यास. 
           आकाशात मगरीची आकृती नजिकच्या काळात संभवणारा धोका दर्शवते.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

अहंकाररहित पुष्पे

 विमला दररोज अर्चना करण्यासाठी फुले तोडून एका परडीमध्ये ठेवते. आज मी अर्चना करत असताना,माझे पांढऱ्या फुलांकडे लक्ष गेले. सर्व फुले आकाराने व उंचीने एकसारखी होती. ती जरी सारखी असली तरीही त्यांच्यामध्ये फरक होता. ती सगळी सारखी होती मग फरक कसा?

मुक्ती निलयममध्ये ह्या पांढऱ्या फुलांनी बहरलेली अनेक झाडे आहेत. त्या फुलांचा खाली सडा पडलेला असतो. त्या फुलांना, माझे नाव,माझे जन्मस्थान, माझा वंश, माझी जात, अशी स्वतःची ओळख नाही. "मी" नाही . ती सर्व सारखीच आहेत. "मी ह्या झाडावर जन्मलो, तू त्या झाडावर जन्मलास." असे ती फुले कधीही म्हणत नाहीत. जर ती सगळी फुले एका परडीत ठेवली व एखाद्या झाडास दाखवली तर ते झाड सांगू शकणार नाही,"ही माझी फुले आहेत." हे आत्म्यासारखे आहे.

फुलांना त्यांचा जन्म झाल्याचे ठाऊक आहे परंतु त्यांचे पालक कोण आहेत हे ठाऊक नाही.
जर असे एखादे जगत असेल जेथे सर्व मानवजात ह्या फुलांसारखी असेल तर ते कसे असेल? तेथे तुमच्या आणि माझ्यामध्ये कोणताही भेद नसेल सर्वजण सारखे असतील.  हा मानवजातीतील बंधुभाव आहे, समस्त मानवजात एक  कुटुंब आहे. ही फुले मधाने भरलेली आहेत. हे वृक्ष खूप उंच आहेत आणि त्यांच्या
शेंड्यावर ही फुले उमलतात.मग ही मधाने भरलेली कशी? ह्या वृक्षांच्या
आतमध्ये मधाची निर्मिती करण्याची रचना आहे का? हा भूतलावर आलेला अश्वत्थ वृक्ष आहेत. हे भूतलावरील वैकुंठ आहे, नवनिर्मिती आहे.

विश्वामधील प्रत्येक नागरिक अमृतपुत्र आहे. सत्ययुग असेच असेल. सर्वजण
"मी"विरहित असतील. मानवाच्या शरीरात रक्ताऐवजी अमृतरक्त वाहील. शरीर अमृताने ओतप्रत भरलेले असेल. हे वृक्ष त्यांच्या अमृतावर पोसले जात नाहीत  त्यांच्यातील अमृताचे पाट बाहेर पाझरतात. हे सत्ययुगासारखे आहे.

- श्री वसंत साई अम्मा 
जय साईराम  

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
          " परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. सुरवातीला जरी ते यांत्रिकपणे होत असेल तरी नाम घेत राहा. भाव आपोआप येतील. "
१४
आपत्संन्यास 

तारीख २१ ऑक्टोबर २००७ 
           आम्ही सकाळचा अभिषेक करण्यासाठी गणेशमंदिराकडे गेलो. आम्ही ढगांमध्ये कासवाचे शरीर असलेली मानवाची आकृती पाहिली; त्याचे हात विस्तारलेले असून पंजावर 'V' होता. त्याच्या खाली जबडा फाकवलेली अक्राळविक्राळ मगर होती. आम्ही फोटो काढला. 
ध्यान 
वसंता - स्वामी, ढगांमध्ये दिसलेली आकृती काय दर्शवते ?
स्वामी - आपत्संन्यास दर्शवते. 
वसंता - मगर, कासव आणि माणूस या आकृत्या कशाचे प्रतिनिधित्व करतात ? 
स्वामी - आदिशंकरांना मगरीने जबड्यात पकडले तेव्हा ते म्हणाले की ते संन्यास घेतील. त्यांच्या आईने मान्यता दिली आणि मगरीने त्यांना सोडून दिले. मगररुपी संसारातून मुक्त होण्यासाठी माणूस संन्यास घेतो. त्यानंतर तो फक्त परमेश्वरासाठी जगतो. जगात राहूनही परमेश्वरासाठी कसे जगावे हे तू तुझ्या जीवनातून दखवते आहेस. तू पंचेंद्रियांवर ताबा मिळवलास आणि त्यांनतर मन आणि शरीर जिंकलेस. आजपर्यंत कोणीही शरीरावर विजय मिळवला नव्हता. सर्वांना परमेश्वराची अनुभूती मिळावी म्हणून तू संपूर्ण जग वसंतमयम् केलेस. 
वसंता - स्वामी, हातांवर 'V' असलेली आकृती कोणाची होती ?
स्वामी - ती वैष्णवी आहे. मगर तिला पकडीत घेण्याचा प्रयत्न करते आहे. ' मला वाचवा, मला वाचवा !' असा आक्रोश ती करते आहे. म्हणून तिने आपत्संन्यास घेऊन मुक्ती निलयमला यावे. 

ध्यानाची समाप्ती  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम

रविवार, १८ डिसेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 
       " तुमच्या सर्व कर्तव्यांचा त्याग करा. परमेश्वर प्राप्ती हेच तुमचे कर्तव्य आहे. "
१३
सामूहिक विवाह 

          स्वामींनी त्यांच्या प्रवचनात सांगितले की भिऊ नका, परमेश्वराचे नामस्मरण करा. हे ऐकल्यावर अनेकजण म्हणाले, ' स्वामींनी घाबरू नका म्हणून सांगितले आहे... साईभक्तांना काहीही होणार नाही. ' त्यांना वाटते, ' आपण स्वामींचे भक्त आहोत, आपल्याला काहीही होणार नाही. ' संकटकाळी कोणीही सहजपणे आपली जबाबदारी झटकून टाकतो. स्वामींच्या प्रवचनातून भक्त असा अर्थ काढू शकतात की त्यांना कसलेही भय नाही. तरीपण स्वामींनी सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी नामस्मरण केले नाही तर काय उपयोग ? तुम्ही नामस्मरण केलेत तरच तुम्हाला भय नाही. पुरात सर्व वाहून जाते, पूर साईभक्ताला वगळत नाही. 
           साईभक्तांवर मदत करण्याची सर्वात जास्त जबाबदारी आहे. इतर कोणाहीपेक्षा आपण अधिक नामस्मरण करायला हवे. जर तुम्ही सच्चे भक्त असाल तर स्वामींचा आदेश तंतोतंत पाळा. नामजपाला अधिक वेळ द्या आणि इतर विरंगुळयांना काट द्या. कमी बोला. अशा संकटकाळी सातत्याने नामजप करा. नाहीतर, सामूहिक कर्मांपासून तुमची सुटका नाही.  

संदर्भ - सत्ययुग आणि  कर्मकायदा

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम   

गुरुवार, १५ डिसेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
    " आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण म्हणजे परमेश्वरासोबत राहण्याची संधी होय."
१३
सामूहिक विवाह 

          पूर्वीच्या युगात लोकांनी तप आणि यज्ञ केले. आता परमेश्वर आपल्याला फक्त नामस्मरण करण्यास सांगत आहे. तुम्ही कोणाच्या नावाच्या जप करता किंवा तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे महत्वाचे नाही. बुद्ध, येशू, अल्ला, राम, इत्यादी परमेश्वराच्या अनेक नावांपैकी कोणाचेही नामस्मरण करा. सामूहिक कर्मातून मुक्त होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे; नाहीतर खूप मोठ्या संख्येने माणसे मारतील. 
           गांधीजी सामूहिक प्रार्थनेला महत्व देत असत. आता आपण वैश्विक प्रश्नाला सामोरे जात आहोत. अशा संकटकाळी प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखावी आणि जप करावा. येणार काळ अतिक्षय बिकट आहे, नेटाने काम करा. निदान वर्षभर तरी वायफळ गप्पा मारू नका. कोणाशीही अनावश्यक बोलू नका; आणि कृपा करून मोबाईल फोनवर बोलू नका; तुम्ही अवकाशात कचऱ्याची भर घालता. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

रविवार, ११ डिसेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
         " जेव्हा सत्य आणि प्रेम यांचा संयोग होतो तेव्हा प्रेम, ज्ञान आणि सत्य यावर अधिष्ठित नव्या विश्वाची निर्मिती होते. "
१३
सामूहिक विवाह 

         स्वामी आपल्याला सतत नामस्मरण करण्यास सांगताहेत. परमेश्वराचे नामस्मरण हाच कलिला एकमेव पर्याय आहे. 
        आपण दिवसातून तीन वेळा जेवतो, खरेदीला जातो, पण जप करायला बसतो का ? सर्वजण हे करू शकतात. ह्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू नका. जगभरातील लोकांसाठी ही गंभीर गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवता, तेव्हा तीन बोटे तुमच्यावर रोखलेली असतात. हे सर्व प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी आहे. परमेश्वराचे नाव दिवसातून २०,००० वेळा घेण्याची प्रतिज्ञा करा किंवा जितका जमेल तितका तरी जप करा. बोलण्यात वेळ वाया घालवण्यासाठी प्रतिज्ञा करा, ' मी दिवसातून २०,००० वेळा जप करिन. ' अशाप्रकारे, सर्वांनाच फायदा होईल. परमेश्वराने काही पर्वत गिळण्यास सांगितला नाही. शांतपणे बसून नामस्मरण करा. कमी बोला, जास्त जप करा. हे तुमच्या आणि जगाच्या कल्याणासाठी आहे. " 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

श्री वसंत साईंच्या अखंड साई चिंतनातून गवसलेली अनमोल रत्ने  
रत्न - १ 

           परमेश्वराच्या अनुसंधानात राहणे सोपे आहे का? जेव्हा आपण परमेश्वरामध्ये राहतो तेव्हा तो सुद्धा आपल्यामध्ये वास करतो. मनुष्याने दिवसाचे २४ तास निरंतर त्याच्या चिंतनात घालवले पाहिजेत, त्याच्याविषयी बोलले पाहिजे,त्याचे गुणगान केले पाहिजे.आपली पंचेंद्रिये त्याच्याठायी लीन झाली पाहिजेत -डोळ्यांनी केवळ परमेश्वरालाच  पाहिले पाहिजे, कानांनी केवळ त्याचाच आवाज ऐकला पाहिजे, जिभेने केवळ त्याच्याविषयी बोलले पाहिजे. जर पाचही इंद्रिये ईश्वराभिमुख केली तर ती भौतिक विषयांमध्ये बुडून जाणार नाहीत 
          आपण सर्वत्र परमेश्वराला कसे पाहू शकतो?
आपल्या चर्मचक्षूंनी आपण त्याला पाहू शकत नाही त्यासाठी आपल्या अंत:करणात त्याच्याप्रती उत्कट भक्ती असायला हवी आणि दिव्य दृष्टी व प्रेमचक्षु प्रदान करणारे ज्ञान असायला हवे. जेव्हा आपण प्रेमदृष्टीने सर्वत्र पाहु  तेव्हा आपल्याला सर्वत्र परमेश्वर दिसेल. हा 'ईशावास्यमिदं सर्वं' चा अर्थ आहे.
जेव्हा आपण सर्वत्र आणि सर्वांमधील परमेश्वरास जाणू शकू तेव्हा आपणही तोच आहोत, सर्वत्र आहोत आणि सर्वव्यापी आहोत हे  ज्ञान उदयास येईल.
आपण स्वतःला सर्वांपासून वेगळे कसे करू शकतो? असे करणे पाप आहे.जर परमेश्वराचे अस्तित्व नाही असे कोणतेही स्थान नाही तर मग आपण कोठे आहोत?आपले अस्तित्व नाही! नाही!नाही! मग कोणाचे अस्तित्व आहे, केवळ त्या एकमेव आद्वितीय परमेश्वराचे.
          जेव्हा 'मी' अस्तित्वात नाही तेव्हा 'माझे' चा प्रश्न येतोच कुठे? कोण माझा पती, माझी पत्नी, माझी मुले, माझे घर, माझा पैसा? जर मी नाहीच आहे तर मी 'माझे' म्हणूच कसे शकेन? एकदा आपल्याला हे परम ज्ञान प्राप्त झाले की आपले अस्तित्व परमेश्वरातच आहे हे आपल्याला ज्ञात होईल. जीवनमुक्त अवस्थेत असणारे अशा तऱ्हेने जीवन जगतात. कोणत्याही गोष्टीने अस्वस्थ होता कामा नया. आपण सदैव शांत राहीले पाहिजे.

श्री वसंतसाई अम्मा

साईराम, आज पासून प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला आपण Blog वर एक नवीन सदर ' रत्न ' ह्या नावाने सादर करत आहोत. आज पहिले रत्न -१ प्रकाशित केले आहे. 

जय साईराम 

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" परमेश्वराला अनुभूती घेण्यासाठी भूतलावर अवतरावे लागते. "
१३
सामूहिक विवाह 

सामूहिक कर्मांसाठी सामूहिक नामस्मरण 
          अलीकडेच मुंबईत झालेल्या बॉबस्फोटात, अनेक निरपराध्यांना प्राण गमवावे लागले. सर्वजण विचारताहेत, ' हे असे का ? ' जर दुष्ट लोकांना शिक्षा झाली, तर कोणी ' असे का ?' म्हणून विचारात नाहीत. ते म्हणतात, ' न्याय दिला गेला. ' परंतु जेव्हा निरपराध बळी पडतात, तेव्हा ते विचारतात, ' का, कसे, काय ?' जेव्हा त्सुनामी आली तेव्हाही असेच झाले होते. गरीब लोकांना सर्वात जास्त त्रास झाला. सर्वांनी ' असे का ? ' म्हणून विचारले. आता संपूर्ण जग चिंताजनक काळाला तोंड देत आहे. आर्थिक जगतात आणि रोख्यांच्या खरेदी-विक्री बाजारात मंदी आली आहे, सर्वांचे पैसे बुडताहेत. हे सर्व दुष्टांच्या कृत्यामुळे होते. त्यांचे विचार अवकाशात जातात, पंचमहाभूते प्रदूषित होतात आणि ती अस्थिर होतात. निसर्ग त्याचा क्रोध अनेक उत्पातांमधून दर्शवितो. 
           सध्याच्या परिस्थितीसाठी आपण दुसऱ्यांना दोष देऊ नये. आपण सर्वजण जबाबदार आहोत. तुम्ही स्वतःचा विचार करा. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. अशा चिंताजनक वेळी ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जीवन अतिशय कष्टाचे आहे. कधीही संकट कोसळू शकते याची जाणीव असू द्या. प्रयत्न करा, स्वतःला बदला. 
           स्वामी ख्रिसमसच्या प्रवचनात म्हणाले, ' काळजी करू नका. परमेश्वराचे नामस्मरण करा. '

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

रविवार, ४ डिसेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" सौंदर्य भक्तिचे दुसरे नावं आहे. "
१३
सामूहिक विवाह 

          सामूहिक कर्मांमुळे जगातील अनेक चांगली माणसेसुद्धा बळी पडत आहेत. परंतु संहारास कारणीभूत असणाऱ्यांना परमेश्वर शिक्षा न करता फक्त साक्षी राहतो. दुष्ट विचारांमुळे पंचमहाभूते प्रदूषित होतात आणि हेच उत्पातांचा कारण असतं. प्रत्येक अवतारात इतिहासाची उजळणी होत असते. जेव्हा अवतार पृथ्वीवर अवतरून धर्मस्थापना करतो, तेव्हा काहीजण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात. हेच मोठ्या संहाराचे कारण असते. 
           जेव्हा प्रत्येक अवताराला त्रास होतो, तेव्हा उत्पात होतात. परंतु अवतार प्रत्यक्षपणे कुठलाही संहार करत नाही. त्याच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करणाऱ्यांना ते साधन बनवतात. जसे काट्याने काटा काढला जातो किंवा हिरा कापण्यासाठी हिराच वापरला जातो; तसेच विध्वंसासाठी काही दुष्टांना साधन केले जाते. अशाप्रकारे, धर्मस्थापना होते आणि अवतार पृथ्वीवरून परत जातात.
 
संदर्भ - सत्ययुगआणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
    " कोणत्याही एकाग्रतेने व मनःपूर्वक केलेल्या कृतीमधून प्रेम प्रकट होते. "
१३
सामूहिक विवाह
 
           उत्पातांच्या आधारे तुम्ही तुमच्या स्वतःच्याच संहारास आणि सामूहिक संहारास कारणीभूत होत आहात. स्वामींना जे हवे आहे ते करू द्या, त्यांच्या कार्यात ढवळाढवळ करू नका. ते परमेश्वर आहेत. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम