ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
अहंकाररहित पुष्पे
विमला दररोज अर्चना करण्यासाठी फुले तोडून एका परडीमध्ये ठेवते. आज मी अर्चना करत असताना,माझे पांढऱ्या फुलांकडे लक्ष गेले. सर्व फुले आकाराने व उंचीने एकसारखी होती. ती जरी सारखी असली तरीही त्यांच्यामध्ये फरक होता. ती सगळी सारखी होती मग फरक कसा?
मुक्ती निलयममध्ये ह्या पांढऱ्या फुलांनी बहरलेली अनेक झाडे आहेत. त्या फुलांचा खाली सडा पडलेला असतो. त्या फुलांना, माझे नाव,माझे जन्मस्थान, माझा वंश, माझी जात, अशी स्वतःची ओळख नाही. "मी" नाही . ती सर्व सारखीच आहेत. "मी ह्या झाडावर जन्मलो, तू त्या झाडावर जन्मलास." असे ती फुले कधीही म्हणत नाहीत. जर ती सगळी फुले एका परडीत ठेवली व एखाद्या झाडास दाखवली तर ते झाड सांगू शकणार नाही,"ही माझी फुले आहेत." हे आत्म्यासारखे आहे.
फुलांना त्यांचा जन्म झाल्याचे ठाऊक आहे परंतु त्यांचे पालक कोण आहेत हे ठाऊक नाही.
जर असे एखादे जगत असेल जेथे सर्व मानवजात ह्या फुलांसारखी असेल तर ते कसे असेल? तेथे तुमच्या आणि माझ्यामध्ये कोणताही भेद नसेल सर्वजण सारखे असतील. हा मानवजातीतील बंधुभाव आहे, समस्त मानवजात एक कुटुंब आहे. ही फुले मधाने भरलेली आहेत. हे वृक्ष खूप उंच आहेत आणि त्यांच्या
शेंड्यावर ही फुले उमलतात.मग ही मधाने भरलेली कशी? ह्या वृक्षांच्या
आतमध्ये मधाची निर्मिती करण्याची रचना आहे का? हा भूतलावर आलेला अश्वत्थ वृक्ष आहेत. हे भूतलावरील वैकुंठ आहे, नवनिर्मिती आहे.
विश्वामधील प्रत्येक नागरिक अमृतपुत्र आहे. सत्ययुग असेच असेल. सर्वजण
"मी"विरहित असतील. मानवाच्या शरीरात रक्ताऐवजी अमृतरक्त वाहील. शरीर अमृताने ओतप्रत भरलेले असेल. हे वृक्ष त्यांच्या अमृतावर पोसले जात नाहीत त्यांच्यातील अमृताचे पाट बाहेर पाझरतात. हे सत्ययुगासारखे आहे.
- श्री वसंत साई अम्मा
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा