रविवार, २५ डिसेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " भौतिक वस्तूंमधून मिळणारी शांती ही खरी शांती नव्हे, याचे जेव्हा मनुष्याला ज्ञान होते आणि तो शांतीचा मूलस्त्रोत्र शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या आध्यात्मिक यात्रेचा प्रारंभ होतो." 
१४
आपत्संन्यास 

          आदिशंकर तीन वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले. त्यांचे आईवर अतोनात प्रेम होते. त्यांना संन्यास घ्यायचा होता, म्हणून त्यांनी आईची परवानगी मागितली. एक दिवस ते नदीवर स्नान करत असताना मगरीने त्यांचा पाय पकडला. त्यांनी सुटण्याची खूप धडपड केली पण व्यर्थ ! आपल्या मुलाचे प्राण धोक्यात आहेत, हे पाहून त्यांची आई ओरडू लागली. शंकर आपल्या आईला म्हणाले, " आई, जर तू मला संन्यास घेण्यासाठी परवानगी दिली, तर मगर मला सोडून देईल. मी संन्यास घेतला तर हा धोका टळेल आणि मी या देहात राहू शकेन. " शंकराच्या आईने परवानगी दिल्याबरोबर मगरीने त्यांना मुक्त केले. शंकर अत्यानंदाने ओरडले, " मी संन्यास घेतला, मी संन्यास घेतला. "
           मगरीने त्यांना तिच्या पकडीतून मुक्त केले. हा आहे आपत्संन्यास. 
           आकाशात मगरीची आकृती नजिकच्या काळात संभवणारा धोका दर्शवते.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा