ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. सुरवातीला जरी ते यांत्रिकपणे होत असेल तरी नाम घेत राहा. भाव आपोआप येतील. "
१४
आपत्संन्यास
तारीख २१ ऑक्टोबर २००७
आम्ही सकाळचा अभिषेक करण्यासाठी गणेशमंदिराकडे गेलो. आम्ही ढगांमध्ये कासवाचे शरीर असलेली मानवाची आकृती पाहिली; त्याचे हात विस्तारलेले असून पंजावर 'V' होता. त्याच्या खाली जबडा फाकवलेली अक्राळविक्राळ मगर होती. आम्ही फोटो काढला.
ध्यान
वसंता - स्वामी, ढगांमध्ये दिसलेली आकृती काय दर्शवते ?
स्वामी - आपत्संन्यास दर्शवते.
वसंता - मगर, कासव आणि माणूस या आकृत्या कशाचे प्रतिनिधित्व करतात ?
स्वामी - आदिशंकरांना मगरीने जबड्यात पकडले तेव्हा ते म्हणाले की ते संन्यास घेतील. त्यांच्या आईने मान्यता दिली आणि मगरीने त्यांना सोडून दिले. मगररुपी संसारातून मुक्त होण्यासाठी माणूस संन्यास घेतो. त्यानंतर तो फक्त परमेश्वरासाठी जगतो. जगात राहूनही परमेश्वरासाठी कसे जगावे हे तू तुझ्या जीवनातून दखवते आहेस. तू पंचेंद्रियांवर ताबा मिळवलास आणि त्यांनतर मन आणि शरीर जिंकलेस. आजपर्यंत कोणीही शरीरावर विजय मिळवला नव्हता. सर्वांना परमेश्वराची अनुभूती मिळावी म्हणून तू संपूर्ण जग वसंतमयम् केलेस.
वसंता - स्वामी, हातांवर 'V' असलेली आकृती कोणाची होती ?
स्वामी - ती वैष्णवी आहे. मगर तिला पकडीत घेण्याचा प्रयत्न करते आहे. ' मला वाचवा, मला वाचवा !' असा आक्रोश ती करते आहे. म्हणून तिने आपत्संन्यास घेऊन मुक्ती निलयमला यावे.
ध्यानाची समाप्ती
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा