ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुमच्या सर्व कर्तव्यांचा त्याग करा. परमेश्वर प्राप्ती हेच तुमचे कर्तव्य आहे. "
१३
सामूहिक विवाह
स्वामींनी त्यांच्या प्रवचनात सांगितले की भिऊ नका, परमेश्वराचे नामस्मरण करा. हे ऐकल्यावर अनेकजण म्हणाले, ' स्वामींनी घाबरू नका म्हणून सांगितले आहे... साईभक्तांना काहीही होणार नाही. ' त्यांना वाटते, ' आपण स्वामींचे भक्त आहोत, आपल्याला काहीही होणार नाही. ' संकटकाळी कोणीही सहजपणे आपली जबाबदारी झटकून टाकतो. स्वामींच्या प्रवचनातून भक्त असा अर्थ काढू शकतात की त्यांना कसलेही भय नाही. तरीपण स्वामींनी सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी नामस्मरण केले नाही तर काय उपयोग ? तुम्ही नामस्मरण केलेत तरच तुम्हाला भय नाही. पुरात सर्व वाहून जाते, पूर साईभक्ताला वगळत नाही.
साईभक्तांवर मदत करण्याची सर्वात जास्त जबाबदारी आहे. इतर कोणाहीपेक्षा आपण अधिक नामस्मरण करायला हवे. जर तुम्ही सच्चे भक्त असाल तर स्वामींचा आदेश तंतोतंत पाळा. नामजपाला अधिक वेळ द्या आणि इतर विरंगुळयांना काट द्या. कमी बोला. अशा संकटकाळी सातत्याने नामजप करा. नाहीतर, सामूहिक कर्मांपासून तुमची सुटका नाही.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा