ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मन नेहमीच नाकारात्मकतेवर केंद्रित असते. त्याला सकारात्मक बनवा आणि म्हणा, " मी सर्वांवर प्रेम करतो.""
१४
आपत्संन्यास
कासव हे ज्यांनी संन्यास घेतला आहे त्याचे प्रतिनिधित्व करते. जीवन धोक्यात आल्यावर एखादा स्वतःचे जीवन परमेश्वरास अर्पण करून संन्यासी होतो. तो भौतिक जीवनाचा त्याग करतो. भगवद् गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की कासवांच्या पायाप्रमाणे इंद्रिये आत वळवायला हवीत. भौतिक सुखे क्षणाक्षणाला जीवन धोक्यात घालत असतात. तरीही माणूस त्यातून सुटण्याचा मार्ग न शोधता पुनः पुनः जन्म घेत राहतो.
पूर्वी मी राजाराम स्वामीजींची गोष्ट सांगितली होती. त्यांनी संन्यास घेण्याची प्रतिज्ञा केल्यावर त्यांचे प्राण वाचवले होते. जेव्हा एखादी व्यक्ती भौतिक सुखाचा त्याग करून त्याच जीवन परमेश्वरास अर्पण करते तेव्हा तो एकाप्रकारे नवीन जन्मच असतो. स्वामीजी जगासाठी मेले आणि त्यांचा पुनर्जन्म झाला. ते परमेश्वराचे दूत झाले.
आपत्संन्यासामुळे जीवनात स्थित्यंतर येते.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा