रविवार, ३० एप्रिल, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" निर्मल हृदयामधून सत्य प्रकाशमान होते. "
१. 
मी स्वतःस अलग करते 

          वयाच्या चौदाव्या वर्षी स्वामींनी जाहीर केले की ते परमेश्वर आहेत. तरुणपणी त्यांनी अनेक चमत्कार, लीला केल्या. त्यांनी त्यांचा भूत, वर्तमान, भविष्यकाळही सांगितला.  माणसे घोळक्यांनी त्यांच्याभोवती जमू लागली. जसजशी त्यांच्या दिव्यत्वाची बातमी पसरू लागली, तसतशी घोळक्यांची जागा जथ्यानी घेतली. एवढ्या जनसमुदायाला शिस्तबद्ध करण्यासाठी सेवादल कार्यरत झालं. संस्था स्थापना झाली. भजनग्रुप निर्माण झाले; महत्वाच्या गावांमध्ये समित्या स्थापना झाल्या. सेवादलांची संख्या वाढली. समित्या वाढल्या ; प्रथम प्रत्येक गावात समिती होती. त्यानंतर देशभरात समित्या निर्माण झाल्या. आता जगातील प्रत्येक देशात समित्या आहेत. स्वामी परमेश्वराचा अवतार आहेत हे आता जगमान्य आहे. मी भक्ताच्या अवस्थेत आहे. 
          माझी परमेश्वरभक्ती अगदी लहान असतानाच सुरु झाली आणि माझ्या वयाबरोबर ती वाढत गेली. स्वामींसाठी, भक्तगण वाढत गेले; माझ्यासाठी भक्ती वाढत गेली. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " देहभावाचा त्याग केल्यानंतर सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो."
प्रस्तावना 

           १ मार्च २००९ ला पुट्टपर्तीत स्वामींनी मला लक्ष्मीगुहा लिंग दिले. याबद्दल मी ' ब्रिलियन्स ऑफ अ मिलीयन सन्स ' या पुस्तकात दोन प्रकरणात लिहिले आहे. जर मी देव आहे तर मला तपश्चर्या करायची गरजच काय ? या मानवी देहात जन्म घेण्याआधीसुद्धा मी तपश्चर्या केली आहे. जन्मापासून आजमितीपर्यंत माझं संपूर्ण आयुष्य हे फक्त तपश्चर्येसाठीच आहे. 
           माणसाच्या कर्मांच्या परिणामांमध्ये परमेश्वर हस्तक्षेप करू शकत नाही. तो कर्मकायदा तोडू शकत नाही. म्हणूनच, त्याची शक्ती, एक स्त्री म्हणून जन्माला येऊन अश्रू, ध्यास आणि तपश्चर्येने कर्मकायदा बदलते. याच कार्यासाठी, परमेश्वराची शक्ती म्हणून असलेली माझी भूमिका गुप्त राहिली आहे. ' 
- वसंता साई 
*     *     *

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, २३ एप्रिल, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार - १६ जानेवारी 
" केवळ भगवतभक्ती म्हणजेच प्रेम. बाकी सर्व आसक्ती आहे."

         प्रेम म्हणजे काय? केवळ भगवंतावरील प्रेम म्हणजे भक्ती. आपलं पती - पत्नी, आई - वडील, बहीण - भाऊ या सर्वांप्रती असलेलं प्रेम काही खरं नसतं, ती आसक्ती असते. भगवंतावरील निर्व्याज प्रेम ही शुद्ध भक्ती आहे. कौटुंबिक जिव्हाळा म्हणजे निव्वळ आसक्तीच. भक्ती म्हणजे अतिशय शुद्ध आणि पवित्र प्रेम.  प्रेम भक्ती ही फक्त आणि फक्त भगवंताशी जोडलेली असते. अनेक जण म्हणतात, 'माझा भगवंताप्रती असलेला भक्तीभाव प्रेमभक्तीचा आहे.'  अनेक जण भगवंतावर प्रेम करतात. परंतु ते शुद्ध प्रेम नसतं. ते भौतिक पातळीवरचं प्रेम करतात. असे अनेक भक्त आहेत आणि त्यांच्या बद्दल मी 'चमत्कार माया' ह्या पुस्तकात लिहिलंय. एक व्यक्ती म्हणाली,'स्वामींना माझ्या बोटाला स्पर्श करायची इच्छा असते.' हे तिच्या कामभावनेचं प्रतिबिंब आहे. अशा पद्धतीनं त्या व्यक्ती स्वामींशी स्वतःस जोडायचा प्रयत्न करतात. ही शुद्ध भक्ती नाहीये. भक्तीचे नऊ मार्ग आहेत. त्यातील कुठलाही एक मार्ग निवडून तुम्ही त्या मार्गावरून वाटचाल करू शकता. कृपा करून भगवंताप्रती भौतिक प्रेम आणि काम वासना ठेवू नका. प्रेमभक्ती म्हणजेच   मधुरभक्ती अत्यंत शुद्ध आणि पवित्र भक्ती असते. जयदेव, गौरांग, मीरा अशा महान भक्तांनी ही भक्ती केली. त्यांनी दाखवून दिलं की, ही भक्ती देह भावाच्या पलीकडील आहे.त्यांची भक्ती भावदेहातील होती. त्यांच्या दृष्टीनं अंतर्यामी भगवंत पुरुष आणि ते स्वतः स्त्री होते. ह्या भावाद्वारे त्यांनी भगवंतावर प्रेमाचा वर्षाव केला. ही प्रेमभक्ती आहे. 
       माझं प्रेम केवळ भगवान सत्य साईंकरिताच आहे. माझ्या भक्तीनं बदल्यात कसलीही अपेक्षा केली नाही. मी भगवंतावर ६३ वर्षं प्रेम वर्षाव केला. अखेरीस त्यांनी सांगितलं, 'तू राधा आहेस,दुर्गा आहेस' आणि बरंच काही.
        आजतागायत मी स्वामींना आई मानले  आणि लहान मूल जसं आईकडे त्याचे भाव व्यक्त करेल तसेच मी केले. स्वामी माझ्याशी बोलायला लागल्यानंतरच मी मधुर भक्तीचा मार्ग स्वीकारला. स्वामींनीच मला सांगितलं की मी मातृभाव भक्ती न करता मधुर भक्ती करावी.स्वामींनी मला अनेक अवस्था प्रदान केल्या,पण मी सर्वच्या सर्व दूर सारल्या. माझ्या तपाची  फळं मी जसजशी दूर सारत गेले तसतशी माझ्या तपाची शक्ती वाढत गेली. असं झाल्यामुळं मी वैश्विक मुक्ती मागू शकले. माझ्या एकाग्र भक्तीमुळे स्वामी प्रसन्न झाले, माझी इच्छा  पूर्ण करण्यास तयार झाले. आणि त्यांनी सर्वांची कर्मं आपल्या देहावर घेतली. हे सर्व माझं स्वार्थरहित निरपेक्ष प्रेम दर्शवतं. मला माझ्यासाठी काहीही नकोय,त्यामुळे भगवान माझ्या भक्तीचा ऋणी होतो,आणि माझ्या भक्तीचं ऋण फेडण्यासाठी अजून एक जन्म घेतो. ह्या ऋणामुळेच त्यांचं नाव प्रेमसाई होतं आणि माझं प्रेमा. हे सत्य,निर्मल,पवित्र प्रेम आहे. 
        लौकिक प्रेम म्हणजे निव्वळ आसक्ती असते, कारण तिथे बदल्यात काही ना काही अपेक्षा असते. मुलांनी त्यांच्या वंशाचं नाव उज्ज्वल करावं असं त्यांच्या पालकांना वाटत असतं. त्यांना नाव, प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा हवी असते. हे आशाआकांक्षानी भरलेल्या लौकिक जगाचं स्वरूप आहे. नवऱ्यानं आपल्यासाठी दागिने करावेत आणि इतर मौज मजा करावी असं बायकोला वाटत असतं . ह्या सर्व नातेसंबंधांमध्ये अपेक्षा आहे.खरं तर दुसऱ्याकडून काय मिळेल यांवरच ही नाती अवलंबून असतात.

जय साईराम 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार
" परमेश्वर सत्यस्वरूप आहे. "
प्रस्तावना 

          मी इथे मातृभाव व्यक्त करण्यास आले आहे. मी जगन्माता आहे. माझ्या करुणेमुळे मी इथे आले आहे. योग्य रस्ता दिसत नसल्यामुळे माणसं अंधःकाराच्या गर्तेत सापडतील. त्यांना सत्याची जाणीवच नाहीये. म्हणून मी जन्म घेतला आहे. 
          स्वामी म्हणतात, " तू माझी दयादेवी आहेस." परमेश्वराची करुणा शरीर धारण करून पृथ्वीवर अवतरते, सत्तर वर्षे तपश्चर्या करते. स्वामी म्हणाले, "जगाची दुःखं नाहीशी करण्यासाठी तपश्चर्या करण्यास तू इथे आलीस. प्रथम तू हृषिकेशच्या पुढे असलेल्या लक्ष्मी गुहेत लिंगासमोर तपश्चर्या केलीस. मी गुहेत आलो आणि तुला सांगितले की जगातील लोकांचा उद्धार करण्यासाठी मी तीन अवतार घेईन. त्यानंतर मी शिर्डीबाबा म्हणून आली, तेव्हा मी तुला माझ्यामध्ये सामावले. सत्यसाई अवतारात तू ज्योतीस्वरुपात माझ्यापासून अलग झालीस आणि तुझ्या आईच्या उदरात प्रवेश केलास. त्यानंतर तुझा जन्म झाला. " 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, २० एप्रिल, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
      " माया सत्यावर आवरण घालते. एकोहम् बहुस्यामी (एकातून अनेकत्व) हे सत्य जाणून घ्या. "
प्रस्तावना 
          
        अगदी लहान वयापासून मला आजार, वृध्दावस्था आई मृत्युची भीती वाटत असे. ह्या सर्वांपासून सुटका करून घेण्यासाठी परमेश्वरप्राप्ती हाच एकमेव मार्ग आहे हे माझ्या लक्षात आले. मी परमेश्वराचा ध्यास घेतला, सतत रडले आणि शेवटी त्याची प्राप्ती केली. जगातील अनेक समस्या पाहून त्यांची दुःखे हलकी करण्यासाठी मला काहीतरी करायचे होते. याचवेळी मला अनेक देवदेवतांकडून निरनिराळ्या शक्ती मिळाल्या. ह्या शक्ती मला अनेकांना मदत करण्यास साह्यभूत झाल्या. कर्मे नाहीशी करण्यासाठी इ दुर्गाशक्ती दिली. शेकडो लोकांना त्याचा लाभ झाला. हजारो लोकांना, नद्यांना व सागरांना मी प्रेमशक्ती दिली. माझं प्रेम विस्तृत झालं आणि  कर्म कमी झाली. स्वामी म्हणले, " प्रेम विस्तृत कसे होते आणि त्यामुळे कर्म कमी  कशी होतात हे तुझ्या जीवनातून दिसते. " ते म्हणाले की जेव्हा मी काही जणांच्या घरी राहते तेव्हा त्या घरातील सर्वांची कर्म नाहीशी होतात. 
           परमेश्वरावर केलेला प्रेमाचा वर्षाव वाढत जात त्यात संपूर्ण जग सामावले गेले. मी सर्वांवर प्रेम करते, अगदी मला दुःख देणाऱ्यांवरही. एका बाजूला मी प्रेमवर्षाव करते आणि दुसरीकडे कर्मसंहार करण्याचा प्रयत्न करते. या दोन कृतींमुळे जगामध्ये परिवर्तन होत आहे. दुखी पिडीतांवरील माझी करुणा, जगाचं परिवर्तन करते आहे. कर्मकायद्यावरील उपाय कोण बरं लिहू शकले ? कर्मकायदा हा परमेश्वराचा कायदा आहे. सवाई अवतार असल्यामुळे कायदा तोडू शकत नाहीत. म्हणूनच ते माझ्या रूपात आले. माझ्या एकचित्त तपश्चर्येद्वारे ते उपाय सांगत आहेत. या पुस्तकात मी त्याचे विवरण केले आहे.
 
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १६ एप्रिल, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
    " मनुष्याने त्याचे भाव, विचार आणि विवेक आध्यात्मिक ध्येयावर केंद्रित केल्यास त्याला ज्ञान प्राप्त होते. "
प्रस्तावना 

            ' सत्ययुग आणि कर्मकायदा ' हे पुस्तक लिहिल्यानंतर माझ्या मनात सतत विचार येत असे, ' कर्म संपवण्यासाठी काय करता येईल ? कोणता उपाय आहे ?' मी ' वैश्विक कृतज्ञता ' नावाचे प्रकरण लिहिले .  मला वाटले की हाच तो उपाय !
           १४ फेब्रुवारी २००९ ला स्वामींनी मुद्दनहळ्ळी. इथे पाहिल्यावर मला खूप आनंद झाला. स्वामींनी प्रवचनाची सुरुवात " मधुरभाव, मातृभाव " या दोन शब्दांनी केली. 
            परमेश्वराप्रती असलेला माझा मधुरभाव हा मातृभावात विस्तारित झाला. परमेश्वरावर असलेले एकाग्र प्रेम विस्तारित होऊन ते मातृभाव आणि मातृप्रेम झाले. ' मला कृष्णाशी लग्न करायचे आहे' ही इच्छा मधुरभाव दर्शवते. वयाच्या पाचव्या वर्षी माझ्या मनात ही इच्छा का बरे निर्माण झाली ? याचं कारण मी त्यांची शक्ती आहे. स्वामी आणि मी इथे फक्त अवतारकार्यासाठी आलो आहोत. माझी मधुराभक्ती परिपक्व झाल्यावर माझ्या मनात विचार आला, " संपूर्ण जग माझ्या आणि स्वामींच्या पोटी  पाहिजे. " ही इच्छा म्हणजेच मातृभाव. मातृभाव म्हणजे मधुरभावाचे विस्तारित रूप. परमेश्वर स्वतःला पुरुष आणि प्रकृती या दोहोंमध्ये अलग करतो. एक भाग सत्यसाईबाबा म्हणून पृथ्वीवर अवतार घेतो. दुसरा भाग हा अवताराची शक्ती, इथे मी , सृष्टी म्हणून आले. आम्ही युगपरिवर्तन करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. ह्या अवतार कार्यासाठी परमेश्वराने स्वतःपासून स्वतःला दोहोंत अलग केले आहे. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
वाचकांसाठी सूचना 

       आतापर्यंत आपण ब्लॉगवर श्री वसंत साई अम्मा लिखित 'सत्ययुग आणि कर्मकायदा' हे संपूर्ण पुस्तक प्रकाशित केले . आज पासून ब्लॉगवर श्री वसंत साई आम लिखित 'कर्मकायद्यावर उपाय' हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत. 

     कर्मकायदा हा परमेश्वराचा कायदा आहे. स्वामी अवतार असल्यामुळे कायदा तोडू शकत नाहीत. कर्म कायद्यावरील उपाय कोण बरं लिहू शकेल. म्हणूनच ते माझ्या रूपात आले. माझ्या एकचित्त तपश्चर्येद्वारे ते उपाय सांगत आहेत. 
- श्री वसंता साई 

स्वामी 'कर्मकायद्यावर उपाय' हे पुस्तक स्वीकारतात.
 
आम्ही स्वामींना अर्पण केलेले हे पुस्तक ११ जून २००९ रोजी, साई कुलवंत हॉलमध्ये संध्याकाळच्या दर्शनाच्यावेळी स्वामींनी एका भक्ताकडून स्वीकारले.* स्वामींनी लगेचच अतिशय आनंदाने त्याच्यावर नजर टाकली आणि नंतर विद्यापीठाच्या उपकुलगुरुंकडे पहिली प्रत देऊन त्याचे प्रकाशन केले. 

* 'मुक्ती इथेच या क्षणी' या माझ्या पहिल्या पुस्तकापासून सुरु झालेला कर्मसंहार ह्या पुस्तकाने संपला. स्वामींनी स्वीकारल्यानंतरच माझ्या सर्व पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. 
-वसंता 

कर्मकायद्यावर उपाय 

वसंता साई 

समर्पण 
स्वामी, 
          मी कर्मकायद्यावर उपाय आणि मला स्वतःला आपल्या चरणकमलांशी अर्पण करते. कृपाकरुन याचा स्वीकार करा आणि जगाच्या उद्धारासाठी कृपेचा वर्षाव करा. 
फक्त तुमच्याचसाठी जगणारी 
वसंता साई 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ९ एप्रिल, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
श्री वसंतसाईंच्या अखंड साई चिंतनातून गवसलेली अनमोल रत्ने
रत्न - ३
ध्यानाची तयारी

         ध्यान करण्यासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे एकाग्रता. परमेश्वराच्या चिंतनात क्षणभरही खंड पाडू नका. हे करण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये काही मर्यादा घालून घेतल्या पाहिजेत  ज्यामुळे आपले प्रयत्न केंद्रीत होऊन आपली स्वयंशिस्त वाढेल. प्रत्येक क्षणी आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे.' मी वाजवीहून अधिक खाल्ले का? अधिक झोप घेतली का? वा अधिक बोलले का?' अशा पद्धतीने आत्मपरीक्षणाचा अभ्यास केला पाहिजे. आपण दैनंदिन वेळापत्रक तयार करायला हवे आणि त्या नियोजित वेळेनुसार गोष्टी केल्या पाहिजेत.
          आपले जीवन ध्यानामध्ये समाविष्ट करणे - हे आपल्या जीवनाचे ध्येय असायला हवे. हे ध्यान आहे. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी, आपल्याला सर्वत्र आणि प्रत्येक गोष्टीमध्ये, सदैव परमेश्वराला पाहण्याची दृष्टी असणे आवश्यक आहे. आपण आपल्या पंचेंद्रियांना प्रशिक्षित केले पाहिजे.
" सर्व परमेश्वराशी जोडणे." असे या प्रशिक्षणाला म्हटले जाते.वैराग्य व विवेक जगाला तोडून टाकते.
          आपल्या स्वतःला प्रशिक्षित करण्यासाठी स्वामींनी दिलेल्या सर्व मुद्द्यांचा आपण वापर केला पाहिजे. जेव्हा आपण या सर्व गोष्टी करू तेव्हा आपले ध्यान यशस्वी होईल. प्रत्येक क्षणी स्वतःला परिपूर्ण बनवल्यानंतर ध्यान आपोआपच लागेल. भक्तीसाठी या सूत्राचा वापर केल्यास ध्यान स्वाभाविकपणे होईल.

-- श्री वसंत साई अम्मा 🕉
🌸ॐ श्री साई वसंत साईसाय नम:🌸
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " विनयशीलता, निरहंकारी मन आणि अढळ श्रद्धा या गुणांसहित मार्गक्रमण करणाऱ्यास निश्चित यशप्राप्ती होते. "
१४
समारोप
 
         सत्ययुगात सर्वजण परमेश्वरासोबत आनंदात राहतील. तरीसुद्धा, ज्यांची कर्म बाकी आहेत, ते पुढील कलियुगात पुन्हा जन्म घेतील. 
         उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जत्रेला जाता. तिथली दुकाने, खेळ, सुंदर आरास, नृत्ये, गाणी आणि प्रदर्शने इत्यादी मनोरंजनाचा मनमुराद आस्वाद घेता. तुम्ही सर्वांचा अनुभव घेता आणि घरी परत जाता. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तुमच्या कामाला सुरुवात करता. मी जे सांगते आहे ते असेच आहे. तुम्ही १००० वर्षे आनंदात घालवाल आणि त्यानंतर तुमच्या कर्माच्या ओझ्यासह पुन्हा जन्म घ्याल आणि तुमचे जुने आयुष्य जगण्यास सुरुवात कराल. तुम्हाला शाश्वत आनंद हवा आहे का ? तुम्ही जत्रेच्या मनोरंजनाप्रमाणे अनुभवलेला अशाश्वत आनंद पुरेसा नाही का ? शाश्वत आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. या, आपण सर्वजण एकत्र येऊन मुक्तीचा अनुभव घेऊ या. मनःपूर्वक प्रार्थना करा. स्वामी तुम्हाला मदत करतील.
 
जय साईराम 
सत्यमेव जयते 
सत्यसाई जयतु 
 

गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " आत्मसाक्षात्कारी जीव निर्वात जागी ठेवलेल्या दीपाच्या स्थिर आणि दैदिप्यमान ज्योतीसारखा सदैव तेजाने तळपत असतो. "
१४
समारोप 

          गुन्हेगार शिक्षेतून सुटण्याचे मार्ग शोधत असतो. लोक त्यांच्या चुका इतरांपासून लपवायचा प्रयत्न करतात. तुम्ही न्यायालयाच्या शिक्षेतून सुटू शकता पण स्वतःपासून लपू शकत नाही. तुमच्या प्रत्येक कृतीला प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी असतो. तोच तुम्हाला जन्ममृत्युच्या चक्रात ढकलत असतो. हाच कर्माचा कायदा होय. तुमची त्यापासून जराही सुटका नाही. तरीसुद्धा स्वामी तुम्हाला अनोखी संधी देत आहेत. आत्ताच खडतर प्रयत्न करा. मुक्ती मिळू शकेल जर तुम्ही स्वतःला कर्माच्या कायद्यापासून मुक्त केलेत, तर तुम्ही परमेश्वरासोबत १००० वर्षे राहून परमेश्वरात विलीन होऊ शकता. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात.....  
जय साईराम 

रविवार, २ एप्रिल, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " एखादी गोष्ट अनुभवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. हा जगाचा कायदा आहे. "

१४

समारोप 


तारीख ६ जानेवारी २००९ ध्यान 

वसंता - स्वामी, कृपाकरुन प्रस्तावना आणि समारोपासाठी काही सांगा. 

स्वामी - या जगात पाप करणाऱ्या सर्व पापींना शिक्षेपासून सुटका हवी आहे. खटल्याची प्रथम कनिष्ठ न्यायालयात सुनावणी होते. त्या कोर्टात दोषी ठरल्यास, आरोपी वरिष्ठ न्यायालयात दाद मागतो. जर वरिष्ठ न्यायालयात त्याचे अपील फेटाळले गेले, तर तो सर्वोच्च न्यायालयात अपील करतो. आरोपी  देऊन आणि वकिलाच्या हुशार युक्तिवादाने शिक्षेपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतो. हे अयोग्य आहे. सर्वजण ज्यांनी चुका केल्या आहेत; अगदी लहान , मोठ्या कशाही, ते त्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात. तरीपण, कर्मकायद्यापासून कोणाचीच सुटका नाही. तू याविषयी लिही. चार प्रकारच्या पापांविषयी लिही. कोणी हुशारीने सरकार किंवा न्यायालयाच्या शिक्षेपासून सुटका मिळवू शकेल; परंतु कर्मकायद्यापासून कोणाचीच सुटका नाही. 

वसंता - स्वामी, खरच तुम्ही किती सुंदररितीने सांगता. 

ध्यानाची समाप्ती 


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा

 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

 जय साईराम