रविवार, ९ एप्रिल, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
श्री वसंतसाईंच्या अखंड साई चिंतनातून गवसलेली अनमोल रत्ने
रत्न - ३
ध्यानाची तयारी

         ध्यान करण्यासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे एकाग्रता. परमेश्वराच्या चिंतनात क्षणभरही खंड पाडू नका. हे करण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये काही मर्यादा घालून घेतल्या पाहिजेत  ज्यामुळे आपले प्रयत्न केंद्रीत होऊन आपली स्वयंशिस्त वाढेल. प्रत्येक क्षणी आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे.' मी वाजवीहून अधिक खाल्ले का? अधिक झोप घेतली का? वा अधिक बोलले का?' अशा पद्धतीने आत्मपरीक्षणाचा अभ्यास केला पाहिजे. आपण दैनंदिन वेळापत्रक तयार करायला हवे आणि त्या नियोजित वेळेनुसार गोष्टी केल्या पाहिजेत.
          आपले जीवन ध्यानामध्ये समाविष्ट करणे - हे आपल्या जीवनाचे ध्येय असायला हवे. हे ध्यान आहे. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी, आपल्याला सर्वत्र आणि प्रत्येक गोष्टीमध्ये, सदैव परमेश्वराला पाहण्याची दृष्टी असणे आवश्यक आहे. आपण आपल्या पंचेंद्रियांना प्रशिक्षित केले पाहिजे.
" सर्व परमेश्वराशी जोडणे." असे या प्रशिक्षणाला म्हटले जाते.वैराग्य व विवेक जगाला तोडून टाकते.
          आपल्या स्वतःला प्रशिक्षित करण्यासाठी स्वामींनी दिलेल्या सर्व मुद्द्यांचा आपण वापर केला पाहिजे. जेव्हा आपण या सर्व गोष्टी करू तेव्हा आपले ध्यान यशस्वी होईल. प्रत्येक क्षणी स्वतःला परिपूर्ण बनवल्यानंतर ध्यान आपोआपच लागेल. भक्तीसाठी या सूत्राचा वापर केल्यास ध्यान स्वाभाविकपणे होईल.

-- श्री वसंत साई अम्मा 🕉
🌸ॐ श्री साई वसंत साईसाय नम:🌸

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा