ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
वाचकांसाठी सूचना
आतापर्यंत आपण ब्लॉगवर श्री वसंत साई अम्मा लिखित 'सत्ययुग आणि कर्मकायदा' हे संपूर्ण पुस्तक प्रकाशित केले . आज पासून ब्लॉगवर श्री वसंत साई आम लिखित 'कर्मकायद्यावर उपाय' हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत.
कर्मकायदा हा परमेश्वराचा कायदा आहे. स्वामी अवतार असल्यामुळे कायदा तोडू शकत नाहीत. कर्म कायद्यावरील उपाय कोण बरं लिहू शकेल. म्हणूनच ते माझ्या रूपात आले. माझ्या एकचित्त तपश्चर्येद्वारे ते उपाय सांगत आहेत.
- श्री वसंता साई
स्वामी 'कर्मकायद्यावर उपाय' हे पुस्तक स्वीकारतात.
आम्ही स्वामींना अर्पण केलेले हे पुस्तक ११ जून २००९ रोजी, साई कुलवंत हॉलमध्ये संध्याकाळच्या दर्शनाच्यावेळी स्वामींनी एका भक्ताकडून स्वीकारले.* स्वामींनी लगेचच अतिशय आनंदाने त्याच्यावर नजर टाकली आणि नंतर विद्यापीठाच्या उपकुलगुरुंकडे पहिली प्रत देऊन त्याचे प्रकाशन केले.
* 'मुक्ती इथेच या क्षणी' या माझ्या पहिल्या पुस्तकापासून सुरु झालेला कर्मसंहार ह्या पुस्तकाने संपला. स्वामींनी स्वीकारल्यानंतरच माझ्या सर्व पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे.
-वसंता
कर्मकायद्यावर उपाय
वसंता साई
समर्पण
स्वामी,
मी कर्मकायद्यावर उपाय आणि मला स्वतःला आपल्या चरणकमलांशी अर्पण करते. कृपाकरुन याचा स्वीकार करा आणि जगाच्या उद्धारासाठी कृपेचा वर्षाव करा.
फक्त तुमच्याचसाठी जगणारी
वसंता साई
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा