ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" माया सत्यावर आवरण घालते. एकोहम् बहुस्यामी (एकातून अनेकत्व) हे सत्य जाणून घ्या. "
प्रस्तावना
अगदी लहान वयापासून मला आजार, वृध्दावस्था आई मृत्युची भीती वाटत असे. ह्या सर्वांपासून सुटका करून घेण्यासाठी परमेश्वरप्राप्ती हाच एकमेव मार्ग आहे हे माझ्या लक्षात आले. मी परमेश्वराचा ध्यास घेतला, सतत रडले आणि शेवटी त्याची प्राप्ती केली. जगातील अनेक समस्या पाहून त्यांची दुःखे हलकी करण्यासाठी मला काहीतरी करायचे होते. याचवेळी मला अनेक देवदेवतांकडून निरनिराळ्या शक्ती मिळाल्या. ह्या शक्ती मला अनेकांना मदत करण्यास साह्यभूत झाल्या. कर्मे नाहीशी करण्यासाठी इ दुर्गाशक्ती दिली. शेकडो लोकांना त्याचा लाभ झाला. हजारो लोकांना, नद्यांना व सागरांना मी प्रेमशक्ती दिली. माझं प्रेम विस्तृत झालं आणि कर्म कमी झाली. स्वामी म्हणले, " प्रेम विस्तृत कसे होते आणि त्यामुळे कर्म कमी कशी होतात हे तुझ्या जीवनातून दिसते. " ते म्हणाले की जेव्हा मी काही जणांच्या घरी राहते तेव्हा त्या घरातील सर्वांची कर्म नाहीशी होतात.
परमेश्वरावर केलेला प्रेमाचा वर्षाव वाढत जात त्यात संपूर्ण जग सामावले गेले. मी सर्वांवर प्रेम करते, अगदी मला दुःख देणाऱ्यांवरही. एका बाजूला मी प्रेमवर्षाव करते आणि दुसरीकडे कर्मसंहार करण्याचा प्रयत्न करते. या दोन कृतींमुळे जगामध्ये परिवर्तन होत आहे. दुखी पिडीतांवरील माझी करुणा, जगाचं परिवर्तन करते आहे. कर्मकायद्यावरील उपाय कोण बरं लिहू शकले ? कर्मकायदा हा परमेश्वराचा कायदा आहे. सवाई अवतार असल्यामुळे कायदा तोडू शकत नाहीत. म्हणूनच ते माझ्या रूपात आले. माझ्या एकचित्त तपश्चर्येद्वारे ते उपाय सांगत आहेत. या पुस्तकात मी त्याचे विवरण केले आहे.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा