ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनुष्याने त्याचे भाव, विचार आणि विवेक आध्यात्मिक ध्येयावर केंद्रित केल्यास त्याला ज्ञान प्राप्त होते. "
प्रस्तावना
' सत्ययुग आणि कर्मकायदा ' हे पुस्तक लिहिल्यानंतर माझ्या मनात सतत विचार येत असे, ' कर्म संपवण्यासाठी काय करता येईल ? कोणता उपाय आहे ?' मी ' वैश्विक कृतज्ञता ' नावाचे प्रकरण लिहिले . मला वाटले की हाच तो उपाय !
१४ फेब्रुवारी २००९ ला स्वामींनी मुद्दनहळ्ळी. इथे पाहिल्यावर मला खूप आनंद झाला. स्वामींनी प्रवचनाची सुरुवात " मधुरभाव, मातृभाव " या दोन शब्दांनी केली.
परमेश्वराप्रती असलेला माझा मधुरभाव हा मातृभावात विस्तारित झाला. परमेश्वरावर असलेले एकाग्र प्रेम विस्तारित होऊन ते मातृभाव आणि मातृप्रेम झाले. ' मला कृष्णाशी लग्न करायचे आहे' ही इच्छा मधुरभाव दर्शवते. वयाच्या पाचव्या वर्षी माझ्या मनात ही इच्छा का बरे निर्माण झाली ? याचं कारण मी त्यांची शक्ती आहे. स्वामी आणि मी इथे फक्त अवतारकार्यासाठी आलो आहोत. माझी मधुराभक्ती परिपक्व झाल्यावर माझ्या मनात विचार आला, " संपूर्ण जग माझ्या आणि स्वामींच्या पोटी पाहिजे. " ही इच्छा म्हणजेच मातृभाव. मातृभाव म्हणजे मधुरभावाचे विस्तारित रूप. परमेश्वर स्वतःला पुरुष आणि प्रकृती या दोहोंमध्ये अलग करतो. एक भाग सत्यसाईबाबा म्हणून पृथ्वीवर अवतार घेतो. दुसरा भाग हा अवताराची शक्ती, इथे मी , सृष्टी म्हणून आले. आम्ही युगपरिवर्तन करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. ह्या अवतार कार्यासाठी परमेश्वराने स्वतःपासून स्वतःला दोहोंत अलग केले आहे.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा