गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

     " निर्मल हृदय स्वच्छ आरशासारखे प्रतिबिंबित होते. " 


तप 

तपश्चर्या आणि पातिव्रत्य 

 
            तपश्चर्या आणि पातिव्रत्य हे जणू माझे दोन नेत्रच आहेत. तप म्हणजे काय ? मी कोणते तप केले ? माझे पातिव्रत्य हेच माझे तप. पातिव्रत्य  म्हणजे काय ? माझे तप हेच माझे पातिव्रत्य. हे दोन्ही अलग करता येत नाही. ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; वेगळ्या नाहीत. हे नाणं म्हणजेच 'त्याग '. मी माझ्या प्रत्येक आचार, विचार व उच्चाराबाबत अत्यंत दक्ष असते. परमेश्वराविषयी नसलेला अगदी एक शब्दसुद्धा माझ्या पातिव्रत्याविरुद्ध आहे. भरभरून येणाऱ्या ज्ञानाचं हेच कारण आहे. ज्ञान, पातिव्रत्य आणि तपश्चर्या हे वेगळं नाही. माझी तपश्चर्या आणि माझं पातिव्रत्य आणि तपश्चर्या हे वेगळं नाही. माझी तपश्चर्या आणि माझं पातिव्रत्य यामुळेच युग बदलणार आहे. जन्मापासून केलेल्या प्रतिज्ञा आणि व्रतं ही तपश्चर्या झाली. स्वामींशिवाय दुसरा कसलाही विचार न करण्याचा माझा स्वभाव हे पातिव्रत्य झालं.
        मी अगदी क्षणभरही परमेश्वराचा विसर पडू देत नाही. ही झाली तपश्चर्या.
        मी दुसरा कसलाही विचार न करता फक्त परमेश्वराचाच विचार करते. हे आहे पातिव्रत्य.

            अशा अनेक पतिव्रता आहेत ज्या त्यांच्या पतीला परमेश्वर मानतात. त्या त्यांच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यानी महान झाल्या. मी परमेश्वराला पती मानते हेच माझे पातिव्रत्य. ते जगाची कर्म जाळून विश्वामुक्ती प्रदान करते.   

  

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम













रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " मनामध्ये कधीही न शमणारी आध्यात्मिक तृष्णा जागृत झाल्यास नरजन्माचे सार्थक होते. " 


तप 

            मी इतकं तप का बरे केलं ? स्वामी म्हणतात, माझ्या जन्माआधी मी लक्ष्मीगुहेत तप केले. मी परमेश्वराची शक्ती असूनही इतकी तपश्चर्या का केली? परमेश्वर अवतार घेण्याअगोदर किंवा अवतार घेतल्यावरसुद्धा कधीही तपश्चर्या करीत नाही. मग मीच का ? कारण मला 'मी' नाही. मी कोण आहे हे मला माहीत नाही, म्हणून परमेश्वरप्राप्तीसाठी मी तप केले. परमेश्वर अवतार म्हणून आला तर तो एका मर्यादेत कार्य करतो. तो त्याची संपूर्ण शक्ती प्रकट करू शकत नाही. तो साक्षी अवस्थेत असतो. तो त्याचा कर्मकायदा तोडू शकत नाही. परंतु जेव्हा परमेश्वराची चित्शक्ती मानवी रूपात जन्म घेते, तेव्हा तिला अशा मर्यादा नसतात. सगळे नियम, कायदे मोडून ती परमेश्वरावर प्रेमाचा वर्षाव करू शकते. प्रेमाला कुठल्याही मर्यादा नसतात ते त्याच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यांचा नाश करते. मानवी देहातील अपरिमित शक्ती दाखवण्यासाठी मी इथे आले आहे. यासाठी मला इतकी तपश्चर्या करायलाच हवी. माझ्या तपश्चर्येद्वारे कर्मकायदा कसा मोडला हे या पुस्तकातून दिसून येईल.
            परमेश्वर अवतार घेतो, तेव्हा तो त्याची संपूर्ण शक्ती प्रकट करू शकत नाही. त्याची दैवी शक्ती आकर्षून जगदोध्दारासाठी वापरली जावी म्हणून मी आले आहे. भगवंत अवतरीत झाल्यावर त्याला कर्मकायद्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे मी तपश्चर्या करून भगवंताला या पेचातून मुक्त करत आहे.   

  

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम












गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      "जादूटोणा, चमत्कार वा मंत्र याद्वारे, प्रेम एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये स्थलांतरीत करता येत नाही. " 


तप 

            आतासुद्धा तसंच आहे. कोणाच्या हातून चूक झाली तर मी स्वतःला दोषी समजते. मी म्हणते की मी बरोबर वागले असते तर त्यांच्याकडून चूक झाली नसती. माझ्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी मी रडून परमेश्वराला प्रार्थना करीत असे. माझी काही चूक नसेल तरीसुद्धा मी म्हणेन की ही माझीच चूक आहे. मी स्वामींजवळ रडून म्हणते, " मी शुद्ध असते तर त्याच्या हातून चूक झालीच नसती. " हा माझा स्वभाव आहे. तरीही काही लोक माझ्या पुस्तकात दोष काढतात. त्यांना मी प्रत्युत्तर करत नाही. मी माझ्या लिखाणाद्वारे स्पष्ट सांगितले आहे की मला आश्रम, स्तूप किंवा पुस्तकं काहीही नको आहे; मला फक्त स्वामी हवेत. मला परमेश्वराशिवाय कशाचीही आंस नाही. स्वामींशिवाय समजण्याअगोदर मी खूप तपश्चर्या केली आहे; आतासुद्धा ती तशीच चालू आहे.

  

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम











बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार - जानेवारी २० 

          " तुमचे  चांगले  अथवा वाईट सर्व भाव, विचार आणि कर्मं ह्यांची कर्मांच्या नोंदवहीत नोंद होत असते."


चांगली अथवा वाईट; तुमची सर्व कर्मे कर्मांच्या नोंदवहीत नोंद केली जातात. कर्मांच्या नोंदी म्हणजे अनेक जन्मांच्या साठवलेल्या आठवणी आणि संस्कार. हे कर्मांचे ठसे म्हणजे तरी काय? आपण केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्मांच्या नोंदी म्हणजेच हे ठसे. प्रत्येक विचार, शब्द आणि कृती ह्यांची नोंद होत असते. सर्वोत्तम अवतार भगवान सत्य साईंनी हे सांगितलं आहे.
मानवी मनात सर्वप्रथम भाव तरंग उद्भवतात. ह्या पातळीवरच आपण हा भाव तरंग चांगला आहे की वाईट ह्यावर सारासार विचार करावयास हवा. ह्या पद्धतीचा वापर करून आपण वाईट भाव तरंगांचा त्याग करावा. आपण जर हे केलं नाही तर हे भाव विचारात बदलतात आणि विचार कृतीत उतरतात. वाईट विचारांमुळे वागणुक वाईट होते आणि मन दुर्गुणांचं घर होतं. हे आठवणींचे ठसे आपल्याला कायम जन्ममृत्यूच्या फेऱ्यांमध्ये  अडकवून ठेवतात. मनुष्याला त्याच्या जन्माचा उद्देश काय ह्याची जाणीवच नसते. आपल्याला केवळ भगवत प्राप्तीकरता हा मनुष्य जन्म दिला गेला आहे. तथापि त्याला वाटतं की हा जन्म वंशावळ निर्माण करण्यासाठी आहे. ह्यामुळे माणूस बंधनात  जखडला जातो. म्हणून प्रत्येकाने ही बंधनं आणि आसक्ती ह्यापासून मुक्त होण्याचा आटोकाट प्रयत्न करावयास हवा. श्रीकृष्णानं भगवत गीतेमध्ये उद्घोषित केलं आहे की,'केवळ कर्मच माणसाला बंधनातून मुक्त करू शकते.' आपल्या हातात सर्व आहे. आपण दिवसभरात करत असलेल्या प्रत्येक कर्माचा योग साधावा, म्हणजे ते सर्व भगवंताशी जोडावे.
भगवत गीता हा सर्व शास्त्र ग्रंथांचा राजा आहे. ह्या राजाची इच्छा आहे की,"त्याची अवघी प्रजा सकाळपासून रात्रीपर्यंत जी काही कार्ये करते ती तिने भक्तिभावानं करावी, पूजा समजून करावी." तुमची अर्धा तास किंवा दहा मिनिटं राखुन ठेवुन केलेली पूजा त्याला नकोय! गीतेचा १५वा अध्याय आहे पुरुषोत्तम योग. इथे सर्व शिकवण पूर्णत्वाला जाते. म्हणून ह्या अध्यायाला पूर्ण योग अथवा पुरुषोत्तम योग म्हणतात.
तीच भगवत गीता भगवान श्री सत्यसाई यांनी अजून सोपी करून शिकवली. त्यांनी वेद, उपनिषदे,आणि शास्त्रग्रंथ यांमधील सत्य सर्व साधारण मनुष्याला समजेल अशा पद्धतीनं सोपं करून सांगितलं. श्री सत्यसाई हा महोत्तम अवतार कली युगात अवतरला,त्यानं त्याचं प्रेम आणि कारुण्य यांचा वर्षाव मानवतेवर केला. यामुळं त्यानं सर्वांची कर्मं स्वतःवर घेतली आणि शरीराचा त्याग केला. सर्वाना भगवंताची रूची समजावी यासाठी त्यांना जीवनमुक्त करावे, ही त्याची इच्छा आहे. आपण सर्व किती भाग्यवान आहोत! पूर्वीच्या कुठच्याही युगात हे कधी घडलेलं नाहीये.
मी एकदा एक नाटक लिहिलं, त्याचं नाव होतं, 'मेन गेट', आणि ते कर्म कायद्यावर आधारित होतं. असं म्हणतात की चित्रगुप्त आपल्या सर्वांच्या सर्व कर्मांचा हिशोब ठेवतो. आम्ही प्रथम मुक्ती निलायममध्ये आलो त्या दिवशी येथील मैदानावर बऱ्याच म्हशी हिंडत होत्या. यमदेवाचं वाहन म्हैस आहे.  कर्मांचे हिशोब जाळून टाकण्यासाठी स्वामींनी मुक्ती निलायमची स्थापना केली. ही स्वामींची कर्मभूमी आहे. येथील स्तूप सर्व कर्मे जाळून सर्वांना मुक्त करतो. तुम्ही सकाळ पासून रात्रीपर्यंत जे काही करता ते परमेश्वराचा विचार करत करा. तर आणि तरच मरतेवेळी तुमच्या मुखात आणि मनात परमेश्वराचं नाम येईल. आपलं पुढच्या जन्मातील जीवन आपला प्रत्येक विचार, शब्द आणि आचार ठरवत असतात. अतृप्त इच्छा हे आपल्या पुढील जन्मांचं कारण आहे. म्हणून आपण आपल्या इच्छा कमी करायलाच हव्यात. तुम्ही तुमचं सामान कमी करत तुमचा भगवत प्राप्तीचा मार्ग सुकर करा.  

२९ जून २०१६ : सायंध्यान
(मी सारखी अश्रू ढाळत आहे. आम्ही स्वर्गात जातो. तिथे मी म्हणते...)
वसंता : ऋषी, देवगण,साधू, संत; अहो माझा न्याय कुठे आहे? अहो देव देवता मला न्याय हवाय. स्वामी मला इथे सोडून अर्ध्यावर का निघून गेले? तुम्ही नाडीग्रंथांमध्ये लिहिलेलं सर्व खोटं आहे का? सांगा मला.
(मला अश्रू आवरत नाहीत...)   
स्वामी : तू अशी का रडतेयस? ये, बैस इथं. मी काय सांगतो ते ऐक. अगं तू स्वतः न्यायदेवता आहेस. तू हातात तराजू घेऊन जन्मलीस. आता मी तुला कारण सांगतो. शनी दशा साडेसात वर्षांची असते. मी सव्वादोन वर्षं शनी दशा भोगली आणि देह सोडला. आता पाच वर्षं आणि तीन महिने झाले. म्हणजे साडेसात वर्षं जवळ जवळ संपत आली. मी लवकरच येईन.
 वसंता : देवाला कशी हो शनी दशा?
स्वामी: कारण की मी कर्मं माझ्यावर घेऊन सामान्य मनुष्यासारखाच त्रास सहन केला. मी तुला हे सुचवू इच्छितो.
वसंता : इतर अवतारांच्या जीवनावर त्यांच्या जन्मपत्रिकेचा प्रभाव पडला होता का?
स्वामी : रामाला बारा कला होत्या. तो अनभिज्ञ होता. कालदेवानं येऊन त्याला सांगितलं की त्याचं अवतार कार्य पूर्ण होऊन प्रस्थानाची वेळ झाली. नंतर रामानं त्याच्या मुलांचा राज्याभिषेक केला आणि त्यानं शरयू नदीत प्रवेश केला.
वसंता : कृष्णाचं काय?
स्वामी : ऋषीच्या शापामुळं द्वारका समुद्रात बुडाली. शिकाऱ्याच्या बाणाचे निमित्त होऊन कृष्णानं देह सोडला. सर्वांनी कर्म कायद्याचं पालन केलं. काळजी करू नकोस. मी येईन.
ध्यान समाप्त.   
आता आपण पाहुयात. काल संध्याकाळी ध्यानात असताना मी ऋषी,देवगण,साधू, संत सर्वाना आळवून अश्रू ढाळत होते. मी सर्वाना विचारत होते की माझा न्याय कुठे आहे. स्वामी मला एकटीला सोडून का गेले? विरह व्यथा असह्य होऊन मी अश्रू ढाळत होते. माझे आणि स्वामींचे नाडी ग्रंथ सिद्ध, ऋषी,आणि मुनींनी लिहिले आहेत. मी ब्रह्मा, शिव,विष्णू तसेच सरस्वती, पार्वती आणि लक्ष्मी ह्या सर्व देव देवतांची कळवळून प्रार्थना केली. स्वामी आले, त्यांनी माझं सांत्वन केलं. माझी जन्मरास ‘तुला’ आहे. ‘तुला’ म्हणजे तराजू. म्हणून स्वामी म्हणाले, "तू न्याय देवता आहेस." मी केवळ चांगल्या लोकांसाठीच  न्याय मागितला नाही तर वाईट लोकांकरता सुद्धा मागितला. सर्व म्हणतात की, कैकेयी आणि मंथरा वाईट आहेत. परंतु मी भगवंताबरोबर वाद घातला,"त्या वाईट का आहेत? त्यांच्याशिवाय रामानं राक्षसांचा नाश केला असता का? त्याचं नाव होऊन त्याला प्रसिद्धी मिळाली असती का?" लहानपणापासून माझ्या मनात असे उदार विचार असत.  
स्वामींनी एकदा एक कविता सांगितली.  ते म्हणाले की मी अवताराला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं  करणारी न्याय देवता आहे. सर्वाना न्याय मिळावा म्हणून मी वाद घालते. हे खरं असेलही पण मला न्याय मिळाला नाही. परमेश्वरानं मला अर्ध्यावर का सोडून दिलं? असा विचार करत मी अश्रू ढाळते. आता स्वामींनी नवीन कारण सांगितलं. ते म्हणाले त्यांच्या आयुष्याची अखेरची काही वर्षं त्यांच्या जीवनावर शनीचा प्रभाव होता. साडेसातीची दोन वर्षं आणि तीन महिने त्यांनी भोग भोगला व देह सोडला. ह्याला आता पाच वर्षं आणि तीन महिने झाले. असं म्हणतात की साडेसातीचा भोग साडे सात वर्षांचा असतो.
स्वामींनी आणि मी दोन हजार नऊला एकमेकांना मुद्देनहळ्ळीला स्थूल देहात पाहिलं. त्यावेळी आम्ही दोघांनीही विरह वेदनेत अश्रू ढाळत एकमेकांचा निरोप घेतला. त्यानंतर मी स्वामींना पाहिलं नाही. ईसवी सन २०१० मध्ये आम्ही विश्व ब्रह्म गर्भ कोट्टमचं बांधकाम पूर्ण केलं. तेव्हा आम्ही ह्या इमारतीच्या उद्घाटनाच्या आमंत्रण पत्रिका तयार केल्या होत्या. त्यावेळेस स्वामी दिल्लीला गेले होते. तेथीलआमच्या एका भक्तानं आमंत्रण पत्रिका व इमारतीचा आराखडा स्वामींना दिला. स्वामींनी सर्व स्वतःच्या हातात घेऊन पाहिलं आणि आशीर्वदित केलं. ह्या घटनेचे फोटो काढले गेले.       
सन २०११ मध्ये स्वामी खूप आजारी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यांनी २३ एप्रिलला देह सोडला. मला कल्पनातीत धक्का बसला, मी धाय मोकलून रडत होते. तद् नंतर स्वामींनी मला त्यांचे आणि माझे नाडी ग्रंथ पहावयास सांगितले. त्या नाडी ग्रंथात सर्व ऋषी आणि सिद्धांनी घोषित केलं आहे की माझ्या आक्रोश आणि आकांतामुळे स्वामी परत येतील. त्यानंतर पाच वर्षं आणि तीन महिने अनेक संदेश देऊन स्वामींनी माझं सांत्वन केलं. परमेश्वरावर शनीचा प्रभाव कसा पडू शकतो? ह्यावर स्वामींनी वैश्विक कर्मं स्वतःवर घेत सामान्य जनांप्रमाणे यातना भोगल्या, म्हणून हे झालं असं स्पष्टीकरण दिलं. मी स्वामींना इतर अवतारांच्या जीवनाबद्दल विचारलं. "ते त्यांचं जीवन पत्रिकेनुसार जगले का?", असं विचारलं. रामाला बारा कला होत्या. बाकी चार कला लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, आणि हनुमान  ह्यांच्यामध्ये विभागल्या गेल्या होत्या. त्यांना प्रत्येकी एक कला होती.
राम साक्षी भावात होता. त्याला स्वतःचं सत्य माहीत नव्हतं. काल-देवानं येऊन त्याला सांगितलं,"आता तुझं कार्य समाप्त झालंय, तू तुझ्या निजधामाला जाण्याची वेळ झालीय." त्याचं अवतार कार्य संपलं ह्याबाबत तो अजाण होताआणि जेव्हा त्याला हे समजलं तेव्हा त्यानं लगोलग त्याच्या पुत्रांचा राज्याभिषेक केला, स्वतः शरयू नदीत उतरून ह्या जगाचा निरोप घेतला.
द्वापार युगात यादव कुळाच्या काही  तरुणांनी काही ऋषींची मस्करी केली. सांबन ह्या कृष्णाच्या मुलाला त्यांनी गर्भवती स्त्रीचा वेष घालून, ते त्याला ऋषींकडे घेऊन गेले आणि त्यांनी ऋषींना विचारलं की ह्या मुलीला काय जन्माला येईल? मुलगा की मुलगी? ऋषींनी क्रोधाविष्ट होऊन उत्तर दिले,"लोखंडी मुसळ जन्मेल आणि तुमच्या कुळाचा नाश होईल." तत्क्षणी एक मुसळ साक्षात झाले. घाबरलेल्या युवकांनी त्या मुसळाचे तुकडे करून मग त्याची पूड केली. ती पूड त्यांनी समुद्रात फेकून दिली. तरीसुद्धा एक तुकडा उरला ज्याचा नाश ते करू शकले नाहीत. तो तुकडा सुद्धा त्यांनी समुद्रात फेकला. ही पूड समुद्र किनाऱ्यावरील गवतात शिरली.  योग्य वेळ आल्यावर एक दिवस सर्वजण समुद्र किनाऱ्यावर गेले आणि मदिरापान करून गोंधळ घालू लागले. अचानक त्यांच्यामध्ये भांडणाला सुरुवात झाली. किनाऱ्यावरचे गवत उखडून ते एकमेकांवर भिरकावू लागले. त्या गवतात मुसळाची पूड होती, त्यामुळे सर्वजण यमसदनी गेले. वाली नावाच्या शिकाऱ्याला मुसळीचा छोटा तुकडा मिळाला. त्यापासून त्यानं बाणाचे अणुकुचीदार टोक तयार केले. तो जंगलात शिकारीला गेला. तेव्हा कृष्ण जंगलात एका झाडाखाली विश्रांती घेत होता. त्याच्या पायाचा अंगठा हळुवार मागे पुढे डोलत होता. थोड्या अंतरावरून पहाणाऱ्या वालीला तो हलणारा अंगठा पक्षी वाटला. त्याने बाण सोडला, त्या बाणाने कृष्णाच्या अंगठ्याचा वेध घेतला. परमेश्वरानं देह सोडला. त्यासुमारास द्वारका समुद्रात बुडाली आणि कृष्णाचा अवघा वंश नष्ट झाला. भगवंताला वंशावळ नाही. त्याच्या वंशात एक जरी वाईट माणूस जन्मला तरी कृष्णाचं नाव बदनाम होईल. म्हणून कृष्णाचाच हा मास्टर प्लॅन होता. म्हणून मी स्वामींना सांगितलं की आम्ही जेव्हा हे जग सोडू तेव्हा आमच्या मुलांनीही यावं आणि आमच्या बरोबर हे जग सोडावं.

जय साईराम

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

 

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

         " त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत. " 


तप 

शिक्षा
           माझ्या मुलांनी काही चुका केल्या तर मी स्वतःलाच शिक्षा  करून घेत असे. मी जेवत नसे अथवा मीठ वर्ज्य करीत असे. गांधीजींच्या आयुष्याचा सखोल अभ्यास केल्यामुळे मी हे शिकले. त्यांनी अहिंसेच्या मार्गाने इंग्रज सरकारला विरोध केला. मुले रडत असत," अम्मा प्लिज खा नं ! आम्ही पुन्हा चुका करणार नाही. प्लिज !" ह्यामुळे चुका करणाऱ्यांची सद्विवेकबुद्धी जागृत होऊन ती बदलली. मोठ्यांच्या हातून चुका  झाल्या तरी मी स्वतःला शिक्षा देत असे.

 
  

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम










गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

 

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

         " त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत. " 


तप 

व्रते

 
१.मी मीठ वर्ज्य केले.
२. दिवसातून फक्त एकदा अथवा दोनदाच अन्नग्रहण करीत असे.
३. मिठाई वर्ज्य केली.
४. आंबट पदार्थ, चिंच, टोमॅटो वर्ज्य केले.
५. मी कधीही मसालेदार पदार्थ  खात नाही. माझ्या वडिलांनी मला शिकविले की आपण फक्त सात्विक अन्नच खावे.
६. मी रोज ' ॐ नमो नारायण ' चा ५०,००० वेळा जप करीत असे.
७. सकाळी, दुपारी आणि रात्री गायत्री मंत्राचा १०८ वेळा जप करीत असे.
८. दररोज विष्णुसहस्त्रनाम म्हणत असे.
९. रोज मी आणि माझे कुटुंबीय गीतावाचन करीत असू. संध्याकाळी मी गावातील वृद्धांना भक्तविजयम्, रामायण , महाभारत आणि भागवत वाचून दाखवत असे. सर्वजण दुपारी २ वाजता येत आणि मी ३:३० ते ४:०० पर्यंत वाचत असे. मी लहान असताना घरातील ज्येष्ठांनी मला रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या होत्या.
१०. मी नेहमी आत्म-परिक्षणाची दैनंदिनी लिहित असे. माझ्या वडिलांनी मला ती सवय लावली. माझ्या मुलांनाही मी ती सवय लावली.
११. मी मनाला आणि इंद्रियांना सर्वत्र परमेश्वरच पहायची सवय लावली. स्वतःला 'तोडणे आणि जोडणे ' शिकवले; याचा अर्थ असा की मी प्रत्येक गोष्टीचा ऐहिक अर्थ तोडून ती गोष्ट परमेश्वरशी जोडली.
१२. जसजशी माझी तपश्चर्या तीव्र होत गेली, तसतशा मला उच्च आध्यात्मिक अवस्था प्राप्त झाल्या उदा. राधा, दुर्गा, महालक्ष्मी. मी त्या सर्व केवळ पदव्या म्हणून दूर सारल्या.
१३. मी दोनदा पंचाग्नी तप केले.
१४. १५ वर्षे मी झोपू  शकले नाही. रात्रभर कृष्णावर कविता आणि गाणी रचत असे. उशाशी डायरी व पेन ठेवून सर्वजण झोपले की माझं लिखाण सुरु होत असे.
 
  

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम









रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

         " त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत. " 


तप 

           मी २१ वर्षांची झाल्यावर परमेश्वरप्राप्तीच्या इच्छेचा नव्याने मागोवा घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी सातत्याने व एकाग्रतेने खालील प्रतिज्ञा केल्या आणि व्रतं सुरु केली. माझ्या ध्येयप्राप्तीत यांची मदत होण्यासाठी मी प्रार्थना करीत असे.
प्रतिज्ञा आणि व्रते 


प्रतिज्ञा
१. किंमती साड्या नेसणे बंद करणे फक्त रु. ३०/- च्याच साड्या नेसणे.
२. अलंकार न घालणे.
३. सिनेमा न पाहणे.
४. मासिके अथवा कादंबऱ्या न वाचता मी फक्त आध्यात्मिक पुस्तकांचेच वाचन करेन.
५.  टेलिव्हिजन न पाहणे
६. आरसा न पाहणे.
७. बाहेर जाऊन इतरांशी न बोलणे.
८. आजाराचा कितीही त्रास झाला तरी डॉक्टरांकडे जाणार नाही.
९. नेहमी सत्यच बोलेन.
  

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम








गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

         " त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत. " 


तप 


          माझा जन्म एका सधन कुटुंबात झाला. तरुणपणीच मी सर्व त्याग करून कठोर तपश्चर्या केली. अनेक प्रतिज्ञा केल्या आणि कित्येक व्रतं केली. मी स्वतःला बदलले. माझ्या आयुष्यातही ऊन, पाऊस, वादळवाऱ्यांसारखी अनेक स्थित्यंतरे आली, मला कित्येक अपमान व विरोधांना तोंड द्यावे लागले. मी हे सर्व सहन केले. माझं संपूर्ण आयुष्य हे कठोर तपच आहे. मला नेहमीच विरोधांना तोंड देत त्यांच्याशी झुंजावं लागलं. परमेश्वराची भूक आणि ज्ञानाची तृष्णा यासाठी मी कुठल्याही अडथळ्यांची पर्वा न करता माझं तप चालूच ठेवलं.
          अगदी लहानपणापासूनच परमेश्वराशी विवाह करून त्याच्यात सदेह संयुक्त होण्याची माझी इच्छा होती; माझ्या तपश्चर्येचं हे मूळ कारण होतं. ही दोन ध्येय सर्वांची कर्म नाहीशी करून नवनिर्मिती आणत आहेत.   


संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम







बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
रत्न - ७


        माझ्या डायरीमध्ये मी पाहिलेलं स्वामींचं एक वचन आपण पाहूया.
        स्वामी म्हणतात, "परमेश्वर हा प्रत्येक जीवाचा प्राण (श्वास)आहे." हा प्राण वा जीवप्रवाह मनुष्याच्या वाढीस कारणीभूत आहे. श्वासाविना जीवन अशक्य आहे. श्वासाविना देह निष्प्राण असतो. परमेश्वर हा सर्वांचा अंतर्यामी आहे.
         हा प्राण शिशुला बालक, बालकाला युवक बनवतो. या प्राणशक्तीमुळे प्रत्येक मनुष्याची वाढ होते. या प्राणशक्तीलाही अंतर्यामी म्हणतात.
         जेव्हा साधक साधना करतो, तेव्हा त्याचा अंतरात्मा  विकसित होतो आणि विस्तार पावतो. प्रथमतः तो अंतरात्मा नीलरंगाच्या ज्योतीस्वरूपात, तांदुळाच्या दाण्याच्या टोकाच्या आकारामध्ये अस्तित्वात असतो. जेव्हा एखाद्याला तो देह नाही याची जाणीव होते आणि तो त्याच्यातील दुर्गुण नष्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा अंतरात्मा विकसित होऊ लागतो. भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायात, अंतरात्म्याच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून ते संपूर्ण देहाला व्यापून टाकणाऱ्या अंतरात्म्याच्या अखेरच्या अवस्थेपर्यंत पाच अवस्था वर्णन केल्या आहेत. अंतरात्म्याची पहिली अवस्था  'उपद्रष्टा' म्हणजे जीव करत असलेल्या सर्व कर्मांचा साक्षी. जीव साधना आणि प्रयत्न करू लागल्यावर अंतरात्मा 'अनुमंता' ( प्रोत्साहन देणारा ) या अवस्थेत येतो. त्यानंतर जीव त्याची साधना आणि प्रयत्न सुरू ठेवतो आणि अंतरात्मा 'भर्ता', 'भोक्ता' आणि अखेरीस 'महेश्वर' ह्या अवस्थांमध्ये येतो. अखेरच्या,'महेश्वर' अवस्थेमध्ये, तो जीवाला पूर्णतः व्यापून टाकतो आणि जीव शिव बनतो.
                           

जय साईराम

रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

         " त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत. " 


तप 


           याद्वारे प्रभूंनी हेच दर्शवले की परमेश्वर कधीही नैसर्गिक सौंदर्य, भौतिक अधिकार, शारीरिक अथवा सांपत्तिक बळाकडे आकर्षिला जात नाही. हे सर्व त्याचं लक्ष वेधू शकत नाही. पार्वतीजवळ ऐश्वर्य, यौवन, सौंदर्य सर्वकाही निसर्गतःच होत. तिला तिचा गर्व आणि अहंकार नाहीसा करायचा होता. यासाठी तिने कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. तिने ऊन, पाऊस , थंडी, वादळवारे कशाचीही पर्वा न करता तो करून स्वतःचं परिवर्तन केलं. तिच्या एकाग्र तपश्चर्येवर शंकर खुष झाले आणि त्यांनी तिचा अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला.
          सर्व देवतांमध्ये फक्त पार्वतीनेच शिवाशी विवाह करण्यासाठी तप केले आणि ती त्यांची अर्धांगिनी झाली.  


संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम






गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

         " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय. " 


तप 


             शरीर सौंदर्य, भौतिक अधिकार, शारीरिक, बौद्धिक किंवा ऐहिक संपत्तीच्या शक्तीने परमेश्वरप्राप्त होऊ शकत नाही. मन्मथाच्या गोष्टीचा हाच गर्भितार्थ आहे...
            ... पार्वतीने ऊन, पाऊस,थंडी, तहान - भूक, कशाचीही पर्वा न करता कठोर तपश्चर्या करून स्वतःमध्ये परिवर्तन घडवले. अखेर शिवाने तिचा  स्वतःची अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला ! आध्यात्मिक मार्गावर या स्थितीला सायुज्य म्हणतात. हे मोक्ष आणि मुक्तीसामन आहे. खरं तर, विद्येतच विनम्रता, सहनशीलता आणि शिस्त असते. विद्या उद्दामपणा, ईर्ष्या आणि त्यांच्या संबंधित दुर्गुणांचा नाश करते. अशी विद्या हीच खरी आत्मविद्या होय...

*    *   *

            हिमवनकन्या पार्वतीला नैसर्गिक रूप गुणांचं वरदानच होतं. ती तरुण होती. तिचा अहंकार, तिच्या सौंदर्याचा, यौवनाचा आणि राजकन्या असल्याचा गर्व नष्ट होऊन शिवप्राप्ती व्हावी म्हणून तिने तपश्चर्या केली. हे सर्व साधनेद्वारे नष्ट करण्याची तिची इच्छा होती. कामदेवांना तिचं सौंदर्य आणि यौवन शिवांच्या नजरेस आणून द्यायचं होतं, परंतु शिवांनी कामदेवाला जाळून भस्मसात केले.   


संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम