ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" साधना, साधना, साधना ! केवळ साधनेद्वारे जीव शिव बनतो. "
३
तप
स्वामींनी एका काव्यात म्हटले आहे....
हे प्रिये,
विचारी तू मला व्याख्या पातिव्रत्याची
अनेक महान पतिव्रता आहेत येथे
तथापि मूर्तिमंत पातिव्रत्य देखीले ना कोणी
भूतलावरील तुझे आगमन
एक अपूर्व अद्भूत उदाहरण
प्रेम तुझे पाहून
जीव माझा व्याकुळतो
कशा साहू मी कळा ज्या लागल्या जीवा
वैश्विक कालयंत्र दर्शविते पातिव्रत्य तुझे
त्या पातिव्रत्यातून होई निर्मिती नवयुगाची
जे जे रूप पाहसी लोचनी - तो एकमात्र परमेश्वर
अन्य रूप दिसता म्हणसी...
नष्ट झाले पावित्र्य लोचनांचे
जे जे बोल उच्चारसी - केवळ प्रभूचे गुणगान
अन्य उच्चारण होता म्हणसी ....
नष्ट झाले पावित्र्य वाणीचे
विचार तुझे फेर धरती... त्या एकमात्र परमेशाभोवती
अन्य विचार येता म्हणसी ...
नष्ट झाले पावित्र्य विचारांचे
जे जे श्रवण करीसी... केवळ ईश वाणी
हुकता श्रवण ईशवाणीचे म्हणसी...
नष्ट झाले पावित्र्य कर्णेनद्रियांचे
स्पर्श करीसी तू त्या एकमात्र परमेशासी
चुकता स्पर्श म्हणसी...
नष्ट झाले पावित्र्य स्पर्शाचे
सृष्टीत पाहसी अखिल रूप सृष्टीकर्त्याचे
कला जाणूनी परिवर्तनाची
लीलया करिसी परिवर्तन तू
सृष्टीचे सृष्टीकर्त्यात
* * *
संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा