रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल."


अवतार डॉल (बाहुली)


            कर्मकायद्यावर उपाय काय ? आधीच्या गोष्टीत स्वामींनी त्या मुलाच्या आईला सांगितले की त्याने त्याच्या पूर्वकर्मांची शिक्षा भोगायलाच हवी. संपूर्ण आयुष्यभर तो यातना भोगेल. म्हातारपणी जर त्याला जाणीव झाली की आपल्या पूर्वजन्मीच्या कृत्यांची ही शिक्षा आहे आणि पश्चात्तापाने होरपळून जाऊन त्याने परमेश्वराजवळ दयेची भीक मागितली, तर स्वामी काही करू शकतील. तरीसुद्धा स्वामी  म्हणाले, " कदाचित".
           ' सत्ययुग आणि कर्मकायदा '  पुस्तकात मी लिहिले आहे की आपल्याला बदलण्यासाठी आता फक्त २८ वर्षे उरली आहेत. स्वामी आपण सर्वांना एक संधी देत आहेत. हा मुद्दा तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन भोग जाणीवपूर्वक भोगा आणि स्वतःला बदलण्याचा मनापासून प्रयत्न करा; म्हणजे तुम्ही कर्मकायद्यातून मुक्त व्हाल. स्वामी  म्हणाले,' कदाचित '. त्यांनी खात्री दिली नाही. परंतु मी नक्कीच करू शकते. माझे वैश्विक कृतज्ञतेचे भाव स्तूपाद्वारे जगभर व्यापतात.
           जर तुम्हाला मदत हवी असेल, तर परमेश्वराची विनवणी करा आणि स्वतःला बदला, मग माझे कृतज्ञतेचे भाव नक्कीच तुम्हाला मदत करतील. हे ' कदाचित ' नाही; खात्रीने, खात्रीने ! खात्रीने !! हाच आहे उपाय.

***

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

        " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "


अवतार डॉल (बाहुली)


            आता दुसरे उदाहरण पाहू या. मला जेव्हा प्रथम धन्वंतरी शक्ती प्राप्त झाली, तेव्हा एक जोडपे त्यांच्या कार्तिक नावाच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. तो मुका, बहिरा आणि पूर्णपणे आंधळा होता. मी स्वामींजवळ प्रार्थना केली. स्वामी म्हणाले, " त्याला धन्वंतरी शक्ती दे आणि त्याच्या जिभेवर ' ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः '  लिही." त्यांनतर ते कुटुंब वरचेवर वडक्कमपट्टीला येत असे. एक महिन्यात त्या मुलाला दृष्टी मिळाली आणि तो बोलूही लागला. तो शाळेत जायला लागला, इतकेच नव्हे तर त्याला दिल्लीहून राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले.
            स्वामींना पूर्वजन्मांची कर्मे दिसतात. त्यामुळे ते कर्मकायद्यात हस्तक्षेप करत नाहीत. मी जरी त्यांची शक्ती असले, तरी मला 'मी' नाही, त्यामुळे मला कार्तिकचा पूर्वजन्म माहित नाही. म्हणून मी सहजपणे कर्मसंहार करू शकले. अवतार कर्मांमध्ये दखल देऊ शकत नाहीत, पण मी देऊ शकते. म्हणूनच * 'मी विना मी' च्या शक्तीसमोर अवतार बाहुल्यांप्रमाणे भासतात. अशाप्रकारे मी जगाची कर्म दूर करते.

*जिथे अहंभाव आत्मस्वरूपात विलीन झाले ती अवस्था    
 
 

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
आंतरिक लढा
 
भगवद्गीतेतील सोळाव्या अध्यायामध्ये देव आणि असुरांमधील लढ्याविषयी सांगितले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक मनुष्यामध्ये सद्गुण आणि दुर्गुण या दोन्ही मध्ये संघर्ष पेटलेला असतो. हा लढा सूक्ष्म पातळीवर सुरू असतो. महाभारताचे युद्ध हे प्रत्यक्ष, स्थूल पातळीवर घडले. आंतरिक लढ्यामध्ये नेहमी होणारा दुर्गुणांचा विजय मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये ढकलतो. आपल्या गतजन्मातील अनेक नकारात्मक गुणांमुळे आपण जन्म घेतला आहे. ही वस्तुस्थिती आहे की आपण शुद्धता प्राप्त केलेली नाही हे आपण घेतलेल्या जन्मामुळे सिद्ध होते.
 मनुष्यामध्ये उद्भवणारा प्रत्येक भाव त्याचे जीवन निर्धारित करतो. या जीवनातील भावांद्वारे त्याचा पुढील जन्म निर्मित केला जातो. मनुष्याचा मनामध्ये सतत सद्गुण आणि दुर्गुणांमध्ये संघर्ष सुरू असतो. मनुष्याने आपल्या मनामध्ये वाईट विचारांना बिलकुल थारा देऊ नये. त्याने सदैव विनयशील असायला हवे.
या संघर्षाचा शेवट कधी होणार हे कोण जाणतो? मनुष्य जन्म घेतो आणि मृत्यू पावतो. या जन्ममृत्यूचा चक्रातून मुक्त होणे सोपे नाही.
लक्षावधी जन्म घेतल्यानंतर एखादा स्वतःला या जन्म मृत्यूचा चक्रातून मुक्त करू शकतो.
अनेक वर्षांपूर्वी माझ्या मनात एक विलक्षण विचार आला, " मी सर्वांना मुक्त का करू नये? " प्रत्येकाला मोक्षप्राप्ती व्हावी अशी माझी इच्छा होती. अशा प्रकारे वैश्विक मुक्तीसाठी माझे तप सुरू झाले. माझे तप, हे ध्येय निश्चित प्राप्त करेल. मी सर्वांमधील संस्कार नष्ट करून त्यांना माझ्यासारखे बनवेन.
प्रत्येकामध्ये दुर्गुणांचा वास असतो. ते नष्ट करणे म्हणजे महाभारताचे युद्ध नव्हे तर ते एक महावैश्विक युद्ध आहे. माझा तपोबलाद्वारे मी एक नूतन विश्वाची निर्मिती करेल जेथे सर्वांमध्ये, माझे गुण म्हणजेच परमेश्वराप्रति विशुद्ध प्रेम असेल.
श्री वसंतसाई अम्मा

संदर्भ - वरील उतारा श्री वसंत साई अम्मांच्या 'शिवसूत्र' या पुस्तकातील तिसऱ्या प्रकरणामधून घेतला आहे.

जय साईराम

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

श्री वसंतसाईचा जन्मदिन संदेश
 इच्छा कल्पना आणि निर्मिती



एखाद्या लहान बालकाला  खेळणे वा बाहुली हवी असते. त्याच्या कल्पना विश्वात, तो त्याच्या बाहुलीशी बोलतो, हसतो, खेळतो. क्रिकेट वा इतर खेळ खेळणारी, मोठी  मुले, त्यांच्या आवडत्या खेळाडूंचे अनुकरण करुन त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीचा चित्रपट जगतातील आवडता नायक असतो ती व्यक्ती कल्पनेमध्ये स्वतः त्याच्यासारख्या अभिनय करून त्याच्यासारखी बनते.
 तरुणांना विवाह करण्याची इच्छा असते तसेच आपल्याला एक सुंदर पत्नी आणि चांगली मुले असावीत
असेही त्यांना वाटते.
एखाद्याला परदेशात चांगली नोकरी मिळावी अशी इच्छा असते.
 प्रथमतः आपण कल्पना विश्वात जगतो त्यानंतर ते सत्यात उतरते मनुष्याच्या इच्छेची परिपूर्ती म्हणजेच निर्मिती होय.
 स्वप्न वास्तव बनते. यालाच म्हणतात यद् भावम् तद् भवती.
 लोकांना अनेक इच्छा असतात. या जन्मात पूर्ण न झालेल्या इच्छा पुढील जन्माची निर्मिती करतात. या इच्छेनुरूप, कुटुंब स्थळ वेळ जन्म नाम आणि रूप निर्माण केले जाते. तो त्या विश्वामध्ये पुन्हा जन्म घेतो. अशा प्रकारे सर्वजण त्यांच्या इच्छांवर आधारित काल्पनिक विश्वामध्ये जीवन जगत आहेत. 

मनुष्याचे विचार निर्मितीस कारणीभूत आहेत. सर्वांमध्ये ही निर्मितीची शक्ती आहे. परंतु ती प्रत्येकाच्या इच्छेनुसार बदलते. अगोदर मी असे लिहिले आहे की विचार हे निर्मितीचे कारण आहे.

प्रत्येकाचे एक काल्पनिक विश्व असते आपण त्या कल्पनेचा कल्पनेला सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर ते अस्तित्वात येते वा कृतीमध्ये उतरते. प्रथम मनात इच्छा उद्भवते त्यानंतर कल्पना आणि त्या पाठोपाठ प्रयत्न आणि अखेरीस निर्मिती.

 मनुष्य देहामध्ये कुंडलिनी शक्ती विद्यमान आहे. त्या शक्तीला मर्यादा नाहीत. साधनेद्वारे ती शक्ती जागृत केली पाहिजे. नित्य आणि अनित्य यामधील भेद जाणला पाहिजे. आपण आपल्या सर्व इच्छा ईश्वराभिमुख केल्या पाहिजेत. अशा वेळेस कुंडलिनी शक्ती जिच्यामध्ये निर्मितीची शक्ती आहे, ती योग्य दिशेने संचालित केली जाते आणि परमात्म्याशी एकत्व साधण्यासाठी ती ऊर्ध्व दिशेने गमन करते.


श्री वसंत साई अम्मा

 संदर्भ  - हा उतारा श्री वसंत साई आमच्या शिवसूत्र पुस्तकातून घेतला आहे. 

जय साईराम

 

रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

      " प्रत्येकाचा स्वतःचा व्यक्तिगत स्वभाव असतो व त्यानुसार भक्तिचे रूप आणि पद्धत बदलते. "


अवतार डॉल (बाहुली)


            त्यानंतर लक्ष्मी, सरस्वती, गायत्री, धन्वंतरी, दत्तात्रय अशा अनेक पदव्या आल्या. मी सर्व नाकारत म्हणाले, " ही मी नाही. ही मी नाही. " अशाप्रकारे, छोट्या 'मी' चा उत्तुंग शिखरावरून दऱ्यांमध्ये कोसळत चक्काचूर झाला. हातपाय मोडले. तरीसुद्धा जीव राहिला. शेवटी स्वामी मला 'अवतार' म्हणाले. ते नाकारत छोटा 'मी' हा हिमालयाच्या उत्तुंग शिखरावरून कोसळला आणि पूर्णपणे नाश पावला; काहीही मागे उरले नाही, अगदी ओळखसुद्धा. हेही एक पद आहे, असे म्हणून मी अवतारत्वही नाकारले.
            अवतारास जमणार नाही असे कार्य ह्या शक्ती करू शकतात. त्या विश्वमुक्ती देतात. सत्ययुगात कोणामध्येही 'मी' नसेल. ही काही एकट्या माणसाची शक्ती नाही. हे काम परमेश्वरापासून अलग झालेल्या त्याच्या शक्तीने केलं आहे.
          जॉन हिस्लॉपच्या ' सिकींग डीव्हीनिटी' पुस्तकाच्या पान ५० वरील उतारा खालीलप्रमाणे,
           ... काही दिवसांपूर्वी, एक आई रडत आपल्या लहान मुलाला घेऊन आश्रमात स्वामींच्या दर्शनासाठी आली. ,चोरांनी तिच्या मुलाला आंधळं केलं होत. त्या दिवशी तिच्या मुलाने मौल्यवान अलंकार घातले होते. ते चोरांनी लुबाडले आणि त्यांना ओळखू नये म्हणून चोरांनी त्या मुलाचे डोळे फोडले. आई रडत म्हणाली ' स्वामी माझ्या मुलासाठी काहीतरी करा. तो निष्पाप आहे ! माझ्या मुलाने असं काय केलं म्हणून त्याला एवढी मोठी शिक्षा ?" स्वामी म्हणाले, " थांब !तुला जे दिसत नाही ते मला दिसतंय. हा भोळा, निरागस मुलगा, त्याच्या पुर्वायुष्यात खूप क्रूर माणूस होता. त्याने अनेकांचे डोळे फोडले होते. म्हणूनच , मी आता त्याच्यासाठी काही करू शकत नाही. त्याच्या त्या पूर्वकर्मांची फळं त्याला भोगलीच पाहिजेत. आपल्या पूर्वजन्मांचं कर्मफळ आपण भोगतोय त्याची त्याला मोठा झाल्यावर ०जाणीव झाली आणि त्याच्या दुष्कृत्यांचा त्याला पश्चाताप झाला तर स्वामी त्याच्यासाठी काही करू शकतील, कदाचित !   
 
 

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०२३

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

" अळीपासून ब्रह्मपर्यंत सर्वांमध्ये परमेश्वराचे प्रतिबिंब पाहा. "


अवतार डॉल (बाहुली)


            अवतार विश्वमुक्ती प्रदान करू शकत नाही. म्हणूनच अफाट शक्तीच्या तुलनेत अवतार हे बाहुल्यांप्रमाणे भासतात.
           उदा. सिमल्याचे हिमालय शिखर हे 'मी' आहे; खोल दरीसह असलेली सामर्थ्यशाली शक्ती म्हणजे, 'ही मी नाही'. जसे सामर्थ्य वाढत जाते, तशी दरी खोल होत जाते. सिमला गुहेच्या उत्तुंग शिखराच्या कड्यावरील लहान 'मी' दरीमध्ये ढकलला जातो. लहान 'मी' दरीत कोसळतो आणि अस्तित्व गमावतो. तो त्याची वेगळी ओळख हरवून बसतो. मी हे सविस्तरपणे सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
            माझ्या पहिल्या पुस्तकात, स्वामी म्हणाले तू राधा आहेस. मी ते नाकारले. मी म्हणाले," मला ही पदवी नको, ही मी नाही, हे छोटयाशा टेकडीसारखे आहे." मी त्या टेकडीवरून पडले आणि थोड्याफार खरचटण्यावर निभावले. स्वामी नंतर म्हणाले की मी दुर्गा आहे. मी तेसुद्धा नाकारले. मी म्हणाले, " ही मी नाही, ही पदवी झाली." हे छोट्या डोंगराप्रमाणे आहे. डोंगरावरून पडल्यामुळे छोट्या 'मी' ला मोठी इजा झाली.   
 
 

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

           " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. "


अवतार डॉल (बाहुली)


१९ मार्च २००९ ध्यान
वसंता - स्वामी, ' अवतार बाहुली ' हा उपाय कसा होतो ?
स्वामी - जेव्हा परमेश्वर अवतार म्हणून येतो, तेव्हा तो अवतार आहे हे सिद्ध करण्यासाठी सर्व काही करतो. परंतु तो कर्मकायद्यात हस्तक्षेप करू शकत नाही. तू तुझ्या शक्तीने ते करू शकतेस. तू म्हणतेस ' ही मी नाही.... ही मी नाही. ' तुला 'मी' नाही. त्यामुळे तुझ्या शक्ती तुझ्या आत न राहता, तुझ्यामधून बाहेर पडतात आणि सर्व कार्य करतात. तू यावर चिंतन कर.
ध्यानाची समाप्ती
              मी चिंतन केले. अवतार साक्षी अवस्थेत असतो. परमेश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी तो सर्व काही करतो. परंतु कर्मकायद्यात हस्तक्षेप करू शकत नाही. तो काहींवर विशेष कृपावर्षाव करू शकतो, परंतु जगाचा कर्मनाश करू शकत नाही. माझी परमेश्वरासाठी असलेली एकाग्र तृष्णा हे माझं तपसामर्थ्य आहे, तरीसुद्धा जेव्हा मी म्हणते, ' ही मी नाही, ही मी नाही ', तेव्हा शक्ती माझ्यामध्ये येत नाहीत, त्या बाहेर जाऊन विश्वमुक्ती प्रदान करतात. मी कोण आहे हे मी जाणलं तर मी परमेश्वर अवस्थेत राहीन. 
 

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

    " यद भावं तद भवति. "


अवतार डॉल (बाहुली)


           अवतार या शक्तीच्या हातात असलेले का बरे पाहिले ? पूर्वीच्या अवतारांची कार्ये मर्यादित, अपूर्ण होती. सत्य पूर्णतया प्रकट झाले नाही. लोकांची क्षमता, त्यावेळची परिस्थिती आणि युगाच्या गरजेनुसार सत्य प्रकट केले गेले. अशाप्रकारे सत्य लपून राहिले होते.  आता ही वसंता आली आहे, आणि तिला अवतारांच्या त्रुटी काढून टाकायच्या आहेत. ती स्वामींना उच्चतर सत्य समजून सांगायला आणि प्रकट करण्यास सांगते आहे. ती स्वामींकडून ऊच्चतर ज्ञान आकर्षून घेऊन जगाला ते देत आहे. ती सत्यसाई अवताराकडून सत्य आकर्षून जगासमोर प्रकट करते. त्यांच्यावरील तिच्या अमर्याद प्रेमामुळे ती हे सर्व करू शकत आहे.
            पूर्वीच्या अवतारांच्या वेळी सत्याचे प्रकटीकरण पूर्णत्वाने झाले नाही. वर्तमान अवतार त्यांच्या मर्यादेत कार्य करतात. या मर्यादा काढून टाकण्यासाठी ती तप करीत आहे. तिच्या तपश्चर्येचे सामर्थ्य विश्वरूप धारण करते. ते अवतारांना बाहुल्यांप्रमाणे तिच्या हातावर दाखवते, तिच्या दिव्य पातिव्रत्याची ही शक्ती आहे. हेच या शक्तीचे अमर्याद सर्वव्यापक सामर्थ्य आहे.   
 

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
रत्न - ९


एस. पी. आर. : अम्मा तुम्ही राधेविषयीची काही दृश्य पाहिली आहेत का? तुम्ही तुमच्या एखाद्या पूर्व जीवनातील  काही दृश्य पाहिली आहेत का?
 अम्मा:  हो अनेक दृश्य पाहिली आहेत.  ध्यानात असताना स्वामी मला अनेक ठिकाणी घेऊन जात असत - कधी कधी तर आम्ही कृष्ण आणि राधेचे रूप घेत असू.  जेव्हा स्वामी आणि मी आम्ही दोघं बरोबर जात होतो तेव्हा आमचे रूप कृष्ण राधेच्या रूपात परिवर्तित होत असे. एक दिवस स्वामींनी मुरली वादन केले आणि तात्काळ मी त्यांच्या चरणांवर कोसळले.
एकदा स्वामी मुरली वादन करत असताना, त्यांचे वादन ऐकण्यासाठी, त्यांच्याभोवती पक्षी, प्राणी, मोर  असे विविध प्रकारचे जीव मी पाहिले. आम्ही दोघ राधा कृष्णाच्या रूपामध्ये नृत्य करत असलेलेही मी पाहत असे. आम्ही दोघं एकत्र गायन करत असू तसेच क्रीडा करत असू. मी जंगलामध्ये धावत असे आणि  मला पकडण्यासाठी स्वामी माझ्या मागे धावत असतं आणि मी (राधेच्या रूपात वृक्षांमागे लपून बसत असे.  मी कोठे लपले आहे ते शोधण्याचा कृष्ण प्रयत्न करत असे. तसे मी राधेविषयीचे कोणतेही दृश्य पाहिले नाही. एकदा स्वामी मला गोकुळात घेऊन गेले. त्यांनी मला यमुना नदी दाखवली. त्यांनी राधा कृष्णाच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला.  ते (कृष्ण रूपात) वृक्षाच्या वाकलेल्या फांदीवर बसत असत आणि मी त्यांची बासरी वाजवत असे. त्यांच्या भोवती गोपी जमा होऊन नृत्य करत असत. त्यांची मने ज्या उत्कट प्रेमभावाने व्याप्त होती तसा प्रेम भाव आता पाहायला मिळत नाही.  माझ्या खांद्यावर डोकं  ठेवून स्वामी मुरली वाजवत असतं. कृष्ण रुपात ते अनेक आभूषणे घालत असत. ते अत्यंत देखणे दिसत. राधाही सौंदर्यवती होती. ती सुद्धा अनेक प्रकारचे अलंकार घालत असे. गोपिका सुद्धा अत्यंत सुंदर होत्या.
एकदा कोदाई नावाची एक भक्त मला माझ्या घरी भेटायला आली आणि तिने मला कृष्ण, गोकुळ, राधा आणि गोपिका यांच्या विषयी विचारले. ती नुकतीच कुरुक्षेत्राला भेट देऊन आली होती आणि तिला असे लक्षात आले की कुरुक्षेत्राच्या  मंदिरातील राधा कृष्णाच्या मूर्तींवर त्याच प्रकारची आभूषणे होती जशी मी तिला अगोदर वर्णन करुन सांगितले होते. गोकुळाविषयीचे  तपशील नेमके तसेच होते.  राधा कृष्णाची वस्त्रेही अत्यंत सुंदर होती.
कृष्णाचा वर्ण निळा होता आणि राधा मात्र गौरवर्णी होती.
एकदा स्वामींनी मला मुरली वादन ऐकू नकोस असे सांगितले कारण त्यातून निर्माण झालेल्या स्पंदन लहरी माझा  देह सहन करू शकला नसता. किमान एकदा तरी  स्वामींनी मुरली वादन करावे अशी मी त्यांना विनवणी केली परंतु त्यांनी वरील कारण सांगून नकार दिला.

वरील उतारा "राधेचा पुनरावतार -  वसंत साई" या पुस्तकातून घेतला आहे.

--  श्री वसंतसाई अम्मा  🕉️🆚


🌸 ओम श्री साई वसंत साईसाय नमः  🌸











रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

    " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "


अवतार डॉल (बाहुली)


           उदा. ट्रेनच्या इंजिनमध्ये पाणी घातले जाते. ते गरम होऊन त्याची वाफ बनते. डोळ्यांना न दिसणारी ती वाफ कित्येक डब्यांची ट्रेन खेचू शकते. साध्या डोळ्यांना पाण्याची टाकी दिसते पण वाफ दिसत नाही. वसंताचे रूप हे त्या पाण्याच्या टाकीसारखे आहे, तिच्यामध्ये भगवान सत्यसाईबाबा पाण्याप्रमाणे भरले आहेत. तिच्या तपश्चर्येची शक्ती म्हणजे वाफ होय. हीच एकमेव शक्ती संपूर्ण जगाला परमेश्वराकडे खेचून नेणार आहे. ही तपश्चर्येची शक्ती कशी पाहायची ? ही सर्वशक्तिमान शक्ती चर्मचक्षूंनी दिसू शकत नाही, कोणीही ती पाहू शकत नाही, तरीही ती शक्ती जाणवत येईल, अनुभवता येईल. हे आहे सत्ययुग, प्रलयाविना होणारी जगाची निर्मिती.
            वाफ दिसू शकत नाही, परंतु आपल्याला ट्रेन हलताना दिसते. त्याचप्रमाणे वसंताचे विश्वरूप तिच्या तपश्चर्येच्या अदृश्य शक्ती दृश्यमान करतात.
 

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

     " परमेश्वराशिवाय कोणतीही गोष्ट अपरिवर्तनीय (अविकारी) नाही हे नेहमी लक्षात ठेवा. " 


अवतार डॉल (बाहुली)


           ती जिचं विश्वरूप चर्मचक्षूंना दिसूच शकणार नाही, जिचे हात कवंदसारखे लांब, जी सर्व अवतारांना लीलया स्वतःच्या हातांवर तोलते, जणू काही लहान मुलाच्या हातातील छोट्या बाहुल्या, जिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो आहे, ज्ञानानी जिचे डोळे चमकताहेत, स्वर्गीय अप्सरांप्रमाणे जिचं नृत्य आहे, जिच्या अंगोपांगातून अमृत वाहतंय, जिच्या ओठांवर विजयी स्मित झळकतंय, जी स्वर्ग- धरतीच्या क्षितीजांपलीकडील सत्याचे तेज आहे, जिची प्रभा कोटीसूर्यसम आहे; ही तिच वसंता का ?
           पहिली छोटीशी, भित्री, अश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांची वसंता, दुसऱ्या विश्वरूप वसंताला पाहते. दुसरी वसंता ही पहिल्या वसंताची शक्ती, तिचं सामर्थ्य, तिची ऊर्जा, तिच्या तपश्चर्येची शक्ती आहे. ही शक्ती म्हणजे वसंताच्या तपश्चर्येच्या सामर्थ्याचे मूर्तिमंत स्वरूप आहे.  
 

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

     " मनुष्य सिध्दींद्वारे जडवस्तूंचे सृजनीकरण करू शकतो परंतु जर तो त्याच्याही पलीकडे गेला तर तो परमेश्वर म्हणून स्वतःचे प्रकटीकरण करू शकतो. " 


अवतार डॉल (बाहुली)


           ह्या वसंत वेलीने स्वतःच्या प्रेमाने सत्याला बांधले, पृथ्वीवर आणून रुजवले. अशारितीने धरतीवर जन्मास आलेली नवी सृष्टी ह्या दोहोंमधून उदयास येते. मी माझ्या देहरूपाने विश्व व्याप्त केलेले पाहिले. ही माझी शक्ती आहे. मी एका हातात सत्यसाई अवतार तर दुसऱ्या हातात इतर अवतार पाहिले. मी पाहिले की शक्तीच्या विश्वरूपापुढे सर्व अवतारांची शक्ती फिकी आहे. मला दिसले, सजीव, निर्जीव सर्वकाही सत्य, प्रेम आणि ज्ञान यांनी ओतप्रोत भरले आहे. हे सर्व स्थळकाळ, नावारूपाच्या पलिकडचे आहे.
             आता प्रश्न उद्भवतो, ' पाहणारा कोण ?' प्रथम पाच फूट उंचीची वसंता हे दिव्य दृश्य पाहते. तिने कोणास पाहिले? तीसुद्धा वसंताच होती. तर मग खरी वसंता कोणती ? तीच का ती शांत, भित्री वसंता, नेहमी ध्यास घेणारी आणि काहीतरी किंवा कोणीतरी आपल्याला स्वामींपासून अलग करेल म्हणून सतत चिंतीत असलेली, अश्रुपूर्ण नयनांनी नेहमी ' राजू राजू' हाका मारणारी, दुसऱ्यांसाठी सर्वत्यागास सदैव तत्पर असलेली ? ही तीच पहिली वसंता का ? की दिव्य दृश्यात दिसलेली दुसरी वसंता ?
 

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम