ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल."
४
अवतार डॉल (बाहुली)
कर्मकायद्यावर उपाय काय ? आधीच्या गोष्टीत स्वामींनी त्या मुलाच्या आईला सांगितले की त्याने त्याच्या पूर्वकर्मांची शिक्षा भोगायलाच हवी. संपूर्ण आयुष्यभर तो यातना भोगेल. म्हातारपणी जर त्याला जाणीव झाली की आपल्या पूर्वजन्मीच्या कृत्यांची ही शिक्षा आहे आणि पश्चात्तापाने होरपळून जाऊन त्याने परमेश्वराजवळ दयेची भीक मागितली, तर स्वामी काही करू शकतील. तरीसुद्धा स्वामी म्हणाले, " कदाचित".
' सत्ययुग आणि कर्मकायदा ' पुस्तकात मी लिहिले आहे की आपल्याला बदलण्यासाठी आता फक्त २८ वर्षे उरली आहेत. स्वामी आपण सर्वांना एक संधी देत आहेत. हा मुद्दा तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन भोग जाणीवपूर्वक भोगा आणि स्वतःला बदलण्याचा मनापासून प्रयत्न करा; म्हणजे तुम्ही कर्मकायद्यातून मुक्त व्हाल. स्वामी म्हणाले,' कदाचित '. त्यांनी खात्री दिली नाही. परंतु मी नक्कीच करू शकते. माझे वैश्विक कृतज्ञतेचे भाव स्तूपाद्वारे जगभर व्यापतात.
जर तुम्हाला मदत हवी असेल, तर परमेश्वराची विनवणी करा आणि स्वतःला बदला, मग माझे कृतज्ञतेचे भाव नक्कीच तुम्हाला मदत करतील. हे ' कदाचित ' नाही; खात्रीने, खात्रीने ! खात्रीने !! हाच आहे उपाय.
***
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा