रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

      " प्रत्येकाचा स्वतःचा व्यक्तिगत स्वभाव असतो व त्यानुसार भक्तिचे रूप आणि पद्धत बदलते. "


अवतार डॉल (बाहुली)


            त्यानंतर लक्ष्मी, सरस्वती, गायत्री, धन्वंतरी, दत्तात्रय अशा अनेक पदव्या आल्या. मी सर्व नाकारत म्हणाले, " ही मी नाही. ही मी नाही. " अशाप्रकारे, छोट्या 'मी' चा उत्तुंग शिखरावरून दऱ्यांमध्ये कोसळत चक्काचूर झाला. हातपाय मोडले. तरीसुद्धा जीव राहिला. शेवटी स्वामी मला 'अवतार' म्हणाले. ते नाकारत छोटा 'मी' हा हिमालयाच्या उत्तुंग शिखरावरून कोसळला आणि पूर्णपणे नाश पावला; काहीही मागे उरले नाही, अगदी ओळखसुद्धा. हेही एक पद आहे, असे म्हणून मी अवतारत्वही नाकारले.
            अवतारास जमणार नाही असे कार्य ह्या शक्ती करू शकतात. त्या विश्वमुक्ती देतात. सत्ययुगात कोणामध्येही 'मी' नसेल. ही काही एकट्या माणसाची शक्ती नाही. हे काम परमेश्वरापासून अलग झालेल्या त्याच्या शक्तीने केलं आहे.
          जॉन हिस्लॉपच्या ' सिकींग डीव्हीनिटी' पुस्तकाच्या पान ५० वरील उतारा खालीलप्रमाणे,
           ... काही दिवसांपूर्वी, एक आई रडत आपल्या लहान मुलाला घेऊन आश्रमात स्वामींच्या दर्शनासाठी आली. ,चोरांनी तिच्या मुलाला आंधळं केलं होत. त्या दिवशी तिच्या मुलाने मौल्यवान अलंकार घातले होते. ते चोरांनी लुबाडले आणि त्यांना ओळखू नये म्हणून चोरांनी त्या मुलाचे डोळे फोडले. आई रडत म्हणाली ' स्वामी माझ्या मुलासाठी काहीतरी करा. तो निष्पाप आहे ! माझ्या मुलाने असं काय केलं म्हणून त्याला एवढी मोठी शिक्षा ?" स्वामी म्हणाले, " थांब !तुला जे दिसत नाही ते मला दिसतंय. हा भोळा, निरागस मुलगा, त्याच्या पुर्वायुष्यात खूप क्रूर माणूस होता. त्याने अनेकांचे डोळे फोडले होते. म्हणूनच , मी आता त्याच्यासाठी काही करू शकत नाही. त्याच्या त्या पूर्वकर्मांची फळं त्याला भोगलीच पाहिजेत. आपल्या पूर्वजन्मांचं कर्मफळ आपण भोगतोय त्याची त्याला मोठा झाल्यावर ०जाणीव झाली आणि त्याच्या दुष्कृत्यांचा त्याला पश्चाताप झाला तर स्वामी त्याच्यासाठी काही करू शकतील, कदाचित !   
 
 

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा