गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

        " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "


अवतार डॉल (बाहुली)


            आता दुसरे उदाहरण पाहू या. मला जेव्हा प्रथम धन्वंतरी शक्ती प्राप्त झाली, तेव्हा एक जोडपे त्यांच्या कार्तिक नावाच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. तो मुका, बहिरा आणि पूर्णपणे आंधळा होता. मी स्वामींजवळ प्रार्थना केली. स्वामी म्हणाले, " त्याला धन्वंतरी शक्ती दे आणि त्याच्या जिभेवर ' ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः '  लिही." त्यांनतर ते कुटुंब वरचेवर वडक्कमपट्टीला येत असे. एक महिन्यात त्या मुलाला दृष्टी मिळाली आणि तो बोलूही लागला. तो शाळेत जायला लागला, इतकेच नव्हे तर त्याला दिल्लीहून राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले.
            स्वामींना पूर्वजन्मांची कर्मे दिसतात. त्यामुळे ते कर्मकायद्यात हस्तक्षेप करत नाहीत. मी जरी त्यांची शक्ती असले, तरी मला 'मी' नाही, त्यामुळे मला कार्तिकचा पूर्वजन्म माहित नाही. म्हणून मी सहजपणे कर्मसंहार करू शकले. अवतार कर्मांमध्ये दखल देऊ शकत नाहीत, पण मी देऊ शकते. म्हणूनच * 'मी विना मी' च्या शक्तीसमोर अवतार बाहुल्यांप्रमाणे भासतात. अशाप्रकारे मी जगाची कर्म दूर करते.

*जिथे अहंभाव आत्मस्वरूपात विलीन झाले ती अवस्था    
 
 

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा