ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
श्री वसंतसाईचा जन्मदिन संदेश
इच्छा कल्पना आणि निर्मिती
एखाद्या लहान बालकाला खेळणे वा बाहुली हवी असते. त्याच्या कल्पना विश्वात, तो त्याच्या बाहुलीशी बोलतो, हसतो, खेळतो. क्रिकेट वा इतर खेळ खेळणारी, मोठी मुले, त्यांच्या आवडत्या खेळाडूंचे अनुकरण करुन त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीचा चित्रपट जगतातील आवडता नायक असतो ती व्यक्ती कल्पनेमध्ये स्वतः त्याच्यासारख्या अभिनय करून त्याच्यासारखी बनते.
तरुणांना विवाह करण्याची इच्छा असते तसेच आपल्याला एक सुंदर पत्नी आणि चांगली मुले असावीत
असेही त्यांना वाटते.
एखाद्याला परदेशात चांगली नोकरी मिळावी अशी इच्छा असते.
प्रथमतः आपण कल्पना विश्वात जगतो त्यानंतर ते सत्यात उतरते मनुष्याच्या इच्छेची परिपूर्ती म्हणजेच निर्मिती होय.
स्वप्न वास्तव बनते. यालाच म्हणतात यद् भावम् तद् भवती.
लोकांना अनेक इच्छा असतात. या जन्मात पूर्ण न झालेल्या इच्छा पुढील जन्माची निर्मिती करतात. या इच्छेनुरूप, कुटुंब स्थळ वेळ जन्म नाम आणि रूप निर्माण केले जाते. तो त्या विश्वामध्ये पुन्हा जन्म घेतो. अशा प्रकारे सर्वजण त्यांच्या इच्छांवर आधारित काल्पनिक विश्वामध्ये जीवन जगत आहेत.
मनुष्याचे विचार निर्मितीस कारणीभूत आहेत. सर्वांमध्ये ही निर्मितीची शक्ती आहे. परंतु ती प्रत्येकाच्या इच्छेनुसार बदलते. अगोदर मी असे लिहिले आहे की विचार हे निर्मितीचे कारण आहे.
प्रत्येकाचे एक काल्पनिक विश्व असते आपण त्या कल्पनेचा कल्पनेला सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर ते अस्तित्वात येते वा कृतीमध्ये उतरते. प्रथम मनात इच्छा उद्भवते त्यानंतर कल्पना आणि त्या पाठोपाठ प्रयत्न आणि अखेरीस निर्मिती.
मनुष्य देहामध्ये कुंडलिनी शक्ती विद्यमान आहे. त्या शक्तीला मर्यादा नाहीत. साधनेद्वारे ती शक्ती जागृत केली पाहिजे. नित्य आणि अनित्य यामधील भेद जाणला पाहिजे. आपण आपल्या सर्व इच्छा ईश्वराभिमुख केल्या पाहिजेत. अशा वेळेस कुंडलिनी शक्ती जिच्यामध्ये निर्मितीची शक्ती आहे, ती योग्य दिशेने संचालित केली जाते आणि परमात्म्याशी एकत्व साधण्यासाठी ती ऊर्ध्व दिशेने गमन करते.
श्री वसंत साई अम्मा
संदर्भ - हा उतारा श्री वसंत साई आमच्या शिवसूत्र पुस्तकातून घेतला आहे.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा