सोमवार, ९ ऑक्टोबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
रत्न - ९


एस. पी. आर. : अम्मा तुम्ही राधेविषयीची काही दृश्य पाहिली आहेत का? तुम्ही तुमच्या एखाद्या पूर्व जीवनातील  काही दृश्य पाहिली आहेत का?
 अम्मा:  हो अनेक दृश्य पाहिली आहेत.  ध्यानात असताना स्वामी मला अनेक ठिकाणी घेऊन जात असत - कधी कधी तर आम्ही कृष्ण आणि राधेचे रूप घेत असू.  जेव्हा स्वामी आणि मी आम्ही दोघं बरोबर जात होतो तेव्हा आमचे रूप कृष्ण राधेच्या रूपात परिवर्तित होत असे. एक दिवस स्वामींनी मुरली वादन केले आणि तात्काळ मी त्यांच्या चरणांवर कोसळले.
एकदा स्वामी मुरली वादन करत असताना, त्यांचे वादन ऐकण्यासाठी, त्यांच्याभोवती पक्षी, प्राणी, मोर  असे विविध प्रकारचे जीव मी पाहिले. आम्ही दोघ राधा कृष्णाच्या रूपामध्ये नृत्य करत असलेलेही मी पाहत असे. आम्ही दोघं एकत्र गायन करत असू तसेच क्रीडा करत असू. मी जंगलामध्ये धावत असे आणि  मला पकडण्यासाठी स्वामी माझ्या मागे धावत असतं आणि मी (राधेच्या रूपात वृक्षांमागे लपून बसत असे.  मी कोठे लपले आहे ते शोधण्याचा कृष्ण प्रयत्न करत असे. तसे मी राधेविषयीचे कोणतेही दृश्य पाहिले नाही. एकदा स्वामी मला गोकुळात घेऊन गेले. त्यांनी मला यमुना नदी दाखवली. त्यांनी राधा कृष्णाच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला.  ते (कृष्ण रूपात) वृक्षाच्या वाकलेल्या फांदीवर बसत असत आणि मी त्यांची बासरी वाजवत असे. त्यांच्या भोवती गोपी जमा होऊन नृत्य करत असत. त्यांची मने ज्या उत्कट प्रेमभावाने व्याप्त होती तसा प्रेम भाव आता पाहायला मिळत नाही.  माझ्या खांद्यावर डोकं  ठेवून स्वामी मुरली वाजवत असतं. कृष्ण रुपात ते अनेक आभूषणे घालत असत. ते अत्यंत देखणे दिसत. राधाही सौंदर्यवती होती. ती सुद्धा अनेक प्रकारचे अलंकार घालत असे. गोपिका सुद्धा अत्यंत सुंदर होत्या.
एकदा कोदाई नावाची एक भक्त मला माझ्या घरी भेटायला आली आणि तिने मला कृष्ण, गोकुळ, राधा आणि गोपिका यांच्या विषयी विचारले. ती नुकतीच कुरुक्षेत्राला भेट देऊन आली होती आणि तिला असे लक्षात आले की कुरुक्षेत्राच्या  मंदिरातील राधा कृष्णाच्या मूर्तींवर त्याच प्रकारची आभूषणे होती जशी मी तिला अगोदर वर्णन करुन सांगितले होते. गोकुळाविषयीचे  तपशील नेमके तसेच होते.  राधा कृष्णाची वस्त्रेही अत्यंत सुंदर होती.
कृष्णाचा वर्ण निळा होता आणि राधा मात्र गौरवर्णी होती.
एकदा स्वामींनी मला मुरली वादन ऐकू नकोस असे सांगितले कारण त्यातून निर्माण झालेल्या स्पंदन लहरी माझा  देह सहन करू शकला नसता. किमान एकदा तरी  स्वामींनी मुरली वादन करावे अशी मी त्यांना विनवणी केली परंतु त्यांनी वरील कारण सांगून नकार दिला.

वरील उतारा "राधेचा पुनरावतार -  वसंत साई" या पुस्तकातून घेतला आहे.

--  श्री वसंतसाई अम्मा  🕉️🆚


🌸 ओम श्री साई वसंत साईसाय नमः  🌸











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा