गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

    " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

१३ 
नभ गुरु 

या बाहुलीत परमेश्वरच हसतो आहे.
तोच या बाहुलीत रडतो
आणि तोच या बाहुलीला मारपीटही करतो
हं! म्हणजे मारणारा आणि मार खाणारा
दोन्ही परमेश्वरच
मी शून्य आहे.

हे नभा, आता मज उमजली कला तुझी
अंधार, प्रकाश, चंद्र, सूर्य, मेघ
काहीही घडू देत
नभ हे नभच राहते, अविचल
तशीच, ही बाहुली बाहुलीच राहील.
जे होईल तो (परमेश्वर) सोसेल
सर्व काही त्यालाच मिळते
प्रसिद्धीही त्याचीच,
दोषही त्यालाच.
मी हाकलले गेले
म्हणजे त्यांनी त्यालाच हाकलले
मला बसविले सिंहासनी
तर तोचि बैसे सिंहासनी.
आता मला उमगले

नभ राही स्थितप्रज्ञ,
दुरून देखता पर्वतशिखरे
स्पर्श करिती क्षितीजाला
अन् समीप जाता उमजे,
तो भासचि असे.
स्पर्श नाभासी अशक्य असे
ते व्यापुनी टाकी विश्व जसे
हीच स्थिती बाहुलीची असे.
प्रेम होतसे व्यापक
व्यापे सारे विश्व
बाहुली ही मूर्तिमंत प्रेम
तिज नसे 'मी',
ही असे परमेश्वराहाती बाहुलं
म्हणूनच ते नाभासम व्यापितसे सारे विश्व.
   
 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा