गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

  परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी प्रेम हा मार्ग आहे. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - ३२

 
           हे कृष्णा, त्यातून प्राप्त होणारे विजयसुख वा राज्य याची मी इच्छादेखील करू शकत नाही. हे गोविंदा, ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची सुखाची व जीविताची इच्छा करावी तेच रणांगणावर युद्धकरता सज्ज झाले आहेत तर मग आम्हाला या सर्वाचा काय उपयोग.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           हे भगवान कान्हा, या पाप्याला अन्य कशाचीही गोडी वाटू देऊ नकोस. मला फक्त तू हवा आहेस, तू हवा आहेस, तू हवा आहेस. मला तुझ्यासाठी व्याकुळ होऊ दे. मला तुझा ध्यास लागून तुझ्याविना मी कोमेजून मृतवत होऊ दे. तुझ्याशिवाय माझा त्राता कोण? यशोदेला मुखामध्ये विश्वदर्शन घडवणाऱ्या परमेश्वरा, माझं रक्षण कर. कान्हा, तुझ्या दर्शनाविना मी तळमळतो आहे हे करुणाकरा, माझ्यावर कृपा कर. गिरीधरा, गोविंदा, मला आपले  म्हण. हे व्यंकटेशा प्रभू तू माझा आसरा आहेस. शरणो शरणम्
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

महाशिवरात्री संदेश

 

भगवान बाबा सांगतात :
प्रत्येक रात्र आपण शिवरात्री समान कशी साजरी करू शकतो?
'शिवम्'चा अर्थ काय? त्याचा अर्थ आहे मंगलम. भौतिक दृष्ट्या मंगलम चा अर्थ काय आहे? जर एखाद्या व्यक्तीचा श्वास चालू असेल तर आपण ती व्यक्ती जीवित आहे असे म्हणतो आणि त्यालाच मंगलम असे म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीचा श्वास थांबला तर तुम्ही त्या व्यक्तीला शवम् म्हणता. शिवम् आणि शवम् मध्ये काय फरक आहे?
 शिवम् श्वसनाशी (श्वास आणि उच्छवास) संबंधित आहे. हे मंगलम कसे होते? हा श्वास आणि उच्छवास आत्म्याचे ज्ञान देतो. 

कसे? जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा तुम्ही 'सोs' म्हणता आणि जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडता तेव्हा तुम्ही 'हम' म्हणता. 'सोsहम' - 'मी तो आहे' अशा प्रकारे श्वास 'सोsहम' चे ज्ञान देतो. 'सो' म्हणजे 'तो' म्हणजेच परमेश्वर 'अहम्' म्हणजे 'मी'. तुमचा श्वास तुम्हाला 'मी परमेश्वर आहे, मी परमेश्वर आहे, मी परमेश्वर आहे.' असे शिकवतो. म्हणून 'मी परमेश्वर आहे' हे मंगलम आहे. ज्या क्षणी हे 'मी परमेश्वर आहे' हे थांबते तेव्हा ते अमंगल असते. जेव्हा श्वास चालू असतो तेव्हा जीवन असते जेव्हा श्वास थांबतो तेव्हा ते शवम् बनते.
ज्या रात्री तुम्ही परमेश्वराचे नाम उच्चारता ती शिवरात्र असते. शिवरात्र वर्षातून केवळ एकदाच येते असे नाही. प्रत्येक रात्र शिवरात्र आहे. जरी तुम्हाला रात्रभर परमेश्वराचे नामोच्चारण करणे शक्य नसेल तर किमान जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता आणि सकाळी उठल्यावर तुम्ही परमेश्वराचे नाम उच्चारू शकता. त्या रात्रीस शिवरात्र म्हणता येईल.
तुम्ही जमिनीमध्ये बी पेरता. बी पेरताना तुम्ही त्याच्या विशिष्ट स्थितीचा विचार करत नाही. त्याचा पुढे वृक्ष बनेल या अपेक्षेने नुसतं ते जमिनीमध्ये पेरता. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही रात्रभर कोणत्या न कोणत्या स्वरूपात परमेश्वराच्या नामाचे उच्चारण केलेत तर त्याचा वृक्ष बनेल आणि तुम्हाला मुक्तीचे फळ प्राप्त होईल.
या न त्या स्वरूपात परमेश्वराचे चिंतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच परमेश्वरावर लक्ष केंद्रित करणेही महत्त्वाचे आहे. तुमचे प्रेम परमेश्वराकडे न वळवता अन्य कोणत्याही गोष्टीकडे वळवले तर ती केवळ आसक्ती ठरेल. जर तुम्हाला तुमच्या मोहाचा नाश करायचा असेल तर तुम्ही तुमचे प्रेम परमेश्वराकडे वळवा. संपूर्ण रात्र, तुम्ही परमेश्वरावर मन केंद्रित करून,जेवढे शक्य असेल तेवढे परमेश्वराचे नामस्मरण करा. भजन गायनाद्वारे तुमच्या जीवनाचे सार्थक करु शकता. हीच खरी भक्ती आहे.  


जय साईराम

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२५


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

 
            स्वामींनी त्या भक्ताला सांगितले," शिवशक्तीच्या रूपाने मी तुझ्यासोबत राहीन."
            दुर्गा म्हणजे शक्तीचे स्वरूप हे आपण सर्वजण जाणतो. मग ती शिवशक्ती कशी होऊ शकते? हे काहीतरी नवीन नाही का?
            त्यानंतर ती मूर्ती वडक्कमपट्टीला आणण्यात आली. वडक्कमपट्टीला येण्याअगोदर ती मूर्ती नऊ वर्षे ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचे काय कारण असावे? स्वामींच्या आदेशानुसार मूर्तीचे वडक्कमपट्टी येथे आगमन, ध्यान सभागृहाचे उद्घाटन व 'इथेच याक्षणी मुक्ती' भाग - २ ह्या पुस्तकाचे प्रकाशन ह्या तिन्ही घटना एकाच वेळी घडल्या. मी भगवानांची शक्ती असल्याचे ह्या दोन्ही गोष्टींवरून सिद्ध होते. आतापर्यंत जगानी भगवानांची एकच बाजू पाहिली आहे. त्यांची दुसरी बाजू असल्याचे ह्या पुराव्यांद्वारे दर्शवली जाते शिवशक्ती ऐक्य, राधाकृष्ण मिलन आणि ब्रह्मरंध्र उघडल्याचे ह्यावरून सिद्ध होते.
             मी अविरत परमेश्वरासाठी अश्रू ढाळते. त्यांच्या प्रेमासाठी व्याकुळ झालेली मी त्यांची दासी आहे. माझे भाव भगवानांपर्यंत  पोहोचवण्यासाठी मी समस्त सृष्टीला दूत बनवण्यासाठी आर्जव केली. अशीच एक साश्रू नयनांनी त्यांना घातलेली साद प्रस्तुत आहे.

हे चंद्रमा
घेऊन जा माझा सांगावा
माझा प्रिय कन्हैयाकडे
म्हणेल का तो मज आपली
हे ना मी जाणत
हरवून गेले मी त्याच्या प्रेमात

हे चंद्रमा
हृदयमंदिरात माझ्या तो तळपतो
चोरीले माझे विचार सारे त्या चोराने
विरघळले मी,
विरघळले मी.

हे चंद्रमा
हे विश्व जाणते माझी प्रीती
तू पाहतोस, त्यांच्यासाठी झुरते मी किती
विनविते तुज सांग त्यासी
प्रतीक्षा करते मी त्याची

हे चंद्रमा
प्रतिसाद नाही देणार तो माझ्या सादेस
विश्व जाणतसे त्याचा बहाणा
प्रार्थना करिते,
प्रार्थना करिते मी माझ्या मधुरम प्रभुची.

मी हरघडी, हरदिनी परमेश्वरासाठी विलाप करत असे व्याकुळ होत असे; त्याने आपले म्हणावे म्हणून प्रतीक्षा करत असे प्रेम व गोकुळातील जीवनाशी संबंधित गायन करून त्याला आळवत असे. आता तो परमेश्वर, त्याने माझा स्वीकार केल्याचे दर्शवत आहे.
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

  " जसे भाव तसे जीवन."

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - ३१

        हे केशवा मला केवळ विपरीत लक्षणे दिसत आहेत. या युद्धामध्ये माझ्या आप्तस्वकीयांना ठार मारून कोणाचे आणि कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
            हे भगवान, केशवा, नारायणा, माधवा, मी एक क्षुद्र जीव आहे.  मला अशुभ संकेत दिसत आहेत. ते सर्व नाहीसे कर. मला शुभकाल दाखव. कालातीता, तू मला थेट तुझ्या चरणकमलापर्यंत घेऊन जा. माझे सर्व नातेसंबंध तुटोत. हे माधवा, जादुगारा, तू ब्रह्माला निर्मिती करण्यास सांगतोय! लक्ष्मीच्या प्रियवरा, हे राघवा माझ्या रावण बुद्धीचा नाश कर. मला तुझा भक्तदास बनव. मला तुझे कार्य करण्याची बुद्धी दे. मनामध्ये सदैव तुझेच विचार येऊ दे वासुदेवा.
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

  परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी प्रेम हा मार्ग आहे."

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - २८-३०

 
        हे कृष्णा या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या आप्तस्वकीयांना पाहून माझी गात्रे शिथिल झाली आहेत. घशाला कोरड पडली आहे. सर्वांगाला कंप सुटला आहे. शरीर रोमांचित होत आहे. माझ्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडले आहे. त्वचेचा दाह होत आहे. येथे उभे राहण्यास मी निः शक्त आहे. माझे मन चक्रावून गेले आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
            हे कान्हा, प्रभू, मला निर्भय बनव आणि आसरा दे. मला अनाठायी चिंता लागून राहिली आहे. देहाला कंप सुटतो आहे. घशाला कोरड पडते आहे. अंगावर शहारे येत आहेत. आदिनारायणा, मला आपले बनव. हे पांडुरंगा, भक्तरक्षका, तुझा सच्चा भक्त बनव. परमदयाळा, क्षीरसागरशयना! कान्हा! तूच माझे आश्रयस्थान आहेस.
           कान्हा! प्रभू! या दुबळ्याचा बेडा पार कर. या अगतिकाची तूच गती. तुझ्या चरणी घेऊन तूच कल्याण कर. त्राता, धर्मस्वरूपा, अश्वत्थपत्रवासा, आदिअंतररहित ईसा! तूच माझा आधार.
           कान्हा, भयातीता, यालाही तू भयातीत कर हातातून गांडीव निसटू देऊ नकोस. शारीरिक ताप निर्माण करू नकोस. स्थिरमती  कर. मनास गोते खाऊ देऊ नकोस. मधाच्या धारेप्रमाणे संतत, अखंड, स्थिर, अविचल, अचंचल, फक्त तुझा विचार येईल असं कर. श्रीनिवासा! जगदिशा! ईसा परिपूर्णा, पुरुषोत्तमा ! तूच फक्त आधार.
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

  " सौंदर्य भक्तिचे दुसरे नावं आहे."

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - २०

 
         हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरुढ झालेला पांडूपुत्र अर्जुन व्यूहरचनेतील धृतराष्ट्र पुत्रांकडे पाहून, धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
          हे प्रभू, कुंभकर्ण प्रमाणे निद्रिस्त असलेला या दासाच्या आत्म्याला जागं कर. अर्जुनाप्रमाणे त्याला युद्धासाठी सज्ज होऊ दे. हे प्रभू, ये आणि माझ्या हृदयसिंहासनावर विराजमान होऊन सत्य, रज आणि तमुगुनांमध्ये युद्ध घडवून आण. या विश्व नाट्याच्या सूत्रधारा शोधत शोधत आलो तुझ्या निवाऱ्याला.
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम





गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

          " आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार आपण कसे जगणार हे ठरवतो. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - १९

 
          हा विविध प्रकारचा शंखनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि अवैद्य मार्गांनी राज्य बळकावलेल्या धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           हे कान्हा, तुझ्या शंखनादाने माझ्या छातीची शकली कर. हे प्रभू, वेंकटेशा तू नादब्रह्म आहेस. तुझ्या शोधात फिरणाऱ्या मला तू नादोपासना दे. वाऱ्याच्या झुळकी बरोबर येणारे गीत ' काट्रीनिले वरूम गीतम ' माझ्या कानी पडू दे. हृदयाच्या गाभ्यातून मार्गदर्शन करणारे अंतर्यामीचे बोल मी ऐकून असं कर. तू माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

 
            आता दुर्गेची मूर्ती माझ्याकडे कशी आली ते आपण पाहूया. १९९१ साली, प्रशांती निलयम मध्ये दर्शनाचे वेळी स्वामी महिलांच्या बाजूला येऊन एका बंगलोरच्या भक्ताशी बोलले. त्यांनी तिला मैसूर येथे बनवलेली एक दुर्गेची मूर्ती घेऊन येण्यास सांगितले. स्वामींनी तिला ती मूर्ती तिच्या पुट्टपर्तीमधील देवघरात ठेवून ऑस्ट्रेलियामधील डॉ. विथी ह्यांच्या घरी पाठवण्यास सांगितली. त्यानुसार त्या स्त्रीने ती मूर्ती तिच्या पुट्टपर्तीमधील घरी आणली.
           त्यानंतर ऑस्ट्रेलियामधील सिडनीच्या एका भक्ताने ती मूर्ती दुर्गापूजेसाठी आपल्या घरी नेली व त्यानंतर ती डॉ. विथींच्या घरी पाठवली. स्वामींनी डॉ. विथींना ती मुर्ती वर उल्लेख केलेल्या सिडनीच्या भक्ताच्या घरी ठेवून तिची पूजा करण्यास सांगितले. त्यावेळी ती फक्त भारतात असल्यामुळे तिला ह्या घडामोडींची काहीही कल्पना नव्हती. ती ऑस्ट्रेलियाला परतल्यानंतर तिने दुर्गामातेची मूर्ती तिच्या घरात असल्याचे पाहिले.
            तेव्हापासून तिच्या घरामध्ये भजन पूजा होऊ लागली. प्रमुख सणवार प्रसंगी दुर्गा पूजा होऊ लागली. स्वामिनी तिला सांगितले," तू कोणालाही आमंत्रित करण्याची आवश्यकता नाही. मी लोकांना पाठवेन." पूजेसाठी अनेक भक्तमंडळी जमा होत असत. अशा तऱ्हेने नऊ वर्षे पूजा होत होती. दुर्गादेवी तेथे येणाऱ्या भक्तांच्या समस्यांचे निराकरण करत होती. दसऱ्याच्या दरम्यान तेथे येणाऱ्या एका युवकाचा स्वप्नात येऊन स्वामींनी सांगितले," तुझा नोकरीचा प्रश्न सुटेल मी तुला कुंकू देईन." लवकरच त्याला नोकरी लागली व त्याचे लग्नही झाले.
           मे १९९९ मध्ये सिडनीच्या भक्ताने ' इथेच, याक्षणी, मुक्ती (भाग-१) हे पुस्तक वाचले. पुस्तक वाचल्यानंतर तिने पात्रांद्वारे माझ्याशी संपर्क साधला. जेव्हा मी ऑस्ट्रेलियाला गेले तेव्हा तिने मला तिच्या घरी राहण्यासाठी आमंत्रित केले व तेथे मी दुर्गेची सुंदर मूर्ती पाहिली.

 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

          " आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार आपण कसे जगणार हे ठरवतो. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - १७,१८

 
          हे राजन, महाधनुर्धर, काशीनरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी,  विराट, दृष्टध्युन्म, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे  पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र अभिमन्यू यांनी सर्व देशांनी आपापले शंख फुंकले.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           हे भगवान या पाप्याला तुझ्या चरण कमलांशी घेऊन जा. हे कान्हा, मी जे जे पाहीन त्यामध्ये मला तुझे दर्शन होऊ दे. हे गरुडवाहना, या यःकश्चित जिवाचा मनोनाश होऊ दे. मला अहिंसक बनव. मला माझ्यामध्ये सर्वांना व सर्वांमध्ये मला पाहण्याची दृष्टी दे. माझ्या पाषाणहृदयामध्ये परिवर्तन घडवून मला दयाळू बनव. या पाप्याच्या पापांचा नाश कर. हे प्रभू, करुणाकरा तूच माझा आसरा आहे. शरणो शरणम्
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

          परमेश्वराला आपण काय समर्पित करतो हे महत्वाचे नसून कसे समर्पित करतो हे महत्वाचे आहे. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - १६

 
          कुंतीपुत्र राजा युधिष्टिराने आपला अनंतविजय नामक शंख फुंखला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख फुंकले.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           हे पद्मनाभा, या पाप्याला शुद्ध आणि पवित्र बनव. त्याला सत्याचा अनुयायी बनव. त्याला अहिंसेचा पुजारी बनव. तुझ्याशिवाय या अनाथाचा नाथ कोण ? माझ्यावर तुझी सदैव दृष्टी राहू दे. तुझ्या कृपेचा वर्षाव कर. माझ्या मनातील सामान्य विचारांचा विध्वंस होऊन तिथे उच्च विचार जागृत होऊ देत. गोविंदा, तूच माझा आश्रय! शरणो शरणम्
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, २ फेब्रुवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

  " जसे भाव तसे जीवन. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - १५

 
           भगवान श्रीकृष्णांनी आपला पत्र्चजन्य शंख फुंकला. अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजवला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने पैण्ड्र  नामक शंख फुंकला.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           हे प्रभू तू अनासकता आहेस. हे  करुणामया, या पाप्यालाही तू अनासक्त बनव. मला सर्व कर्म फलाशाविरहित करण्याची बुद्धी दे. माझी कर्मफलाबद्दलची आसक्ती नष्ट कर माझ्या हातून सदैव तुझे कार्य घडू दे. माझी सर्व कर्म तुझ्या चरणी समर्पित होऊ देत. हे नीलवर्णा, तूच माझा आसरा आहेस. शरणो शरणम्
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम