ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
दुर्गा म्हणजे शक्तीचे स्वरूप हे आपण सर्वजण जाणतो. मग ती शिवशक्ती कशी होऊ शकते? हे काहीतरी नवीन नाही का?
त्यानंतर ती मूर्ती वडक्कमपट्टीला आणण्यात आली. वडक्कमपट्टीला येण्याअगोदर ती मूर्ती नऊ वर्षे ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचे काय कारण असावे? स्वामींच्या आदेशानुसार मूर्तीचे वडक्कमपट्टी येथे आगमन, ध्यान सभागृहाचे उद्घाटन व 'इथेच याक्षणी मुक्ती' भाग - २ ह्या पुस्तकाचे प्रकाशन ह्या तिन्ही घटना एकाच वेळी घडल्या. मी भगवानांची शक्ती असल्याचे ह्या दोन्ही गोष्टींवरून सिद्ध होते. आतापर्यंत जगानी भगवानांची एकच बाजू पाहिली आहे. त्यांची दुसरी बाजू असल्याचे ह्या पुराव्यांद्वारे दर्शवली जाते शिवशक्ती ऐक्य, राधाकृष्ण मिलन आणि ब्रह्मरंध्र उघडल्याचे ह्यावरून सिद्ध होते.
मी अविरत परमेश्वरासाठी अश्रू ढाळते. त्यांच्या प्रेमासाठी व्याकुळ झालेली मी त्यांची दासी आहे. माझे भाव भगवानांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी समस्त सृष्टीला दूत बनवण्यासाठी आर्जव केली. अशीच एक साश्रू नयनांनी त्यांना घातलेली साद प्रस्तुत आहे.
हे चंद्रमा
घेऊन जा माझा सांगावा
माझा प्रिय कन्हैयाकडे
म्हणेल का तो मज आपली
हे ना मी जाणत
हरवून गेले मी त्याच्या प्रेमात
हे चंद्रमा
हृदयमंदिरात माझ्या तो तळपतो
चोरीले माझे विचार सारे त्या चोराने
विरघळले मी, विरघळले मी.
हे चंद्रमा
हे विश्व जाणते माझी प्रीती
तू पाहतोस, त्यांच्यासाठी झुरते मी किती
विनविते तुज सांग त्यासी
प्रतीक्षा करते मी त्याची
हे चंद्रमा
प्रतिसाद नाही देणार तो माझ्या सादेस
विश्व जाणतसे त्याचा बहाणा
प्रार्थना करिते,
प्रार्थना करिते मी माझ्या मधुरम प्रभुची.
मी हरघडी, हरदिनी परमेश्वरासाठी विलाप करत असे व्याकुळ होत असे; त्याने आपले म्हणावे म्हणून प्रतीक्षा करत असे प्रेम व गोकुळातील जीवनाशी संबंधित गायन करून त्याला आळवत असे. आता तो परमेश्वर, त्याने माझा स्वीकार केल्याचे दर्शवत आहे.
घेऊन जा माझा सांगावा
माझा प्रिय कन्हैयाकडे
म्हणेल का तो मज आपली
हे ना मी जाणत
हरवून गेले मी त्याच्या प्रेमात
हे चंद्रमा
हृदयमंदिरात माझ्या तो तळपतो
चोरीले माझे विचार सारे त्या चोराने
विरघळले मी, विरघळले मी.
हे चंद्रमा
हे विश्व जाणते माझी प्रीती
तू पाहतोस, त्यांच्यासाठी झुरते मी किती
विनविते तुज सांग त्यासी
प्रतीक्षा करते मी त्याची
हे चंद्रमा
प्रतिसाद नाही देणार तो माझ्या सादेस
विश्व जाणतसे त्याचा बहाणा
प्रार्थना करिते,
प्रार्थना करिते मी माझ्या मधुरम प्रभुची.
मी हरघडी, हरदिनी परमेश्वरासाठी विलाप करत असे व्याकुळ होत असे; त्याने आपले म्हणावे म्हणून प्रतीक्षा करत असे प्रेम व गोकुळातील जीवनाशी संबंधित गायन करून त्याला आळवत असे. आता तो परमेश्वर, त्याने माझा स्वीकार केल्याचे दर्शवत आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा