ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार आपण कसे जगणार हे ठरवतो. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १, श्लोक - १७,१८
हे राजन, महाधनुर्धर, काशीनरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, विराट, दृष्टध्युन्म, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र अभिमन्यू यांनी सर्व देशांनी आपापले शंख फुंकले.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
हे भगवान या पाप्याला तुझ्या चरण कमलांशी घेऊन जा. हे कान्हा, मी जे जे पाहीन त्यामध्ये मला तुझे दर्शन होऊ दे. हे गरुडवाहना, या यःकश्चित जिवाचा मनोनाश होऊ दे. मला अहिंसक बनव. मला माझ्यामध्ये सर्वांना व सर्वांमध्ये मला पाहण्याची दृष्टी दे. माझ्या पाषाणहृदयामध्ये परिवर्तन घडवून मला दयाळू बनव. या पाप्याच्या पापांचा नाश कर. हे प्रभू, करुणाकरा तूच माझा आसरा आहे. शरणो शरणम्
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा