ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जसे भाव तसे जीवन."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १, श्लोक - ३१
हे केशवा मला केवळ विपरीत लक्षणे दिसत आहेत. या युद्धामध्ये माझ्या आप्तस्वकीयांना ठार मारून कोणाचे आणि कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
हे भगवान, केशवा, नारायणा, माधवा, मी एक क्षुद्र जीव आहे. मला अशुभ संकेत दिसत आहेत. ते सर्व नाहीसे कर. मला शुभकाल दाखव. कालातीता, तू मला थेट तुझ्या चरणकमलापर्यंत घेऊन जा. माझे सर्व नातेसंबंध तुटोत. हे माधवा, जादुगारा, तू ब्रह्माला निर्मिती करण्यास सांगतोय! लक्ष्मीच्या प्रियवरा, हे राघवा माझ्या रावण बुद्धीचा नाश कर. मला तुझा भक्तदास बनव. मला तुझे कार्य करण्याची बुद्धी दे. मनामध्ये सदैव तुझेच विचार येऊ दे वासुदेवा.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा