रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५


   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

 " त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  २७ 
 
         जो मनुष्य सर्व चराचर भूतात परमात्म्याला आणि परमात्मा हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थित असल्याचे जाणतो तोच यथार्थ रूपाने पाहतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            मला अशाश्वतातील शाश्वत पाहू दे.  तू सर्व जीवांमध्ये समभावाने स्थित आहेस. मी अडाणी आहे. हे अच्युता, मला तुझे विश्वरूप पाहू देत. मला तू परमानंद दे. हे कमलनयना, कान्हा, मी तुला शरण आलो आहे. तू मला आश्रय दे.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

 

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " तपोबल व परमेश्वराप्रती एकाग्र प्रेम, वैश्विक कर्मांचा संहार करून सर्वांना मोक्षपदास घेऊन जात आहे."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  २६ 
 
          हे अर्जुना! जेवढे म्हणून चर आणि अचर प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच उत्पन्न होतात. हे जाण.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कान्हा! स्थावर असो वा जंगम, जन्मात येणारा प्रत्येक जीव क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून उत्पन्न झाला आहे. हे ज्ञान तू या मूढमतीला दे. तीन पावलात विश्व व्यापणाऱ्या. बामना गलोलाने मडकी फोडणाऱ्या बालकृष्णा, तू पांडवांचा दूत झालास. पद्मनाभा, करुणामया पाप्याला तुझा चरणपुष्पांवर स्वीकारून दुवा दे. तुझ्याविना मी अगतिक आहे. प्रभू! माय, बाप, गुरु, देव सर्व काही तूच! तुझाच भरवसा केला. कृपा कर कृष्णा.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

 

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " तपोबल व परमेश्वराप्रती एकाग्र प्रेम, वैश्विक कर्मांचा संहार करून सर्वांना मोक्षपदास घेऊन जात आहे."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  २५ 
 
          अध्यात्मिक ज्ञानाविषयी अनभिज्ञ असणारे काहीजण तत्त्वज्ञानी पुरुषांकडून ऐकून तद्नुसार उपासना करतात. ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा जन्ममृत्यूचा मार्ग खात्रीने पार करतात.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा, मला वेद माहित नाहीत. मी ते इतरांकडून ऐकले आहेत. तरीही त्यांची भक्ती भावाने आराधना करून मी मृत्यूवर विजय मिळवेन. हे सप्तगिरींच्या पल्याड वास करणाऱ्या व्यंकटेशा, तू नित्य नर्तन करतोस. मला क्षणोक्षणी तुझी भक्ती करावीशी वाटते. ती भावना माझ्यामध्ये निर्माण कर. हे ईश्वरा, मला तुझा भक्त बनव. या पाप्याच्या पापांचा संहार कर. प्रभू, कान्हा, परमेश्वरा, परमदयाळा, तू माझा आश्रयदाता आहेस.शरणो शरणम्.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
             स्वामी म्हणाले," युधिष्ठिराखेरीज सर्व पांडवांनी स्वर्गाच्या वाटेवरच देह त्यागले. फक्त युधिष्ठिरच सदेह स्वर्गाला गेले. तू ही सदेह स्वर्गाला जाशील. धर्माचरण केल्यामुळेच त्याला हे शक्य झाले तू हे भक्तीने प्राप्त करत आहेस. धर्माचरण केल्याने विपुल प्रमाणात सुजनता प्राप्त होते. युधिष्ठिराने व्यक्तिगत जीवनात खूप दुःख सोसले. त्यांच्या दुःखाच्या तुलनेत आपले दुःख काहीच नाही. ते राजा असूनही त्यांना त्यांच्या बंधू व पत्नीसह वनात पाठवले. त्यांच्या बारा वर्षांचा वनवासानंतर त्यांना अजून एक वर्ष अज्ञातवासात राहावे लागले. जर त्या वर्षात कोणी त्यांना पाहिले असते तर पुन्हा बारा वर्षे त्यांना वनवास भोगाव लागला असता. एवढेच नव्हे तर जेव्हा हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नीची विटंबना करण्यात आली तेव्हाही त्यांनी क्रोध व्यक्त केला नाही. त्यांनी शांतपणे सर्व दुःख सोसली. ते धर्माशी एकनिष्ठ असल्यामुळेच ते सदेह स्वर्गाला जाऊ शकले."


२१ जानेवारी २००१ प्राप्त ध्यान.
             स्वामी आणि मी स्वर्गात गेलो. मी आत गेले. तेथे इंद्र, इंद्राणी व इतर काही देव होते. मी म्हणाले," हे देवांचे अधिपती, मी संन्यास घेणार आहे. मला आशीर्वाद द्या. भगवानांप्रत पोहोचणे हेच माझे एकमात्र ध्येय आहे. केवळ याच कारणासाठी मी संन्यास घेत आहे. मला अन्य काही नको. मला आशीर्वाद द्या." मी सर्वांना वंदन केले इंद्रानी मला आशीर्वाद दिले व म्हणाले," तुमची मनोकामना पूर्ण होईल." सर्व स्वर्गीय देवांनी माझ्यावर पुष्पवृष्टी केली. मी पुन्हा प्रार्थना केली." सर्वांना मुक्ती मिळायला हवी." स्वामी आले सर्वांनी स्वामींना नमन केले. त्यानंतर स्वामी आणि मी परतलो.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम


गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

 

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  २४ 
 
          काहीजण परमात्माला आपल्या अंतरात ध्यानाद्वारे पाहतात. इतर काहीजण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे तर अन्य काहीजण निष्काम कर्मयोगाद्वारे पाहतात.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कृष्णा, याला आत्म्यातील आत्म्याची आत्म्याने जाणीव होण्यासाठी शक्ती दे. तूच परमात्मा होऊन याच्या आत्म्यास वास कर. या छोट्याश्या भिंतीवर तू येऊन रहा. कृष्णा, जर तू इथे आलास तर हे पडकं घर राजमहाल होईल. हे राजा, ये. तू वामन बनून आलास व त्रिविक्रमामध्ये वृद्धिंगत झालास. हे व्यंकटेश्वरा, मला सांख्य योगाचे आचरण करण्याची बुद्धी दे. माझ्या हातून सदैव तुझी कर्मे, सेवा घडू देत. तुझ्या भक्तीमध्ये रममाण होऊ दे. तू वेद आहेस. तू माझा आसरा आहेस.
 शरणो शरणम्.

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक   
 
           अशा रितीने जो मनुष्य पुरुष आणि प्रकृतीला त्रिगुणांसहित तत्त्वतः जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्म करत असला, त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी पुन्हा जन्माला येत नाही.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
             हे कान्हा, मला पुरुष, प्रकृती व त्यांचे गुण याबद्दलचे शिक्षण दे. हे अनाथरक्षका, तू अनाथांचा नाथ आहेस. हे बांधवा, तू सर्वांची आपत्तीतून सुटका करतोस. केवळ तूच या निराश्रिताचा आधार आहेस. हे प्रभू, तू माझा निवारा आहेस. तुला मी अनन्य शरण आलो आहे. तू मला अनासक्त बनव. तू मदुरैमध्ये पेरुमल म्हणून स्थित आहेस. श्रीरंगममध्ये रंगनाथ म्हणून पहुडला आहेस. तर तिरुपती मध्ये व्यंकटेश्वर होऊन उभा आहेस. वामन अवतार घेऊन तू अवकाश आणि पृथ्वी व्यापतोस. तूच श्रीराम, बलराम, परशुराम, पांडवांचा दूत आहेस. तू पुरुष आणि स्त्री दोन्ही आहेस. तू इथे आहेस आणि नाहीसही.  हे आदिनारायणा तू मला तुझ्या चरणांशी घे. शरणो शरणम्. 

             माझ्या वडिलांनी त्यांच्या डायरीची सुरुवात दि. १ जानेवारी १९५३ साली गीतेच्या १३ अध्यायातील २३ व्या श्लोकापासून केली. हा श्लोक पुरुष प्रकृती लक्षणांचे विवरण करतो. ज्याला हे माहित आहे, तो कोणत्याही पथावरून वाटचाल करत असला तरी पुनर्जन्मापासून मुक्त असतो. माझ्या वडिलांनी पुरुष प्रकृती तत्त्व जाणण्याचा तळमळीने आपले उभारून येणारे भाव व्यक्त केले. ते पुरुष आणि प्रकृती यांच्या समवेत वावरत होते यद्यपि पूर्णतः अजाण होते.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

 

गोकुळाष्टमी संदेश

 

              गोकुळामध्ये असताना कृष्ण आठ वर्षांचा होता आणि सर्व गोपी विवाहित असून त्या त्यांच्या पती आणि मुलांबरोबर कौटुंबिक जीवन जगत होत्या. सर्वजणी कृष्णाकडे आकर्षित झाल्याने सतत त्याच्या अवतीभवती फिरत असत. त्यावेळी कृष्ण त्यांच्याबरोबर रासलीला खेळत असे. रासलिलेच्या दरम्यान, प्रत्येकीला कृष्णाचे दर्शन, स्पर्शन आणि संभाषणाचा  लाभ होत असे.
             जरी कृष्ण बालक होता तरी त्या त्याच्या दिव्यत्वाकडे आकर्षित होऊन  स्वतःला विसरून जात असत. कृष्ण म्हणजे मूर्तिमंत्त  माधुर्य होय. हे माधुर्य मनाला भुरळ घालणारे होते.  त्याच्या रूपाची मोहिनी विलक्षण होती आणि त्याचे प्रेम अतुलनीय होते. या त्याच्या गुणांवर सर्व गोपी मोहित झाल्या होत्या. गोपगोपींच्या निष्पाप, निरागसतेमुळे त्यांना कृष्णाच्या स्पर्शातून  परमानंदाचा लाभ झाला जो की कृष्णाच्या राण्यांनाही  मिळू शकला नाही.गोपींना देहाचे आकर्षण नव्हते तर आत्म्याचे आकर्षण होते म्हणून त्यांनी कृष्णाला आत्मनिवेदन केले. ज्यांच्यासाठी देह केंद्रस्थानी असतो  त्यांना परमानंदाची अनुभूती होऊ शकत नाही. गोपगोपी कोणी सर्वसामान्य जीव नव्हते. त्यांनी पूर्वीच्या अनेक जन्मात अनेक सत्कर्म केल्यामुळे त्यांना हे सौभाग्य लाभले.
               कृष्णाने वृंदावनमधील ग्रामस्थ  गोपगोपींच्याद्वारे मोक्षप्राप्तीसाठी केवळ निष्पाप आणि विशुद्ध प्रेम पुरेसे आहे हे दर्शवले.  त्या भोळ्या भाबड्या  गोपगोपींसाठी मोक्षाची द्वारे खुली केली. राधेची मधुर भक्ती ही भक्तीच्या कोणत्याही प्रकाराहून अधिक श्रेष्ठ आहे  हे कृष्णाने दाखवून दिले.

श्री वसंतसाई अम्मांच्या आनंद सूत्र या पुस्तकातून

 

जय साईराम

 



रविवार, १० ऑगस्ट, २०२५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
             शुकमुनी म्हणाले," विश्वकल्याणासाठी तुम्ही सर्वस्वाचा त्याग केलात. सर्व वाईट गोष्टी पासून मी तुमचे रक्षण करेल कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही व तुमची प्रगती रोखू शकत नाही." नंतर त्यांनी मला किरमिजी रंगाचे एक छोटेसे फळ खाण्यास दिले. ते म्हणाले," या फळांमध्ये माझ्या सर्व शक्ती आहेत." त्याला ते मधुफल म्हणत. त्यानंतर स्वामी आणि मी रुपेरी बेटावर परतलो.
             संध्याकाळी मी स्वामींना विचारले," शुकमुनी आणि आपल्यामध्ये काय नाते आहे? त्यांना पाहून मला काय झाले?" स्वामी म्हणाले," शुकांनी परीक्षित राजास श्रीमद् भागवद कथन केले. कृष्ण लीलामध्ये ते स्वतःला हरवून बसले आणि राधेच्या भक्तिने स्वतःला विसरले हे नाते आहे."
            काकभुजंग नाडीमध्ये असे म्हटले आहे की मला शिर्डीबाबा आणि शुकमुनींची कृपा प्राप्त आहे. ह्याच कृपेमुळे माझे नाव जगभरात पसरेल. स्वामी म्हणाली की शुकमुनी सर्वोत्तम संन्यास याचे प्रतीक आहे. मातेच्या गर्भात असताना, मायेच्या बंधनात अडकू नये यासाठी त्यांनी जन्म घेण्याचे नाकारले. १२ वर्षानंतर त्यांनी जन्म घेतला व तत्क्षणी ते " हे प्रभु! हे प्रभु !" असा धावा करत जंगलांच्या दिशेने धावले. असे म्हणतात की त्यांचे पिता व्यासमुनी ' हे पुत्रा! हे पुत्रा! असे म्हणत त्यांच्या मागे धावले.

२० जानेवारी २००१ ध्यान
             स्वामी आणि मी हिमालयात गेलो. एका ठिकाणी आम्ही थांबलो. स्वामी म्हणाले," या मार्गावरून पांडव स्वर्गाच्या दिशेने गेले अचानक तेथे एक देव प्रकट झाले त्यांच्या बाजूला एक रेडा होता. ते यमराज असल्याचे मी जाणले मी त्यांच्या चरणी वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मी त्यांना म्हणाले," माझ्याकडे प्रार्थनेसाठी येणाऱ्या भक्तांना अडचणी येऊ नयेत त्यांचे रक्षण व्हावे. त्यानंतर मी एका भक्तांच्या मूत्रपिडाच्या शस्त्रक्रियेसाठी प्रार्थना केली. मी यमराज यांच्या भोवती तीन प्रदक्षिणा घातल्या व त्यांना वंदन केले त्यांनी मला पुन्हा आशीर्वाद दिले.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १२, श्लोक १३ १४ 
 
           जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करत नाही आणि सर्व जीवांप्रती मैत्रभाव ठेवतो, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाक्षशील, सदैव संतुष्ट, आत्मसंयमी आहे, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा आहे, ज्याने मन आणि बुद्धी मलाच अर्पण केली आहे, असा माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
         
हे भगवान, या पाप्याला मनात कोणाविषयीही वैरभाव येऊ देऊ नकोस. त्याच्या मनात सर्वांविषयी मैत्र आणि करुण भाव असू देत. त्याच्या मनातील 'मी आणि माझी' नष्ट कर. त्याला सुखदुःखामध्ये बुडून जाऊ देऊ नकोस. सोशिक बनव. या कुचकामी जीवाला गुणवान बनवण्यासाठी त्याला सदैव तुझे गुणगान करण्याची आणि तुझ्या सुवर्ण चरणांचे ध्यान करण्याची बुद्धी दे. तूच माझा आश्रय.शरणो शरणम्. हे भगवान, या पाप्याला सदा संतुष्ट, आत्मसंयमित ठेव. तसेच मन व बुद्धीने दृढ निश्चयी कर. मन व बुद्धी तुला अर्पण करायला लावून मला तुझा सेवक आणि योगी बनव. मला तुझा प्रिय भक्त बनव. हे सर्व स्वतः मिळवण्याची शक्ती माझ्यामध्ये नाही. या श्वानाला सद्गुनी बनव. मला तुझा सखा बनव. तू माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " मनामध्ये कधीही न शमणारी आध्यात्मिक तृष्णा जागृत झाल्यास नरजन्माचे सार्थक होते."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १०, श्लोक ३१  
 
           मी पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू आहे, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रीराम आहे तसेच माशांमध्ये मगर आहे आणि नद्यांमध्ये गंगा आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          कान्हा, मायाविलोला, माधवा, पवित्र करणाऱ्यांमध्ये तू वायू आहेस, याचा या पाप्याला बोध करून दे. शस्त्रधाऱ्यांत श्रीराम आहेस. हे महाराजा, हा मनुष्य जेव्हा कुचकामी होईल तेव्हा तुझ्या रामबाणांनी त्याचा वध कर. तू माशात मगर आहेस. मला तुझा मत्स्यावतार दाखव. तू नद्यांमध्ये गंगा आहेस. या पाप्याने गंगेत, क्षीरसागरात बुडी मारू देत. अशा रितीने त्याला मुमुक्षू बनव. हे त्रैलोक्याधिपते, प्रभू परमेश्वरा,  शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, ३ ऑगस्ट, २०२५


   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " जादूटोणा, चमत्कार वा मंत्र याद्वारे, प्रेम एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये स्थलांतरीत करता येत नाही."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १०, श्लोक १८ 
 
           हे जनार्दना, कृपया आपली योग शक्ती आणि ऐश्वर्य याचे पुन्हा विस्ताराने वर्णन करून सांग कारण तुझी अमृतमय वचने ऐकत असताना माझी तृप्तीच होत नाही.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे जनार्दना, कान्हा, समुद्रमंथन करून तू अमृत दिलेस. आता या क्षुद्र जीवाचे मंथन करून त्याला तुझ्या महिमा व योगशक्ती स्पष्ट करून सांग. कृपया पुन्हा त्याला सविस्तर सांग. तुझी अमृतवाणी या कमजोर सेवकाचे हृदय जिंकू दे. हे आदिमूला, हे भोग आता पुरे झाले. आता याक्षणी त्याला तुझ्या दिव्य चरणांशी घे. कान्हा, कान्हा, तूच माझा आधार. प्रभू, शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम