रविवार, १० ऑगस्ट, २०२५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
             शुकमुनी म्हणाले," विश्वकल्याणासाठी तुम्ही सर्वस्वाचा त्याग केलात. सर्व वाईट गोष्टी पासून मी तुमचे रक्षण करेल कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही व तुमची प्रगती रोखू शकत नाही." नंतर त्यांनी मला किरमिजी रंगाचे एक छोटेसे फळ खाण्यास दिले. ते म्हणाले," या फळांमध्ये माझ्या सर्व शक्ती आहेत." त्याला ते मधुफल म्हणत. त्यानंतर स्वामी आणि मी रुपेरी बेटावर परतलो.
             संध्याकाळी मी स्वामींना विचारले," शुकमुनी आणि आपल्यामध्ये काय नाते आहे? त्यांना पाहून मला काय झाले?" स्वामी म्हणाले," शुकांनी परीक्षित राजास श्रीमद् भागवद कथन केले. कृष्ण लीलामध्ये ते स्वतःला हरवून बसले आणि राधेच्या भक्तिने स्वतःला विसरले हे नाते आहे."
            काकभुजंग नाडीमध्ये असे म्हटले आहे की मला शिर्डीबाबा आणि शुकमुनींची कृपा प्राप्त आहे. ह्याच कृपेमुळे माझे नाव जगभरात पसरेल. स्वामी म्हणाली की शुकमुनी सर्वोत्तम संन्यास याचे प्रतीक आहे. मातेच्या गर्भात असताना, मायेच्या बंधनात अडकू नये यासाठी त्यांनी जन्म घेण्याचे नाकारले. १२ वर्षानंतर त्यांनी जन्म घेतला व तत्क्षणी ते " हे प्रभु! हे प्रभु !" असा धावा करत जंगलांच्या दिशेने धावले. असे म्हणतात की त्यांचे पिता व्यासमुनी ' हे पुत्रा! हे पुत्रा! असे म्हणत त्यांच्या मागे धावले.

२० जानेवारी २००१ ध्यान
             स्वामी आणि मी हिमालयात गेलो. एका ठिकाणी आम्ही थांबलो. स्वामी म्हणाले," या मार्गावरून पांडव स्वर्गाच्या दिशेने गेले अचानक तेथे एक देव प्रकट झाले त्यांच्या बाजूला एक रेडा होता. ते यमराज असल्याचे मी जाणले मी त्यांच्या चरणी वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मी त्यांना म्हणाले," माझ्याकडे प्रार्थनेसाठी येणाऱ्या भक्तांना अडचणी येऊ नयेत त्यांचे रक्षण व्हावे. त्यानंतर मी एका भक्तांच्या मूत्रपिडाच्या शस्त्रक्रियेसाठी प्रार्थना केली. मी यमराज यांच्या भोवती तीन प्रदक्षिणा घातल्या व त्यांना वंदन केले त्यांनी मला पुन्हा आशीर्वाद दिले.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा