ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
प्रस्तावना
श्री अरविंदच्या 'सावित्री' या पुस्तकातील पुष्कळ भाग अधोरेखित करून स्वामींनी दिव्य संदेश म्हणून मला दिले. मी स्वामींना विचारता स्वामी म्हणाले," मी या पुस्तकात अधोरेखित केलेल्या भागांवर आधारित तू तुझ्या जीवनाची तुलना सावित्रीच्या जीवनाशी कर."
पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर मी अचंबित झाले; कारण माझी व सावित्रीची जीवनशैली समांतर आहे. मी विचार केला," श्री अरविंदना माझ्याबाबत कसे बरे ठाऊक झाले?" या पुस्तकात त्यांनी जीवात्म्याचा अंतर्गत प्रवास व सत्यप्राप्तीच्या मार्गावर येणाऱ्या अडथळ्यांचा करावा लागणारा सामना याविषयी लिहिले आहे. कुंडलिनीचे एकेक चक्रपार करून जात असता जे बदल घडतात ते अरविंद आणि सविस्तर लिहिले आहेत.
संदर्भ - सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा