रविवार, १८ जून, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " परमेश्वर केवळ एकच आहे, आपण सर्वजण त्याची लेकरे आहोत हे सत्य आहे." 

प्रकरण नऊ 

साधनापथावरील पत्रे 

                   प्रभू ! तुमच्या मनोरंजनासाठी तुम्ही हे विश्व निर्माण केलेत. तुम्ही निर्माण केलेला मानव जेव्हा मार्गावरून घसरला तेव्हा त्याला सुधारण्यासाठी, आपल्या छत्रछायेत घेण्यासाठी तुम्ही भूतलावर आलात. तुम्ही आमच्यासाठी  अनेक महान कार्ये केलीत. स्वामी ! साईराम !तुम्ही आतापर्यंत केलेल्या वाटचालीने तुमचे पाय दुखत असतील. बोलून बोलून तुमचे दिव्य मुखही थकले असेल. 
                   हे प्रभूवरा ! या सर्वासाठी आम्ही तुमचे आभार कसे मानावे ?
                   तुमच्या निर्मितीतील एका अज्ञात कोपऱ्यात राहणाऱ्या माझ्यासारख्या एका यःकश्चित जीवामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी तुम्ही कृपा वर्षाव केलात. 
                   तुमच्या दिव्य चरणांवर अनेक प्रणाम. प्रभू तुम्हीच माझे रक्षण करत आहात. तुम्हीच माझा आसरा आहात. मी पूर्णपणे तुमच्यावर विसंबून असावे ;तसेच मला क्षणोक्षणी तुमच्या सान्निध्याची अनुभूती घेता यावी, यासाठी कृपा करून मला आशीर्वाद द्या. 
                   हे प्रभू, मी तुम्हाला क्षणभरही विसरू शकत नाही. साईराम, साईराम तुम्ही माझ्यावर काय जादू करत आहात ? पुन्हा पुन्हा मी तुमच्या दिव्य चरणांवर नतमस्तक होत आहे. ही माझ्या प्रेमाची छोटीशी झलक आहे. तुम्ही दाखवलेल्या करुणेप्रति माझ्या कृतज्ञतेची झलक आहे. तुमच्या दिव्य चरणांशी मी संपूर्ण शरणागत झाले आहे. स्वामी, कृपया माझा स्वीकार करा. तुम्हीच माझे एकमेव आश्रयस्थान आहात. 
तुमची प्रेमळ बालिका 
वसंता 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

गुरुवार, १५ जून, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          "  सर्व गोष्टींची अनुभूती घेण्याची इच्छा ठेवू नका तर सर्वांतर्यामी परमेश्वराची भक्ती करा. "

प्रकरण नऊ 

साधनापथावरील पत्रे 
 
६ फेब्रुवारी १९८६ 
माझ्या प्रेमभगवानांच्या दिव्य चरणकमली, 
                            कोटी कोटी प्रणाम ! 
               स्वामी, माझे प्रभू, दररोज तुम्ही मला तुमचे अस्तित्व जाणवून देत आहात. मला तुमचे सान्निध्य जाणवते. गेले दोन दिवस माझे मन आनंदात विहरत आहे. प्रभू, माझे साईराम, तुम्हीच माझे सर्वस्व आहात. मी प्रत्येकामध्ये तुम्हालाच पाहते. संपूर्ण जग आनंदात असू दे. 
              स्वामी, कृपा करून जगातील सर्व दुःखे दूर करा. स्वामी तुमची करुणा अपरंपार आहे. त्याचे मोजमाप तरी कसे करणार ? कृपा करून लोकांचे दुःख दूर करा आणि त्यांना योग्य मार्गावर वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करा. हे भगवान ! तुम्ही अवतार बनून अवतरला व भूतलावरील जनांची सेवा करत आहात. केवढी ही करुणा ! याची कशाशी बरोबरी करता येईल का ? 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, ११ जून, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " कोणत्याही एकाग्रतेने व मनःपूर्वक केलेल्या कृतीमधून प्रेम प्रकट होते."

प्रकरण नऊ 

साधनापथावरील पत्रे 

२१ डिसेंबर १९८५ 
           माझ्या प्रिय प्रभूंच्या दिव्या चरणकमळी, 
                       अनंत कोटी प्रणाम !
           स्वामी, तुम्हाला माझी तळमळ नाही का समजत ? मला तुम्हाला प्राप्त करायचे आहे. तुम्हाला ही तृष्णा माहित नाही का ? मला सांगा नं की मी तुमची भक्त आहे. कृपा करून माझा स्वीकार करा. मन व देहाच्या विकारांमुळे मी दुःख सोसते आहे. स्वामी, तुमच्या व्यतिरिक्त मला कुणाचा आश्रय ? मला पूर्ण श्रद्धा प्रदान करा. 
             हे भगवंता, कर्माचे ओझे कमी करून मला मुक्त करा. तुमचे क्षणभरही विस्मरण होणार नाही, असा मला वर द्या. मी तुमची जास्तीत जास्त अनुभूती घेऊ शकेन, असा मला आशीर्वाद द्या. तुम्हीच माझे एकमेव आश्रयस्थान आहात. 
तुमची प्रिय बालिका 
वसंता 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, ८ जून, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" सौंदर्य भक्तीचे दुसरे नांव आहे."


प्रकरण नऊ 
साधनापथावरील पत्रे 

              " आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण म्हणजे परमेश्वसोबत राहण्याची संधीच आहे." 
               माझ्या आयुष्यामध्ये कोणतेही गुपित नाही. मग माझ्या प्रभूंना ही पत्रे मी पेटीत का दडवून ठेवू ? ही पत्रें, पथावरील अश्रूंच्या मागे राहिलेल्या खुणा व भक्तीमधील आनंद व्यक्त करण्यासाठी रडत आहेत. उत्तुंग शिखर चढणाऱ्या गिर्यारोहकाप्रमाणे ही ( पत्रे ), परमेश्वरप्राप्तीचे परमोच्च शिखर गाठणाऱ्या साधकांनी अनुसरलेली बिकट वाट आणि या प्रवासातील जीवात्म्याच्या सत्वपरीक्षा यांचे यथार्थ दर्शन घडवितात. वाचकांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात ही भक्तिभावपूर्ण पत्रे सहाय्य्यभूत ठरतील, अशी मला आशा वाटते आणि म्हणून मी या पत्रांचा समावेश करत आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, ४ जून, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" परमेश्वराला अनुभूती घेण्यासाठी भूतलावर अवतरावे लागते." 

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात 

               ध्यानात स्वामींनी मला सांगितले की मी माझ्या उदरातून त्या मुलांना वेगवेगळ्या मातांकडे पाठवावे. २००१ मध्ये मी एक बालक श्रीलंकेतील एका जोडप्याला दिले. २००२ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ६ बालकांनी जन्म घेतला. ही जन्मलेली सहा बालके म्हणजे अवतारकार्यात सहाय्य करणारी नवरत्ने आहेत. भाव रूप कसे धारण करतात, याचेच हे उदाहरण आहे. ध्यानामध्ये केवळ आमच्या भावसंगमातून सहा बालके प्रत्यक्ष जन्माला आली. याप्रमाणे स्वामींचे भाव आणि माझे भाव यातून नूतन सृष्टी निर्माण होईल. स्वामी २००० सालातील हे उदाहरण दाखवत आहेत. आज २००९ साल चालू आहे. माझी सर्व साधना पूर्ण झाली आहे. 

जय साईराम

गुरुवार, १ जून, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

          " जेव्हा सत्य आणि प्रेम यांचा संयोग होतो तेव्हा प्रेम, ज्ञान आणि सत्य यावर अधिष्ठित नव्या विश्वाची निर्मिती होते. "

प्रकरण आठ

प्रेमभाव रूप धारण करतात

               हिंदूचा विश्वास आहे की मनावर बिंबलेले ठसे आपला पुढील जन्म ठरवतात. हे पुनर्जन्माचे तत्वज्ञान आहे. माझी सर्व काव्ये व गीते माझ्या मनावरील खोल ठशांच्या तात्विक वृत्तीचे निदर्शन करतात. उदा. कृष्ण माझे प्राणतत्व आहे हे वयाच्या पाचव्या वर्षीच मला कसे समजले ? हे माझे गतजन्मीचे संस्कार आहेत. कृष्णावतारात मी राधेचे प्रेम दर्शवले. राधेचे प्रेमच या जन्मातसुद्धा असून ते अधिक व्यापक व गहिरे झाले आहे. 
                रुपेरी बेटावर स्वामींनी एक पारिजातकाचा वृक्ष निर्माण केला. त्या पारिजातक वृक्षाखाली बसून स्वामी आणि मी बोलत असू. एकदा स्वामी म्हणले," तुझी विनयशीलता आणि भक्ती पाहून ही पारिजातकाची फुले तुझ्यासाठी पायघड्या बनतील आणि मग आपल्याला बसून बोलण्यासाठी फुलांचा गालिचा बनतील." नंतर माझ्या उदराला स्पर्श करून ते म्हणाले," तू अमृत कलश आहेत. नऊ मुले जन्माला येतील." मी खूप घाबरले. मी नऊ मुलांना कसा काय जन्म देणार ? 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, २८ मे, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

          " प्रेम आणि त्याग हे दोन समांतर रेषांसारखे आहेत. प्रेमाद्वारे त्यागभाव वृद्धिंगत होतो व त्यागाद्वारे प्रेमभाव वृद्धिंगत होतो."

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात 

                 अंतसमयी राधेला कृष्णाकडून वर मिळाला, तो वर एक विचार बनून अंतरिक्षात फिरत होता. योग्य वेळ येताच त्या विचाराने रूप धारण केले आणि पृथ्वीवर जन्म घेतला. त्या वरानुसार, परमेश्वराचा सदेह अनुभव घेणे शक्य होण्यासाठी त्या विचाराने जन्म घेतला. कृष्णाने राधेच्या विचारांची परिपूर्ती केली नाही. त्यामुळे अवतार अवतरला. पूर्वीच्या अवतारातील दोष दूर करण्यासाठी नवनिर्मिती होणार आहे. विचार रूप कसे धारण करतात, याचे हे एक छोटेसे उदाहरण आहे. इथेच, याक्षणी, मुक्ती भाग ३ या पुस्तकात मी हे लिहिले आहे. त्यानंतर मी ' भाव - रूप ' याबद्दल लिहिले. आज सर्वजण केवळ पुट्टपर्तीतील सत्य साई बाबांच्या एकाच रूपात परमेश्वर पाहत आहेत. मी त्यांचे सर्वव्यापकत्व पहाते. मी सर्व जगाला त्यांचा महिमा ज्ञात करून देत आहे. सत्ययुग कसे येणार आहे, हे स्वामी माझ्या पुस्तकांद्वारे दाखवून देत आहेत. 
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम