गुरुवार, २२ जुलै, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" असीम प्रेम म्हणजे प्रज्ञान. "
२ 
परमेश्वर आणि कर्मकायदा 

भगवद् गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, 
           " सुष्टांच रक्षण, दुष्टांचा संहार करून धर्मस्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतरतो. " त्याचप्रमाणे दुष्टांचा संहार झाला तरच आपण धर्माला स्थिरता देऊ शकतो. सर्वांना मुक्ती देणे हे माझ लक्ष्य आहे. ह्यामध्ये ज्या व्यक्ती अडथळा आणत आहेत, त्यांचा विनाश झालाच पाहिजे. 
           तुम्ही कदाचित विचाराल, ' जर तुम्ही सर्वांना मुक्तीच देत आहात, तर मग थोड्या लोकांना शिक्षा का देता ?' या प्रश्नाच स्वामींनी दिलेल सविस्तर उत्तर म्हणजेच हे प्रकरण आहे.   

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १८ जुलै, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " आपल्या अतृप्त इच्छा, आकांशा व आसक्ती पुढील जन्मात आपल्या बरोबर असतात. "

२ 

परमेश्वर आणि कर्मकायदा 


हे देवगण, ऋषीवर आणि मुनीजन !अहो, माझ्या 

मार्गात अडथळा आणून कर्मकायद्यास प्रतिबंध 

करणाऱ्यांचा विध्वंस करा. हे भगवान यम धर्मराजा,

धर्मरक्षक, तुम्ही साक्षात् धर्माचे राजे आहात. तुमच्या 

कर्मकायद्यात हस्तक्षेप करून मी तुमचे हात बांधून ठेवले. 

आजपर्यंत ज्यांनी स्वामींच्या अवतारकार्यात अटकाव केला 

त्यांचीच मी कड घेतली. ह्यापुढे त्या सर्वांना शिक्षा करायला 

तुम्ही मुखत्यार आहात. 

ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण काय बोध घ्यावा ? महान कार्य करणाऱ्यांच्या मार्गात अनेक अडथळे उभे राहतात. परंतु त्यांनी चुका करणाऱ्यांना दयामाया दाखवता कामा नये. दुष्टांना शिक्षा झाली तरच अवतारकार्य पूर्णत्वास जाईल.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १५ जुलै, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" केवळ परमेश्वराची इच्छा धरा तोच एकमात्र सत्य आहे. "

 

परमेश्वर आणि कर्मकायदा 

           स्वामींनी मला बोलावल तरच माझं विश्वामुक्तीच स्वप्न साकार होईल. स्वामींच्या आमंत्रणास बाधा आणणाऱ्या दुष्ट शक्तींना मीच खतपाणी घातल आहे; हे आता माझ्या लक्षात आलं. ' दीर्घायु होवोत ' हे माझे शब्द तटबंदीप्रमाणे त्यांचे रक्षण करून कर्मकायद्याला प्रवेश मिळू देत नाहीयेत. म्हणूनच स्वामींनी मी लिहिलेली ती काव्ये मला यज्ञकुंडात टाकून नष्ट करायला सांगितली. स्वामींनी वारंवार समजून सांगितले तेव्हा कुठे मला कर्मकायद्याची अतिसूक्ष्मता समजली. 
            जे माझ्या मार्गात अडथळे आणत आहेत त्या सात लोकांची नावे स्वामींनी स्वतः मला सांगितली. त्या सात लोकांना मी कधीही क्षमा करणार नाही. ते माझ्या ध्येयमार्गावरील धोंडे होता कामा नयेत. त्यांचा विनाश झाला पाहिजे. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ११ जुलै, २०२१

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" वैराग्य सर्व इच्छांचा नाश करते आणि मनुष्याला रिक्त करते. "

२ 

परमेश्वर आणि कर्मकायदा 

           काही लोक मला स्वामींच्या दर्शनापासून रोखण्याचा सतत विचार करत असतात. जर एखाद्याने साक्षात्कारी महान आत्म्याला त्रास दिला तर कर्माचा कायदा त्याला कडक शिक्षा देतो. 

           इथे माझे आशिर्वाद आणि ' दीर्घायु होवोत ' या काव्यांमुळे ते शिक्षेतून सुटले. एकीकडे हे भाव, त्यांचे कर्मकायद्याच्या परिणामांपासून रक्षण करताहेत तर दुसरीकडे त्यांचे विचार माझ्या स्तूपात प्रवेश करणाऱ्या भावकंपनांना अडथळा आणताहेत. मीच माझ्या मार्गातील अडथळा बनले आहे. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, ८ जुलै, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" माया सत्याला दडवून ठेवते. एकोहम् बहुस्यामी हे सत्य जाणा."

परमेश्वर आणि कर्मकायदा
 
           स्वामींनी हे सर्व मला नीट समजावून सांगून त्यांचा संहार करण्यास सांगितले. मी जर हा वर स्वामींकडे मागितला नसता, तर कर्माचा कायदा आपोआप अंमलात आला असता. हे पुरेसे नव्हत, म्हणून की काय, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा मी कविता लिहून स्वामींकडे प्रार्थना केली. आता त्यांचे दोन मार्गांनी रक्षण झाले; एक म्हणजे कर्माच्या कायद्याचे परिणाम त्यांना भोगावे लागू नयेत हा माझा वर आणि दुसरे ' दीर्घायु होवोत ' ही माझी काव्ये. 
          गेली ७० वर्षे माझ्या मनात फक्त दोनच विचार आहेत. परमेश्वराला प्राप्त करणे आणि विश्वमुक्ती मिळवणे. मी फक्त या दोनच गोष्टींसाठी जगते आहे. हे भाव, कंपनं होऊन स्तूपाद्वारे अवकाश व्याप्त करत आहेत. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ४ जुलै, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " मन बाह्य जगतातून काढून घेऊन, जाणीव अंतर्यामी केंद्रित करणे तोच आत्मा होय. "


परमेश्वर आणि कर्मकायदा
 
           भस्मासूराने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी घोर तपश्चर्या केली. शंकर भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारले," तुला काय वर हवा ?" तो राक्षस म्हणाला ," मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याच भस्म व्हावं." भगवान शंकराने तथास्तु म्हटले. ताबडतोब, भस्मासुराने वराची परीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकरांच्याच डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. ईश्वराने पळ काढून स्वतःची सुटका करून घेतली. 
           मी स्वामींकडून वर मिळवला की मला उपद्रव देणाऱ्यांना कर्मफल भोगावे लागू नये. मला त्रास देणारे व माझ्याशी वाईट वागणारे पुनः पुनः माझ्या डोक्यावर हात ठेवताहेत. मला स्वामींच्या जवळ जाऊ न देण्यासाठी निरनिराळ्या मसलती करत आहेत.    
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १ जुलै, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" भौतिक जग मिथ्या आहे ."
परमेश्वर आणि कर्मकायदा 
 
तारीख १२ डिसेंबर २००८ ध्यान 
वसंता - स्वामी, प्लीज काल जे सांगितलेत त्याबद्दल अजून सविस्तर सांगा नं !
स्वामी - शिवाने जसा भस्मासूराला वर दिला त्याप्रमाणे तू त्यांना वर दिलासा. ते लोक सतत तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला दुःखी करत आहेत. आता तू त्यांचा संहार कर किंवा त्यांना शाप दे. 
वसंता - स्वामी, मला कठोर शब्द उच्चारणे माहीतच नाही... मला नाही माहीत. मी काय करू ? रुद्र तांडव करून तुम्ही त्यांचा संहार करा किंवा शिवाचे गण पाठवून त्यांना नष्ट करा. मी मागितलेला वर परत घेते. कृपाकरुन तुम्हीच काय ते करा. 
स्वामी - दुसरी गोष्ट. एकीकडे तू माझ्या प्राप्तीसाठी रडतेस, आणि दुसरीकडे विश्वमुक्तीची मागणी करतेस. हे सर्व भाव स्तुपाद्वारे संपूर्ण अवकाशात पसरत आहेत. तुझे विरोधक तुला माझ दर्शन घेता येऊ नये म्हणून काय करता येईल याचा सतत विचार करत असतात. त्यांच्या भावना तुझ्याभोवती फिरत असतात. तुझ्या भावकंपनांना हा मोठाच अडथळा आहे. त्यांचे विचार शक्तिशाली कसे होतात ? ही शक्ती येते कुठून ? तुझ्या आशीर्वादांमुळे ! ' आयुष्मान भव, दीर्घायु होवोत ' ह्या तुझ्या शुभेच्छांमुळे त्यांना शक्ती मिळते, ही झाली दुसरी बाजू. 
वसंता - स्वामी, आला मला कळले की अजाणता मीच माझ्या पायावर धोंड पाडते आहे. बस झालं. आता पुरे, पुरे ... त्याचा नाश करा. आता मी त्यांना जराही क्षमा करू शकत नाही. मला माझी चूक कळली. कृपाकरुन त्यांचा नाश करा.
ध्यानाची समाप्ती 
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम