ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मन बाह्य जगतातून काढून घेऊन , जाणीव अंतर्यामी केंद्रित करणे तोच आत्मा होय . "
अम्मा
भगवान श्री सत्यसाई
बाबाच्या ८९ व्या जन्मदिनानिमित्य
( २३/११/२००५
रोजी , ८० व्या जन्मदिनानिमित्य दिलेल्या भगवंताच्या दिव्य
प्रवचनामधून.)
ॐ श्री साई राम
हा नाश पावणारा देह म्हणजे तुम्ही नाही . तुम्ही अंतरात्मा आहात, ज्याला ना जन्म आहे ना मृत्यू. तो बंध मुक्त आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होईल तेव्हा तुम्हाला अमरत्व प्राप्त होईल . तुम्ही सर्व चिंता, काळज्या आणि इच्छा वासनांमधून मुक्त व्हाल . तुम्ही कदाचित म्हणाल , " चिंता आणि इच्छांपासून मुक्त कोणीतरी या जगामध्ये आहे का ?" या बाबतीत मी स्वतः एक जितेजागते उदाहरण आहे . मला कोणत्याही इच्छा नाहीत . सर्व काही माझ्याच हातामध्ये आहे . तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देऊ शकतो . तथापि माझ्याकडे भौतिक गोष्टींची मागणी करू नका . त्या धावत्या मेघांसारख्या क्षणिक असतात जे शाश्वत आहे ते मागा. सत्य आणि प्रेम या जुळ्या तत्वांनी अखिल जगताचे पोषण होते . ते प्रत्येकामध्ये विद्यमान आहे . मी सत्य आणि प्रेम आहे .जे सर्वांमध्ये विद्यमान आहे . सत्य आणि प्रेम सर्वव्यापी आहे . तथापि तुम्ही सत्य आणि प्रेम यांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करत नाही. जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे विस्मरण झाले तरी चालेल परंतु सत्य आणि प्रेमाचे विस्मरण होऊ देऊ नका . सत्य बहिर्वाहिनी आहे तर प्रेम अंतर्वाहिनी. या दोन्हीचे रक्षण आणि पोषण करणे हा मनुष्याचा धर्म आहे.
बाबा
पुष्प २९ पुढे सुरु
मी माझ्या बालपणापासून खेळत असलेल्या खेळामुळे माझ्या देहाने पुन्हा तारुण्य प्राप्त केले . इतर योगप्रशिक्षणाचा काहीही उपयोग नाही . प्रत्येकाने परमेश्वराशी खेळले पाहिजे . मी कधीही कोणतेही बाह्य खेळ न खेळल्याने त्याचा माझ्यावर प्रभाव नाही . आता माझा वयस्क देह तरुण होईल . म्हणून म्हणते परमेश्वरासाठी , परमेश्वराविषयी , परमेश्वराशी खेळा.
शांत होण्यासाठी वेळ द्या . शांत होणे म्हणजे परमेश्वराचा शोध घेण्याची संधी .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा