ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" अधिकाधिक साधना करून ज्ञानाची वृद्धी होते आणि समग्र ज्ञान प्राप्त होते . "
पुष्प २८ पुढे सुरु
स्वामींनी बुकमार्कसारखे एक आयताकृती कार्डही दिले. ते गडद निळ्या रंगाचे होते . त्याच्या एका बाजूवर ५ सोनेरी चांदण्या व दुसऱ्याबाजूस १८ सोनेरी चांदण्या होत्या . मी माझ्या जीवनात भगवत् गीतेतील १८ योगांचे आचरण केले. याचा निर्देश १८ चांदण्या करतात . आता हे योग स्तुपामध्ये समाविष्ट आहेत . पाच चांदण्या स्तुपाद्वारे उदयास येऊन घातलेली पंचमहाभूते सूचित करतात . ही नूतन तत्वे ( महाभूते ) नवनिर्मितीसाठी आहेत . १८ + ५ = २३ ; स्वामींची व माझी आमच्या दोघांची जन्मतारीख नवनिर्मितीच्या अपत्यासाठी आवश्यक असणाऱ्या ४६ गुणसुत्रांचे प्रतिनिधित्व तसेच कार्यवाही ही करते . ही भावगुणसूत्रे विश्वब्रम्ह गर्भ कोटम् मधून बाहेर पडतात . सुवर्णयुग प्रदान करणाऱ्या सुवर्णतारका स्पंदनांद्वारे हे सर्व घडत आहे .
स्तूपाच्या उद्घाटन दिनी स्वामींनी मला चांदण्या असलेली आकाशी रंगाची साडी परिधान करण्यास सांगितले . हे चांदण्यांचे कार्ड माझ्या डायरीतील त्या दिवशीच्या पानामध्ये होते . म्हणून आम्ही चांदण्यांची निळी साडी विकत घेतली . ती साडी विकत घेण्यासाठी स्वामींनी पैसे पाठवले होते .
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा