ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" सत्य मनाला निर्मल बनवते . सत्य बोलणे ही अंतर्गत निर्मलता आहे . मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द सत्य असायला हवा ."
पुष्प २८ पुढे सुरु
वसंता : स्वामी , हे कोनाच्या आकारातील काय आहे ?
स्वामी : सत्ययुगामध्ये धर्म चार पायांवर उभा असेल . त्यावेळी धर्म , अर्थ , काम आणि मोक्ष पूर्णम् अवस्थेत असतील .
ध्यान समाप्त .
आता आपण याविषयी पाहू . भगव्या रंगाचा कोन सत्यसाईमयम् सृष्टीचे प्रतिनिधित्व करतो . यामध्ये धर्म चार पायांवर उभा आहे . मानवी जीवनातील धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ पूर्णम् अवस्थेत आहेत . कोनाची खालच्या बाजूस असणारी रुपेरी पट्टी , प्रेम सर्वाचा पाया आहे ; हे सुचविते . वरील दोन रुपेरी पट्ट्या परमेश्वर व त्याच्या शक्तीचे द्योतक आहेत . कोन उदंड फळ आणि आज्ञा चक्र यांचे प्रतिक आहे , हे आम्हाला इंटरनेटवर पाहिल्यानंतर समजले .
आता मी स्वामींसमवेत आज्ञाचक्रामध्ये परमानंद अवस्थेत आहे . आमचे भाव स्तूपाद्वारे बाह्यगामी होत नवनिर्मिती करतात . या निर्मितीमध्ये आम्ही दोघं असू . माझ्या ७३ वर्षांच्या कठोर तपाचे उदंड फळ म्हणजे कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन अन् वैश्विक मुक्ती होय .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा