ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" पुन्हा पुन्हा जन्म न घेण्यासाठी आपण जन्म घेतो . आणि पुन्हा मृत्यु न यावा असा मृत्यू आपल्याला यायला हवा."
पुष्प २८ पुढे सुरु
आदिपुरुष भगवान प्रथम निर्मितीचा संकल्प करतो . आदिशक्ती त्याच्यापासून जन्म घेते . आदिशक्तीमधून पंचमहाभूते निर्माण होतात , व त्यानंतर अखिल सृष्टीची निर्मिती होते . सृष्टीतील सर्व , आदिशक्ती म्हणजे माझ्यामधून बाहेर पडत स्तुपाद्वारे विश्वव्याप्त होते . प्रदूषित कलिच्या भीतीने पंचमहाभूतांनी माझा आश्रय घेतला . यालाच लय म्हणतात .
प्रलयकाळी सर्वाचा लय होतो . सर्वत्र मिट्ट अंधार असतो . निर्मितीचे अस्तित्व नसते . ही स्थिती हजारो वर्षे राहते . नंतर कृत युगाचा आरंभ होतो . मत्स्य अवताराच्या शेपटीला बांधलेल्या कलियुगातील उत्तम बीजांपासून निर्मिती अस्तित्वात येते . या बीजांपासून नवीन कृत युग जन्म घेते . महाप्रलयानंतर नेहमी हाच घटनाक्रम असतो . परंतु आताची नवनिर्मिती अशी नसून ती थेट परमेश्वरापासून जन्मली आहे . ही नवनिर्मिती स्वामींच्या व माझ्या भावसंगमातून जन्मली आहे . म्हणून सर्वांनी सिद्ध व्हा . स्वामी आल्यानंतर सर्व कार्यरत होईल . ५ जुलै २०१३ - स्वामींनी भगव्या रंगाचा एक कोन दिला . त्याला तीन रुपेरी पट्ट्या लावल्या होत्या . २ पट्ट्या वरच्या बाजूस व एक तळाशी लावली होती . कोनाला गोल छोटे पाय होते .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा