रविवार, २९ मार्च, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" केवळ त्यागमार्गाद्वारे परमशांती प्राप्त होते . "

पुष्प ३५ पुढे सुरु 

२० मे २०१३ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी , तुम्ही आलच पाहिजे. केव्हापासून मी तुमचा विरह सोसतेय ?
स्वामी - मी सदैव तुझ्याबरोबर आहे.  प्रत्येक मनुष्याचा एक स्वभाव असतो. परंतु तू वेगळी आहेस. मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. जोपर्यंत मनुष्य स्थूल देहात इथे असतो तेव्हा त्याला वाटते की तो त्याची पत्नी, मुलेबाळे आणि कुटुंबिय यांच्यासोबत जीवनयात्रा करतो आहे. तथापि जेव्हा तो स्थूल देहाचा त्याग करून सूक्ष्म देह धारण करतो तेव्हा त्याला बोध होतो की ही त्याची व्यक्तिगत यात्रा आहे. साधनेद्वारे तो, सूक्ष्मदेह ते कारणदेह असे एकेका देहाचे टप्पे पार करतो. तुला जन्मतःच ' मी ' नसल्यामुळे तुझी यात्रा व्यक्तिगत नाही. या यात्रेमध्ये आपण दोघं एकत्र आहोत. सर्वजण खालून वर जातात पण आपण वरून खाली आलो. आपण दोघ स्थुलदेहात एकत्र येऊ ती नवनिर्मिती असेल. 
ध्यानसमाप्ती 
             आता आपण याविषयी पाहू. प्रत्येक देह अंतर्यामीद्वारे कार्यप्रवण होतो. गतजन्मामध्ये केलेल्या चांगल्या वाईट कर्मांनुसार देह प्राप्त होतो. गतजन्मातील संस्कारानुसार देह कार्यरत होतो. स्थूल देहाद्वारे कार्यरत असणाऱ्या मनुष्याला वाटते की  त्याच्या पत्नीमुलांसह, कुटुंबियांसह तो ही जीवनयात्रा करत आहे. परंतु मनुष्यजन्म ही एक व्यक्तिगत यात्रा आहे हे त्याला ज्ञात नाही. जन्मानुजन्म साठवलेल्या संस्कारामुळे त्याने जन्म का घेतला याचे कारण त्याला कळू शकत नाही. 
 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम

गुरुवार, २६ मार्च, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

           " छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करा आणि पाहा त्यातून तुम्हाला केवढा आनंद मिळतो ."

पुष्प ३५ पुढे सुरु 

               आता आपण या विषयी पाहू. गेली ७४ वर्षे मी स्वामींसाठी अश्रू ढाळते आहे. स्वामींनी देहत्याग केल्यामुळे माझे दुःख अधिक गहिरे झाले. २५ महिने झाले तरी ते अजून परतले नाहीत. गजेंद्राने परमात्म्याचा धावा केल्यावर महाविष्णू तात्काळ त्याच्याकडे धावून गेले. परंतु स्वामी माझ्यासाठी आले नाहीत. याला उत्तर देताना स्वामींनी सांगितले की मनुष्य त्याने केलेल्या चुकांमुळे पुन्हा पुन्हा जन्म घेतो. याची तुलना स्वतःशी करत ते म्हणाले की  त्यांनीही पुन्हा जन्म घेतला आहे. वामन अवतारासारखे स्वामी येथे आले आणि ८४ वर्षे येथे वावरले. जरी संपूर्ण जगामध्ये स्वामी परिचित असले तरी त्यांच्याविषयी माहिती असणाऱ्यांची संख्या फार मोठी नव्हती. माझ्या नाडीमध्ये असे सांगितले आहे की जगातील केवळ ४० टक्के लोकांना स्वामींविषयी माहिती आहे. आता ते पुन्हा येतील तेव्हा जगातील सर्वांना त्यांच्याविषयी माहिती होईल. माझे अश्रू व माझ्या विलापामुळे स्वामी पुन्हा येतील, त्यानंतर सर्वांना ते कोण आहेत हे कळेल.  
               यापूर्वी ते वामन अवतार धारण करून आले, आता ते पुन्हा त्रिविक्रमासारखा अवतार घेऊन येत आहेत. ते समस्त जगताला एका छत्राखाली आणतील. माझ्या बाबतीत त्यांनी केलेल्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी ते प्रेम साई बनून येतील. मी जशा वेदना भोगते आहे तशा वेदना ते भविष्यात सोसतील. ते त्यांच्या संपूर्ण प्रेमाचा माझ्यावर वर्षाव करतील. आता जशी मी विलाप करते आहे तसे ते भविष्यात अश्रू ढाळतील, माझ्यासाठी व्याकुळ होतील. जशी मी आता त्यांच्या दर्शनासाठी, त्यांच्या संभाषणासाठी तळमळते आहे ; तसेच भविष्यात ते मला पाहण्यासाठी, माझ्याशी बोलण्यासाठी तळमळतील. एक जरी चूक झाली तरी परमेश्वराला पुनर्जन्म घ्यावाच लागतो तर मग मनुष्याचे काय ? तो पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि मृत्यू पावतो. सर्वांनी हे जाणून घेऊन त्यामध्ये सुधारणा घडवलीच पाहिजे.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम  

रविवार, २२ मार्च, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

         " प्रेमाद्वारे त्यागाची जोपासना होते. त्यागाद्वारे प्रेम फोफावते. "
 
वसंतामृतमाला 
पुष्प ३५ 
परमेश्वराची चूक, पुनर्जन्म!


१९ मे २०१३ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी जेव्हा हत्तीने , परमात्म्याचा धावा केला तेव्हा तुम्ही तात्काळ धावलात. मी केव्हापासून तुमचा धावा करते आहे, तुम्ही कधी येणार ? माझ्या अश्रूंचा ओघ केव्हा थांबेल ?
स्वामी - मनुष्याने केलेल्या चुकांमुळे तो पुन्हा पुन्हा जन्म घेतो. परमेश्वराने तुझ्यासाठी काही न केल्यामुळे त्याने पुन्हा जन्म घेतला आहे. त्याने वामन अवतार घेतला होता. आता येणारा अवतार त्रिविक्रम अवतारासारखा आहे. तो समस्त जगताला एका छत्राखाली आणेल. तो आता त्रिविक्रम अवतारासारखा येईल. पुढील अवतारात तो तुझ्या बाबतीत केलेल्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी प्रेमसाई बनून येईल. 
वसंता - आता मला समजले स्वामी. 
ध्यान समाप्ती . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम

गुरुवार, १९ मार्च, २०१५

ॐ श्री साई  वसंतसाई साय नमः 

सुविचार 

        " आपल्या भक्तीची गुणवत्ता म्हणजे आपल्या मनोदशेचे थेट प्रतिबिंबच होय . "

पुष्प ३४ पुढे सुरु

               प्रत्येक दिवशी स्वामी केवढी शिकवण देत होते. विस्मरणात गेलेली भारतीय संस्कृती त्यांनी पुनर्प्रस्थापित  केली. लहान मुलांना भारतीय संस्कृतीचे धडे देण्यासाठी त्यांनी बाल विकास वर्ग सुरु केले. सेवेचे महत्व सांगून समस्त जगाला सेवा करण्यास प्रवृत्त केले. स्वामींच्या संघटने मार्फत संपूर्ण जगामध्ये सेवाकार्य केले जाते. त्यानंतर त्यांनी वेद विद्वान महासभा आयोजित केल्या. त्यामध्ये विद्वान पंडितांना आमंत्रित करून त्यांना बोलण्याची संधी दिली. स्त्रीधर्म सांगण्यासाठी महिला विभाग सुरु केला. अशा तऱ्हेने त्यांनी भारतीय संस्कृतीला संजीवन दिले. त्यांचे विद्यार्थी वेदपठण करतात इतर कोणत्याही अवताराने असे केले आहे का ? स्वामींची संघटना समस्त विश्वामध्ये प्रेम आणि नैतिकतेचा प्रसार करते आहे. 
                केवढी महान साधना ! मनुष्य हे करू शकतो का ? परमेश्वर आता आला आहे आणि तो संपूर्ण विश्वाचे भारतातील प्राचीन वेदिक कालामध्ये परिवर्तन करणार आहे. यासाठी त्याने त्याचे पायाभूत कार्य पूर्ण केले व लोकांना परमेश्वराचा स्वाद घेण्याची संधी दिली. आध्यात्मिक जागृती करून त्याने लोकांचे पोषण केले. अशा तऱ्हेने अनेक जण जागृत झाले. आता सर्वांनी अखंड साधना करून स्वतःला प्रशिक्षित केले पाहिजे आणि ज्ञान संपादन केले पाहिजे. 
                त्या कासवाच्या कवच्यावर सर्वत्र V होते आणि मधोमध एक मोठे हृद्य होते. सर्वांना ज्ञानाप्रत घेऊन जाणाऱ्या साधनेचे प्रात्यक्षिक दर्शविण्यासाठी मी येथे आले आहे. यासाठी स्वामींनी हा पुरावा दिला.  तुम्हाला कदाचित असे वाटेल की स्वामींची संघटना जगभर हेच कार्य करत आहे मग तुमच कार्य काय ? जेव्हा मी स्वामींच्या आणि  माझ्या भावविश्वाबद्दल लिहिते तेव्हा आमचे भाव गर्भगृहातून बाहेर पडून स्तूपाद्वारे विश्वामध्ये परिवर्तन घडवत आहेत. या कारणासाठी मी लेखन करते . 

जय साईराम 

व्ही.एस.

रविवार, १५ मार्च, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

          " दिखाऊ कर्मकांडापेक्षा  अंतर्भक्ती अधिक परिणामकारक आहे. "

पुष्प ३४ पुढे सुरु 

                स्थितप्रज्ञाचे त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण असते. कोणत्याही परिस्थितीत तो विचलित न होता शांत राहतो. 
                मी माझे सर्वस्व स्वामींना अर्पण केले. माझे स्वतःचे असे काही नाही. माझ्यावर कोणत्याही गोष्टीचा प्रभाव पडत नाही. सर्व काही स्वामींच आहेत. माझे मन, बुद्धी, इंद्रिय, अहंकार, विवेक सारे काही स्वामींशी एकत्व पावले आहे. इकडे तिकडे विहार करणारा माझा देह एखाद्या कवचासारखा आहे. मी आणि माझा हा जन्म विलक्षणच आहे म्हणायचा ! किती व्याधी, किती क्लेश तथापि कोणत्याही गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही. देह क्लेश सोसतो परंतु मन आनंदाने स्वामींचा महिमा लिहिते. 
                स्वामी समस्त विश्व……… नाही, नाही एक विश्व नाही तर चौदा भुवनं त्यांच्या तळहातावर धारण करतात. समस्त विश्वाचे पापरूपी हालाहल स्वामींनी आणि मी पचवले आणि क्लेश भोगले आणि समस्त विश्वाला अमरत्व बहाल करण्यासाठी सर्वांवर अमृतवर्षाव केला. क्षीरसमुद्र मंथनाचे वेळी, परमेश्वराने कूर्मावतार धारण करून मंदार पर्वताला आपल्या पाठीवर घेतले आणि आधार दिला. समुद्रमंथनातून अमृत आणि महालक्ष्मी दोन्ही वर आले. लक्ष्मीने महाविष्णूंना पुष्पमाला घालून पदसेवेस प्रारंभ केला. 
                पृथ्वीचे वैकुंठात रुपांतर करण्यासाठी स्वामी आणि मी येथे आलो. सर्वांनी ही परमेश्वरी लीला जाणली पाहिजे. ही संधी पुन्हा प्राप्त होणार नाही. म्हणून साधना करून परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करा. पुरे आता ! जागे व्हा ! 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम  

गुरुवार, १२ मार्च, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई  साय नमः 

सुविचार 

          " जर आपण रात्रंदिवस आपले भाव परमेश्वराला अर्पण केले तर २४ तास परमेश्वराच्या पूजेसमान ठरेल. "

पुष्प ३४ पुढे सुरु 

१७ मे २०१३ 
वसंता - स्वामी, ह्या कासवाचा काय अर्थ आहे ? 
स्वामी - कुर्मावतारात क्षीरसागराचे मंथन होऊन अमृत बाहेर आले महालक्ष्मी प्रकटली. तू ते कासव ठेव. मी तुला नंतर सांगेन. 
ध्यान समाप्ती 
              मला काही अर्थ उलगडत नव्हता. आम्हाला ते पेंग्विन पक्षासारखेही वाटले. 
१७ मे २०१३ 
वसंता - स्वामी, हे कासव आहे का पेंग्विन ?
स्वामी - हे कासव आहे. ते तू कासव आहे. तू सर्वकाही तुझ्यामध्ये नियंत्रित केले आहेस. तुझा देह कासवाच्या कवचासारखा आहे. तुझ्यावर कोणतीही गोष्ट परिणाम करू शकत नाही. तू सर्व तुझ्या ठायी नियंत्रित करतेस. 
वसंता - स्वामी , तुम्ही समस्त विश्वाचा भार पेलणारे कूर्मावतार आहात. 
स्वामी - आपण दोघ सारखेच आहोत. आपण हलाहल पचवून जगाला अमृत प्रदान करतो. 
ध्यान समाप्ती 
                जेव्हा साधक पूर्णत्वाने ज्ञानामध्ये स्थित होतो, ती स्थितप्रज्ञ अवस्था होय. भगवान कृष्ण स्थितप्रज्ञ अवस्थेची तुलना कासवाशी करतात. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात कृष्णानी स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम

रविवार, ८ मार्च, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई  साय नमः

सुविचार

        " अनंत आकाशाला कोण मर्यादा घालणार ? अमर्याद महासागराला कोण बंधन घालणार ? त्याचप्रमाणे सर्वव्यापी प्रेमाला कोणत्याही मर्यादा व बंधने नाहीत . "

पुष्प ३४ पुढे सुरु

                शास्त्रज्ञ याला जडपदार्थ आणि उर्जा म्हणतात. जेव्हा पदार्थाची कार्यप्रणवता गतिमान असते तेव्हा अधिक उर्जा दिसून येते. अशावेळी दोन्ही एक होतात. आपण एक उदा. पाहु. मनुष्य पदार्थ आहे. आत्म्याने त्यामध्ये प्रवेश केल्यावर तो कार्यशील बनतो. साधारणतः तो जीवप्रवाह म्हणून कार्यरत असतो. जो जन्माचे प्रयोजन जाणतो तो साधना करतो . साधनेने त्याच्या अंतर्यामी असणारा परमेश्वर जागृत होऊन कार्यप्रवण होतो. जशी त्याची साधना वाढत जाते त्यानुसार त्याची अंतःशक्तीही वाढते. आणि दोन्हीचा संयोग होतो. वस्तुमात्र मनुष्य त्वरेने साधना करतो आणि एका मागोमाग एक चक्रे उघडतात . आज्ञाचक्रापर्यंत पोहोचल्यानंतर तेथे पदार्थ आणि उर्जा ( जड आणि चैतन्य ) यांचा संयोग होतो. हे वैज्ञानिक तत्व आहे. वैज्ञानिक त्याला पदार्थ व उर्जा असे परिभाषित करून स्पष्टीकरण करतात तर संत त्याला कुंडलिनी शक्ती व मनुष्यातील चक्रे उघडणे असे संबोधून स्पष्टीकरण देतात . 
                १७ मे ला स्वामींनी एक छोटेसे लाकडी कासव दिले. एखाद्या पदकाप्रमाणे त्यावर एक छिद्र  होते. ते कासव अत्यंत सुंदर आणि सुबक होते. ते पाहून सर्वांना वाटले की ते मानवनिर्मित नसावे .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात.....

जय साईराम

गुरुवार, ५ मार्च, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार

         " मनाची जडणघडण अशी करायला हवी की त्याला कोणीही अथवा कोणतीही गोष्ट स्पर्श करणार नाही ."


वसंतामृतमाला 
पुष्प ३४ 
कूर्मदेह 


१७ मे २०१३ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी, तुम्ही अग्निपुत्री लिहिलेत. तो अग्नी तुम्हाला भाजून काढेल म्हणून तुम्ही येत नाही का ?
स्वामी - साधारण अवतार वेगळे आहेत. हा नवनिर्मितीसाठी आहे. म्हणून वियोग आणि क्लेश आवश्यक आहेत. परमेश्वर शुद्ध सत्व आहे. तो निर्मितीचा संकल्प करतो. त्यावेळी त्याची शक्ती त्याच्यापासून वेगळी होऊन निर्मितीच्या रूपाने प्रकट होते. हे जड आणि उर्जा आहे. परमेश्वर आणि त्याची शक्ती या सर्वांमध्ये प्रवेश करतात. तू जडस्वरूप आणि मी शक्तीस्वरूप. आपण दोघं नवनिर्मिती दर्शवतो.
वसंता - स्वामी, अजून किती काळ हा त्रास ? तुम्हीही आला नाहीत. 
स्वामी - मी नक्की येईन. मी तुझ्यापासून वेगळा कसा राहू शकेन? 
ध्यान समाप्ती 
                  आता आपण पाहू या. सर्व अवतार धर्म संस्थापनेसाठी अवतरतात. ते साक्षीभावाने येतात, धर्म संस्थापना करतात आणि परत जातात. त्यांना त्यांच्या भावभावना दर्शवण्याची गरज नसते. स्वामी येथे नवनिर्मितीच्या कार्यासाठी आले. यासाठी वियोग आणि क्लेश आवश्यक आहेत. माझ्या विरहवेदना आणि माझ्या भावभावनांना स्वामींनी दिलेला प्रतिसाद स्तूपाद्वारे बाहेर पडून नवनिर्मिती करतात. प्रथम परमेश्वर  त्याच्या पूर्ण तेजासह परम अवस्थेत असतो. जेव्हा तो निर्मितीचा संकल्प करतो तेव्हा शक्ती त्याच्यापासून वेगळी होऊन निर्मितीच्या रूपाने विस्तार पावते. त्या उर्जेमधून महास्फोटाचा ध्वनी निर्माण होतो ; तत्काळ पर्वत, वृक्ष इ. सर्व निर्मितीचा दृग्गोचर होते. स्वामींची शक्ती ह्या निर्मितीतील प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करते. त्यांची शक्ती म्हणजे जड पदार्थ आणि त्यांचा आत्मा म्हणजे प्रत्येक गोष्टीतील चैतन्य. हे स्वामी आणि मी दर्शवतो. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात …. 

जय साईराम  

रविवार, १ मार्च, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई  साय नमः

सुविचार

              " मनाची जडण घडण अशी करायला हवी की त्याला कोणीही अथवा कोणतीही गोष्ट स्पर्श करणार नाही . " 
पुष्प ३३ पुढे सुरु

               ऑगस्ट २०१२ च्या सुरुवातीपासून, स्वामी त्यांच्या आगमनाविषयी माझी खात्री पटवू लागले. कृष्ण जयंतीच्या अगोदर त्यांनी मला लग्नाचा आल्बम दिला.  त्यावरून ते कृष्ण जयंतीच्या दिवशी येतील हे सुचित होत होते. आम्ही हे सर्व ' राधा कृष्ण विवाह पुस्तक ' या ई  पुस्तकामध्ये लिहिले आहे. मला पूर्ण खात्री होती आणि माझी अढळ श्रद्धा होती की स्वामींचे त्यादिवशी आगमन होईल. परंतु ते आले नाहीत. त्यानंतर स्वामींनी माझी श्रद्धा अधिक बळकट करण्यासाठी अनेक गोष्टी दिल्या. मात्र , ते आले नाहीत. त्यामुळे माझे शारीरिक क्लेश अधिक वाढले . नंतर स्वामी म्हणाले की ते २१ डिसेंबरला नक्की येतील. त्यांचे आगमन सुचित करणाऱ्या अनेक गोष्टी त्यांनी दाखवल्या , तथापि ते आले नाहीत. ह्यावेळी माझ्या दोन्ही पायांवर अधिक परिणाम झाला . माझ्या पायांखाली प्रलय कसा रोखून धरला गेला हे स्वामींनी दाखवले आणि त्यामुळेच माझ्या पायांवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. अजूनही माझे पाय पूर्ण बरे  झाले नाहीत. ह्या मे  मध्ये ते पूर्ण बरे होतील असे स्वामींनी सांगितले व त्यासाठी त्यांनी औषध दिले.
               अग्निपुत्रीस,
                                साईप्रेमीकडून
               स्वामींनी तेलगूमध्ये लिहिलेल्या या मजकूराविषयी मी त्यांना विचारले.
१७ मे २०१३ सकाळचे ध्यान 
वसंता - अग्निपुत्री, साईप्रेमी  हे कोण आहेत ? मला सांगा न स्वामी. 
स्वामी - आपण दोघं आहोत . तू अग्नीपुत्री आहेस . मी तुझ्या प्रेमामधून आलो आहे . 
वसंता - म्हणजे हे प्रेम साई आहेत का ?
स्वामी - नाही. तुझ्या प्रेमामधून साई येत आहे. 
ध्यान समाप्ती
               आता आपण पाहू या. मी अग्निपुत्री असल्याचे स्वामींनी सांगितले. माझे प्रेम आणि माझ्या भावविश्वामधून स्वामी आले म्हणून ते साईप्रेमी असल्याचे त्यांनी सांगितले.

व्ही. एस.
  जय साईराम