रविवार, १ मार्च, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई  साय नमः

सुविचार

              " मनाची जडण घडण अशी करायला हवी की त्याला कोणीही अथवा कोणतीही गोष्ट स्पर्श करणार नाही . " 
पुष्प ३३ पुढे सुरु

               ऑगस्ट २०१२ च्या सुरुवातीपासून, स्वामी त्यांच्या आगमनाविषयी माझी खात्री पटवू लागले. कृष्ण जयंतीच्या अगोदर त्यांनी मला लग्नाचा आल्बम दिला.  त्यावरून ते कृष्ण जयंतीच्या दिवशी येतील हे सुचित होत होते. आम्ही हे सर्व ' राधा कृष्ण विवाह पुस्तक ' या ई  पुस्तकामध्ये लिहिले आहे. मला पूर्ण खात्री होती आणि माझी अढळ श्रद्धा होती की स्वामींचे त्यादिवशी आगमन होईल. परंतु ते आले नाहीत. त्यानंतर स्वामींनी माझी श्रद्धा अधिक बळकट करण्यासाठी अनेक गोष्टी दिल्या. मात्र , ते आले नाहीत. त्यामुळे माझे शारीरिक क्लेश अधिक वाढले . नंतर स्वामी म्हणाले की ते २१ डिसेंबरला नक्की येतील. त्यांचे आगमन सुचित करणाऱ्या अनेक गोष्टी त्यांनी दाखवल्या , तथापि ते आले नाहीत. ह्यावेळी माझ्या दोन्ही पायांवर अधिक परिणाम झाला . माझ्या पायांखाली प्रलय कसा रोखून धरला गेला हे स्वामींनी दाखवले आणि त्यामुळेच माझ्या पायांवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. अजूनही माझे पाय पूर्ण बरे  झाले नाहीत. ह्या मे  मध्ये ते पूर्ण बरे होतील असे स्वामींनी सांगितले व त्यासाठी त्यांनी औषध दिले.
               अग्निपुत्रीस,
                                साईप्रेमीकडून
               स्वामींनी तेलगूमध्ये लिहिलेल्या या मजकूराविषयी मी त्यांना विचारले.
१७ मे २०१३ सकाळचे ध्यान 
वसंता - अग्निपुत्री, साईप्रेमी  हे कोण आहेत ? मला सांगा न स्वामी. 
स्वामी - आपण दोघं आहोत . तू अग्नीपुत्री आहेस . मी तुझ्या प्रेमामधून आलो आहे . 
वसंता - म्हणजे हे प्रेम साई आहेत का ?
स्वामी - नाही. तुझ्या प्रेमामधून साई येत आहे. 
ध्यान समाप्ती
               आता आपण पाहू या. मी अग्निपुत्री असल्याचे स्वामींनी सांगितले. माझे प्रेम आणि माझ्या भावविश्वामधून स्वामी आले म्हणून ते साईप्रेमी असल्याचे त्यांनी सांगितले.

व्ही. एस.
  जय साईराम
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा