ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" अनंत आकाशाला कोण मर्यादा घालणार ? अमर्याद महासागराला कोण बंधन घालणार ? त्याचप्रमाणे सर्वव्यापी प्रेमाला कोणत्याही मर्यादा व बंधने नाहीत . "
पुष्प ३४ पुढे सुरु
शास्त्रज्ञ याला जडपदार्थ आणि उर्जा म्हणतात. जेव्हा पदार्थाची कार्यप्रणवता गतिमान असते तेव्हा अधिक उर्जा दिसून येते. अशावेळी दोन्ही एक होतात. आपण एक उदा. पाहु. मनुष्य पदार्थ आहे. आत्म्याने त्यामध्ये प्रवेश केल्यावर तो कार्यशील बनतो. साधारणतः तो जीवप्रवाह म्हणून कार्यरत असतो. जो जन्माचे प्रयोजन जाणतो तो साधना करतो . साधनेने त्याच्या अंतर्यामी असणारा परमेश्वर जागृत होऊन कार्यप्रवण होतो. जशी त्याची साधना वाढत जाते त्यानुसार त्याची अंतःशक्तीही वाढते. आणि दोन्हीचा संयोग होतो. वस्तुमात्र मनुष्य त्वरेने साधना करतो आणि एका मागोमाग एक चक्रे उघडतात . आज्ञाचक्रापर्यंत पोहोचल्यानंतर तेथे पदार्थ आणि उर्जा ( जड आणि चैतन्य ) यांचा संयोग होतो. हे वैज्ञानिक तत्व आहे. वैज्ञानिक त्याला पदार्थ व उर्जा असे परिभाषित करून स्पष्टीकरण करतात तर संत त्याला कुंडलिनी शक्ती व मनुष्यातील चक्रे उघडणे असे संबोधून स्पष्टीकरण देतात .
१७ मे ला स्वामींनी एक छोटेसे लाकडी कासव दिले. एखाद्या पदकाप्रमाणे त्यावर एक छिद्र होते. ते कासव अत्यंत सुंदर आणि सुबक होते. ते पाहून सर्वांना वाटले की ते मानवनिर्मित नसावे .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात.....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा