ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" मनाची जडणघडण अशी करायला हवी की त्याला कोणीही अथवा कोणतीही गोष्ट स्पर्श करणार नाही ."
वसंतामृतमाला
पुष्प ३४
कूर्मदेह
१७ मे २०१३ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी, तुम्ही अग्निपुत्री लिहिलेत. तो अग्नी तुम्हाला भाजून काढेल म्हणून तुम्ही येत नाही का ?
स्वामी - साधारण अवतार वेगळे आहेत. हा नवनिर्मितीसाठी आहे. म्हणून वियोग आणि क्लेश आवश्यक आहेत. परमेश्वर शुद्ध सत्व आहे. तो निर्मितीचा संकल्प करतो. त्यावेळी त्याची शक्ती त्याच्यापासून वेगळी होऊन निर्मितीच्या रूपाने प्रकट होते. हे जड आणि उर्जा आहे. परमेश्वर आणि त्याची शक्ती या सर्वांमध्ये प्रवेश करतात. तू जडस्वरूप आणि मी शक्तीस्वरूप. आपण दोघं नवनिर्मिती दर्शवतो.
वसंता - स्वामी, अजून किती काळ हा त्रास ? तुम्हीही आला नाहीत.
स्वामी - मी नक्की येईन. मी तुझ्यापासून वेगळा कसा राहू शकेन?
ध्यान समाप्ती
आता आपण पाहू या. सर्व अवतार धर्म संस्थापनेसाठी अवतरतात. ते साक्षीभावाने येतात, धर्म संस्थापना करतात आणि परत जातात. त्यांना त्यांच्या भावभावना दर्शवण्याची गरज नसते. स्वामी येथे नवनिर्मितीच्या कार्यासाठी आले. यासाठी वियोग आणि क्लेश आवश्यक आहेत. माझ्या विरहवेदना आणि माझ्या भावभावनांना स्वामींनी दिलेला प्रतिसाद स्तूपाद्वारे बाहेर पडून नवनिर्मिती करतात. प्रथम परमेश्वर त्याच्या पूर्ण तेजासह परम अवस्थेत असतो. जेव्हा तो निर्मितीचा संकल्प करतो तेव्हा शक्ती त्याच्यापासून वेगळी होऊन निर्मितीच्या रूपाने विस्तार पावते. त्या उर्जेमधून महास्फोटाचा ध्वनी निर्माण होतो ; तत्काळ पर्वत, वृक्ष इ. सर्व निर्मितीचा दृग्गोचर होते. स्वामींची शक्ती ह्या निर्मितीतील प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करते. त्यांची शक्ती म्हणजे जड पदार्थ आणि त्यांचा आत्मा म्हणजे प्रत्येक गोष्टीतील चैतन्य. हे स्वामी आणि मी दर्शवतो.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ….
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा