गुरुवार, २६ मार्च, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

           " छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करा आणि पाहा त्यातून तुम्हाला केवढा आनंद मिळतो ."

पुष्प ३५ पुढे सुरु 

               आता आपण या विषयी पाहू. गेली ७४ वर्षे मी स्वामींसाठी अश्रू ढाळते आहे. स्वामींनी देहत्याग केल्यामुळे माझे दुःख अधिक गहिरे झाले. २५ महिने झाले तरी ते अजून परतले नाहीत. गजेंद्राने परमात्म्याचा धावा केल्यावर महाविष्णू तात्काळ त्याच्याकडे धावून गेले. परंतु स्वामी माझ्यासाठी आले नाहीत. याला उत्तर देताना स्वामींनी सांगितले की मनुष्य त्याने केलेल्या चुकांमुळे पुन्हा पुन्हा जन्म घेतो. याची तुलना स्वतःशी करत ते म्हणाले की  त्यांनीही पुन्हा जन्म घेतला आहे. वामन अवतारासारखे स्वामी येथे आले आणि ८४ वर्षे येथे वावरले. जरी संपूर्ण जगामध्ये स्वामी परिचित असले तरी त्यांच्याविषयी माहिती असणाऱ्यांची संख्या फार मोठी नव्हती. माझ्या नाडीमध्ये असे सांगितले आहे की जगातील केवळ ४० टक्के लोकांना स्वामींविषयी माहिती आहे. आता ते पुन्हा येतील तेव्हा जगातील सर्वांना त्यांच्याविषयी माहिती होईल. माझे अश्रू व माझ्या विलापामुळे स्वामी पुन्हा येतील, त्यानंतर सर्वांना ते कोण आहेत हे कळेल.  
               यापूर्वी ते वामन अवतार धारण करून आले, आता ते पुन्हा त्रिविक्रमासारखा अवतार घेऊन येत आहेत. ते समस्त जगताला एका छत्राखाली आणतील. माझ्या बाबतीत त्यांनी केलेल्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी ते प्रेम साई बनून येतील. मी जशा वेदना भोगते आहे तशा वेदना ते भविष्यात सोसतील. ते त्यांच्या संपूर्ण प्रेमाचा माझ्यावर वर्षाव करतील. आता जशी मी विलाप करते आहे तसे ते भविष्यात अश्रू ढाळतील, माझ्यासाठी व्याकुळ होतील. जशी मी आता त्यांच्या दर्शनासाठी, त्यांच्या संभाषणासाठी तळमळते आहे ; तसेच भविष्यात ते मला पाहण्यासाठी, माझ्याशी बोलण्यासाठी तळमळतील. एक जरी चूक झाली तरी परमेश्वराला पुनर्जन्म घ्यावाच लागतो तर मग मनुष्याचे काय ? तो पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि मृत्यू पावतो. सर्वांनी हे जाणून घेऊन त्यामध्ये सुधारणा घडवलीच पाहिजे.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा