रविवार, १५ मार्च, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

          " दिखाऊ कर्मकांडापेक्षा  अंतर्भक्ती अधिक परिणामकारक आहे. "

पुष्प ३४ पुढे सुरु 

                स्थितप्रज्ञाचे त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण असते. कोणत्याही परिस्थितीत तो विचलित न होता शांत राहतो. 
                मी माझे सर्वस्व स्वामींना अर्पण केले. माझे स्वतःचे असे काही नाही. माझ्यावर कोणत्याही गोष्टीचा प्रभाव पडत नाही. सर्व काही स्वामींच आहेत. माझे मन, बुद्धी, इंद्रिय, अहंकार, विवेक सारे काही स्वामींशी एकत्व पावले आहे. इकडे तिकडे विहार करणारा माझा देह एखाद्या कवचासारखा आहे. मी आणि माझा हा जन्म विलक्षणच आहे म्हणायचा ! किती व्याधी, किती क्लेश तथापि कोणत्याही गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही. देह क्लेश सोसतो परंतु मन आनंदाने स्वामींचा महिमा लिहिते. 
                स्वामी समस्त विश्व……… नाही, नाही एक विश्व नाही तर चौदा भुवनं त्यांच्या तळहातावर धारण करतात. समस्त विश्वाचे पापरूपी हालाहल स्वामींनी आणि मी पचवले आणि क्लेश भोगले आणि समस्त विश्वाला अमरत्व बहाल करण्यासाठी सर्वांवर अमृतवर्षाव केला. क्षीरसमुद्र मंथनाचे वेळी, परमेश्वराने कूर्मावतार धारण करून मंदार पर्वताला आपल्या पाठीवर घेतले आणि आधार दिला. समुद्रमंथनातून अमृत आणि महालक्ष्मी दोन्ही वर आले. लक्ष्मीने महाविष्णूंना पुष्पमाला घालून पदसेवेस प्रारंभ केला. 
                पृथ्वीचे वैकुंठात रुपांतर करण्यासाठी स्वामी आणि मी येथे आलो. सर्वांनी ही परमेश्वरी लीला जाणली पाहिजे. ही संधी पुन्हा प्राप्त होणार नाही. म्हणून साधना करून परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करा. पुरे आता ! जागे व्हा ! 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा