रविवार, २९ मार्च, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" केवळ त्यागमार्गाद्वारे परमशांती प्राप्त होते . "

पुष्प ३५ पुढे सुरु 

२० मे २०१३ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी , तुम्ही आलच पाहिजे. केव्हापासून मी तुमचा विरह सोसतेय ?
स्वामी - मी सदैव तुझ्याबरोबर आहे.  प्रत्येक मनुष्याचा एक स्वभाव असतो. परंतु तू वेगळी आहेस. मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. जोपर्यंत मनुष्य स्थूल देहात इथे असतो तेव्हा त्याला वाटते की तो त्याची पत्नी, मुलेबाळे आणि कुटुंबिय यांच्यासोबत जीवनयात्रा करतो आहे. तथापि जेव्हा तो स्थूल देहाचा त्याग करून सूक्ष्म देह धारण करतो तेव्हा त्याला बोध होतो की ही त्याची व्यक्तिगत यात्रा आहे. साधनेद्वारे तो, सूक्ष्मदेह ते कारणदेह असे एकेका देहाचे टप्पे पार करतो. तुला जन्मतःच ' मी ' नसल्यामुळे तुझी यात्रा व्यक्तिगत नाही. या यात्रेमध्ये आपण दोघं एकत्र आहोत. सर्वजण खालून वर जातात पण आपण वरून खाली आलो. आपण दोघ स्थुलदेहात एकत्र येऊ ती नवनिर्मिती असेल. 
ध्यानसमाप्ती 
             आता आपण याविषयी पाहू. प्रत्येक देह अंतर्यामीद्वारे कार्यप्रवण होतो. गतजन्मामध्ये केलेल्या चांगल्या वाईट कर्मांनुसार देह प्राप्त होतो. गतजन्मातील संस्कारानुसार देह कार्यरत होतो. स्थूल देहाद्वारे कार्यरत असणाऱ्या मनुष्याला वाटते की  त्याच्या पत्नीमुलांसह, कुटुंबियांसह तो ही जीवनयात्रा करत आहे. परंतु मनुष्यजन्म ही एक व्यक्तिगत यात्रा आहे हे त्याला ज्ञात नाही. जन्मानुजन्म साठवलेल्या संस्कारामुळे त्याने जन्म का घेतला याचे कारण त्याला कळू शकत नाही. 
 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा